Whatsapp Business App in Marathi – आजच्या डिजिटल युगात, ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांच्याशी संपर्कात राहण्यासाठी आणि अर्थातच व्यवसाय वाढवण्यासाठी WhatsApp Business App हे एक प्रभावी, सोपे आणि मोफत मार्केटिंग टूल आहे.
सामान्य Whatsapp App हे WhatsApp Business App पेक्षा वेगळे आहे. विशेषतः दुकानदार, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी WhatsApp Business App चा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. अगदी किराणा दुकान, बुटिक, डबे/टिफिन सेवा, इलेक्ट्रॉनिक्स शोरूम, हर्बल उत्पादने, गृहउद्योग – प्रत्येक छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी हे App उपयोगी आहे.
या लेखात आपण WhatsApp Business App चे संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत, ज्यात या ॲपचे फायदे, संपूर्ण सेटअप प्रक्रिया, वापराची पद्धत, मर्यादा आणि इतर महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत.
WhatsApp Business App म्हणजे काय? Whatsapp Business App in Marathi

व्हाट्सअँप बिझनेस अँप (WhatsApp Business App) हा WhatsApp चा एक विशेष प्रकार आहे, जो खास व्यावसायिकांसाठी डिझाइन केला आहे. तो Google Play Store (Android) आणि Apple App Store (iOS) वर फ्री मध्ये उपलब्ध आहे. सामान्य WhatsApp च्या तुलनेत यामध्ये अनेक अतिरिक्त फीचर्स मिळतात, ते पुढीलप्रमाणे:
- व्यवसाय प्रोफाईल तयार करता येते.
- Auto replies आणि Greeting messages सेट करता येतात.
- व्यवसायाचा Catalog आपल्याला तयार करता येतो.
- मॅसेजिंग टूल्स सारख्या सुविधा मिळतात.
- ग्राहकांचे वर्गीकरण (Labels) लावून करता येते.
- व्यवसायिक आकडेवारी पाहता येते.
WhatsApp Business App कोणासाठी उपयुक्त?
हा App खालील प्रकारच्या व्यवसायांसाठी अत्यंत उपयुक्त आहे:
- किराणा दुकान, भाजीपाला विक्रेते
- घरगुती उद्योग – लोणचं, पापड, मसाले इत्यादी.
- सलून/ब्युटी पार्लर, बुटिक (Boutique) आणि कपडे विक्रेते
- इलेक्ट्रॉनिक्स किंवा मोबाइल दुकानदार
- शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs)
- फ्रीलान्सर, क्लासेस, ट्रेनिंग, कोचिंग सेंटर्स
- घरगुती डबे/टिफीन सेवा
- हस्तकला/हॅंड क्राफ्ट व्यवसाय
WhatsApp Business App चे मुख्य फायदे: Whatsapp Business App in Marathi
व्यवसाय प्रोफाईल (व्यवसायाची स्वतंत्र ओळख):
तुमच्या वैयक्तिक WhatsApp पासून हे वेगळं आहे. यात तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी स्वतंत्र प्रोफाईल बनवता येईल, ज्यामध्ये: तुमचा व्यवसायाचा लोगो, व्यवसायाचे नाव, त्याचा प्रकार, तुमच्या व्यवसायाचा Official Email ID, पत्ता (Location), वेळा (Business Hours), वेबसाइट लिंक (Web Address) यांसह तुमचं प्रोफाईल तयार करता येतं.
उत्पादने/सेवा यांचा Catalog तयार करणे:
तुमच्या सर्व वस्तू/सेवांची यादी ही नाव, फोटो, किंमत, व अजून थोड्या माहिती सहित तयार करता येते. तुमच्याकडे असलेली उत्पादने/सेवा तुम्ही “Catalog” फीचरमध्ये टाकू शकता. ग्राहक हे WhatsApp वरच पाहू शकतात. ग्राहकांना बघताचक्षणी माहिती मिळते.
उदाहरण:
“1 किलो चकली – ₹160/- रुपये, घरगुती तयार केलेली, COD (Cash On Delivery) उपलब्ध”
Auto Replies:
तुम्ही Offline असताना किंवा व्यस्त असताना ग्राहकांना ठराविक उत्तरं आपोआप पाठवता येतात. सेटिंग केल्यानंतर, तुम्ही बिझी असाल तरी ग्राहकांना Auto Reply जातो: जसे की,
Greeting Message: “नमस्कार! आमच्या व्यवसायात तुमचं स्वागत आहे.”
Away Message: “आम्ही सध्या Offline आहोत. लवकरच संपर्क करू.”
हे वेळेनुसार तुम्हाला Set करता येतं.
Quick Replies:
सामान्य प्रश्नांची पूर्वनिर्धारित उत्तरे /shortcuts वापरून पटकन पाठवता येतात. म्हणजेच जर तुम्ही सारखे सारखे एकसारखे Message पाठवत असाल, तर ते shortcut ने टाकू शकता.
उदा. “Order Status” लिहिल्यावर:
“तुमची ऑर्डर आज Dispatch झाली आहे. 2 दिवसांत पोहोचेल.”
Labels – ग्राहक वर्गीकरण:
ग्राहकांना रंगवर्गानुसार (Labels) गटांमध्ये वर्गीकृत (Classify) करता येतं. उदाहरणार्थ,
- New Customer (नवा ग्राहक)
- Paid (पैसे भरले)
- Pending Payment (पेमेंट बाकी)
- Repeat Customer
हे वापरून ग्राहक व्यवस्थापन करणं अजून सोपं होतं.
Broadcast Lists – एकाच वेळी अनेकांना मॅसेज:
तुमच्या सर्व ग्राहकांना एकाचवेळी प्रचार, ऑफर, नवीन प्रॉडक्ट याबद्दल माहिती पाठवण्यासाठी Broadcast List वापरता येते. Broadcast List मध्ये तेच नंबर निवडता येतात जे अगोदरच मोबाईलमध्ये सेव्ह केलेले आहेत. नवीन नंबर Broadcast List मध्ये Add करण्यासाठी तुम्हाला तो अगोदर सेव्ह करावा लागेल.
उदाहरण:
“सणानिमित्त खास 10% सूट – फक्त आजच्या ऑर्डरसाठी!”
Business Statistics
WhatsApp Business App तुम्हाला खालील गोष्टींचा रिपोर्ट देते:
- किती मेसेज पाठवले?
- किती Delivered झाले?
- किती वाचले गेले?
यावरून ग्राहकांचा Response Track करता येतो.
WhatsApp Business App डाउनलोड व सेटअप कसे करावे? Whatsapp Business App in Marathi

Step 1: Google Play Store/Apple App Store वर जाऊन WhatsApp Business App सर्च करुन डाउनलोड करा किंवा खालील लिंक्सवर क्लिक करा.
- Google Play Store वरून WhatsApp Business App डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
- Apple App Store वरून WhatsApp Business App डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
स्टेप 2: नवीन किंवा जुना मोबाईल नंबर वापरून रजिस्ट्रेशन करा (व्यवसायासाठी वेगळा नंबर असल्यास उत्तम). तुम्ही वेगळं SIM वापरू शकता किंवा सध्याचा नंबर वापरून Upgrade करू शकता.
Step 3: व्यवसायाचं प्रोफाईल भरा – व्यवसायाचं नाव, उपलब्ध असण्याची वेळ (Business Hours), ऑफिशिअल Email Address, व्यवसायाचा पत्ता (Location), सेवांचा प्रकार म्हणजेच कॅटेगिरी, वेबसाईट असेल तर त्याची डिटेल्स इत्यादी.
स्टेप 4: Catalog तयार करा – प्रत्येक वस्तूचा/उत्पादन/सेवेचा फोटो, किंमत तसेच इतर माहिती भरा.
Step 5: Auto replies, Quick replies, आणि Labels सेट करा. त्यामुळे काम सोपं आणि जलद होतं.
साडी व्यवसाय सुरू करण्यासाठी – येथे क्लिक करा
घरबसल्या पापड उद्योग सुरू करण्यासाठी – येथे क्लिक करा
लघु उद्योजकांनी WhatsApp Business App कसे वापरावे?

- प्रत्येक नवीन ग्राहकाला Greeting Message पाठवा. उदा. नमस्कार, आम्ही आपली कशा प्रकारे सेवा करु शकतो?
- ऑर्डर झाल्यावर ऑटो रिप्लाय सेट करा: “आपली ऑर्डर नोंदवली आहे. 2 दिवसांत पोहोचेल.”
- प्रत्येक वस्तूच्या फोटोसह कॅटलॉग पाठवा.
- स्टेटस वापरून नियमित अपडेट्स द्या. जसे की, नवे प्रॉडक्ट्स, सणानिमित्त ऑफर, ग्राहकांचे फोटो/रिव्ह्यू, विशेष माहिती, स्टोरीज मध्ये अपडेट्स शेअर करा.
- ग्राहकांना Order नंतर फीडबॅक मागा आणि स्क्रीनशॉट शेअर करा. उदा. “आपल्या सेवेशी समाधानी आहात का? तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा.”
- Broadcast वापरून ‘साप्ताहिक ऑफर’ पाठवा.
- संपर्कात राहा. जुने ग्राहक परत येण्यासाठी संवाद ठेवा.
“नमस्कार, आमच्या एका प्रोडक्टची नवीन व्हरायटी आली आहे. बघण्यासाठी कृपया Msg करा!”
आता WhatsApp हेच तुमचं फ्री मार्केटिंग टूल आहे!
WhatsApp Business App + Facebook/Instagram = जास्त परिणाम
जर तुमचं Facebook Page किंवा Instagram Account असल्यास, त्यामध्ये ‘Send WhatsApp Message’ बटन लावून डायरेक्ट ग्राहक WhatsApp वर आणता येतात. Facebook Ads च्या माध्यमातून जास्त लीड्स मिळवता येतात. वरील कॉम्बिनेशनमुळे,
- Customer leads वाढतात.
- Facebook Ads ने लोकांना डायरेक्ट WhatsApp वर आणता येतं.
- तुमचं Brand ग्राहकांना विश्वसनीय वाटतो.
WhatsApp Business चा उपयोग करून वाढलेला व्यवसाय (उदाहरण):
नाशिकच्या अमृता ताई गृहउद्योग चालवतात. त्या लोणचं, पापड, मसाले आणि चटणी घरातून तयार करतात. WhatsApp Business वर त्यांचा पूर्ण कॅटलॉग आहे. त्यांनी WhatsApp Business वापरून 150 हून अधिक ग्राहक तयार केले. स्टेटस, लेबल, आणि Auto replies वापरून त्यांनी महिन्याला ₹30,000 रुपयांच्या विक्रीपर्यंत प्रगती केली आहे – फक्त WhatsApp द्वारे!
WhatsApp Business App च्या काही मर्यादा:
- Broadcast List फक्त सेव्ह केलेल्या नंबरवरच काम करते. जेव्हा तुम्ही एखादा मॅसेज ब्रॉडकास्ट कराल, तेव्हा तुमच्या ब्रॉडकास्ट यादीतील सेव्ह केलेल्या नंबरलाच मॅसेज जाईल.
- मोठ्या प्रमाणात वापरासाठी WhatsApp API आवश्यक
- सर्व ग्राहक टेक्नॉलॉजी साक्षर नसल्यास मर्यादा येतात.
- एकाच मोबाईलवर चालतो – टीमसाठी वेगळं सोल्यूशन पाहावं लागतं.
- फक्त मोबाईलवर वापरणं सोपं – Web App कमी फीचर्स देते.
- अजूनही सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी Perfect नाही.
निष्कर्ष
WhatsApp Business App हे लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी एक क्रांतिकारी टूल आहे. त्याचा योग्य वापर केल्यास आपण:
- ग्राहक व्यवस्थापन सुलभरित्या करु शकता. ग्राहकांशी आपण सतत संपर्कात राहू शकतो.
- वेळ आणि पैसा वाचतो.
- आपण विक्री वाढवू शकतो.
- ब्रँड इमेज तयार करू शकतो, यामुळे व्यवसायाची विश्वासार्हता वाढते.
हे App वापरणं मोफत आहे, आणि त्यासाठी कोणतीही स्पेशल अशी टेक्निकल माहिती लागणार नाही, त्यामुळे जर तुम्ही अजून WhatsApp Business App वापरत नसाल, तर आजच सुरूवात करा आणि आपला व्यवसाय डिजिटल मार्गाने वाढवा!
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) – WhatsApp Business App बद्दल
1. WhatsApp Business App म्हणजे काय?
Ans: WhatsApp Business App ही लघु उद्योजक, दुकानदार, सेवा पुरवठादार, व्यवसायिक यांच्यासाठी खास तयार केलेली अॅप आहे जी ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी आणि व्यवसाय चालवण्यासाठी उपयोगी पडते.
2. सामान्य WhatsApp आणि WhatsApp Business मध्ये काय फरक आहे?
Ans: सामान्य WhatsApp हे वैयक्तिक वापरासाठी असते, तर WhatsApp Business मध्ये व्यवसाय प्रोफाइल, ऑटोमेटेड मेसेज, कॅटलॉग, ब्रॉडकास्ट सुविधा अशा अनेक व्यावसायिक वैशिष्ट्यांचा समावेश असतो.
3. WhatsApp Business App वापरणे मोफत आहे का?
Ans: हो, WhatsApp Business App वापरणे पूर्णपणे मोफत आहे.
4. WhatsApp Business App मध्ये व्यवसाय प्रोफाइल तयार करणे का गरजेचे आहे?
Ans: व्यवसाय प्रोफाइलमुळे ग्राहकांना तुमचं नाव, पत्ता, वेळ, सेवा, वेबसाइट, ईमेल इ. माहिती सहज मिळते. यामुळे व्यवसायात विश्वास निर्माण होतो.
5. WhatsApp Business वर कॅटलॉग म्हणजे काय?
Ans: कॅटलॉग म्हणजे तुमच्या उत्पादनांची किंवा सेवांची यादी, ज्यात फोटो, किंमत, माहिती, आणि ऑर्डर बटन असते. ग्राहक थेट यामधून ऑर्डर करू शकतात.
6. एकाच मोबाईलवर सामान्य WhatsApp आणि Business App वापरता येतो का?
Ans: हो, पण त्या दोघांसाठी वेगवेगळे मोबाइल नंबर असावेत.
7. ऑटोमेटेड मेसेजेस म्हणजे काय?
Ans: WhatsApp Business मध्ये ऑटो रिप्लाय, ग्रीटिंग मेसेज, आणि Away Message (जेव्हा तुम्ही ऑफलाइन असता तेव्हा) अशा सोयी असतात.
8. WhatsApp Business वापरल्याने विक्रीत वाढ होते का?
Ans: हो, कारण ग्राहकांशी थेट संवाद होतो, शंका लगेच दूर होतात, ऑर्डर प्रक्रिया सुलभ होते आणि विश्वास निर्माण होतो.
9. WhatsApp Business वर पेमेंटची सुविधा आहे का?
Ans: हो, भारतात WhatsApp पेमेंट फिचर (UPI आधारित) सुरु झाले आहे. ग्राहक थेट चॅटमधून पैसे पाठवू शकतात.
10. WhatsApp Business Web काय आहे?
Ans: ही सेवा वापरून तुम्ही संगणकावरून WhatsApp Business वापरू शकता. typing आणि व्यवस्थापन अधिक सोपे होते.
11. WhatsApp Business वर ब्रॉडकास्ट लिस्ट म्हणजे काय?
Ans: ब्रॉडकास्ट लिस्टद्वारे तुम्ही एकाच वेळी अनेक ग्राहकांना एकच मेसेज पाठवू शकता. हे मार्केटिंगसाठी उपयोगी आहे.
12. WhatsApp Business वापरण्याची सुरुवात कशी करावी?
- Play Store वरून WhatsApp Business App डाउनलोड करा
- नवीन व्यवसाय नंबरने खाते तयार करा
- व्यवसाय प्रोफाइल पूर्ण करा
- कॅटलॉग व ऑटोमेटेड मेसेजेस सेट करा
- ग्राहकांना माहिती शेअर करायला सुरुवात करा
13. WhatsApp Business मधून ग्राहकांसोबत रोज अपडेट शेअर करता येतात का?
Ans: हो. तुम्ही प्रोडक्ट अपडेट्स, ऑफर्स, नवीन सेवा, याची माहिती WhatsApp Status किंवा ब्रॉडकास्ट लिस्टद्वारे शेअर करू शकता.
14. WhatsApp Business App कोणत्या प्रकारच्या व्यवसायांसाठी उपयोगी आहे?
- किराणा दुकान
- साडी/कपड्याचा व्यवसाय
- हस्तकला व हस्तनिर्मित वस्तू
- होममेड फूड/टिफिन
- शिक्षक/ट्युशन
- फ्रीलान्सिंग सेवा
- सौंदर्य प्रसाधने विक्रेते
- आणि इतर अनेक लघु व्यवसाय
15. WhatsApp Business वापरण्यात काय चुका टाळाव्यात?
- वारंवार स्पॅम मेसेज पाठवू नका
- चुकीची माहिती किंवा फसवणूक करू नका
- ग्राहकांची परवानगीशिवाय मेसेज पाठवू नका
- अपडेट वेळेवर द्या, ग्राहकांचा आदर ठेवा
तुमचं मत काय?
तुम्ही WhatsApp Business वापरताय का? काही अडचण आहे का? admin@majhaudyogg.com वर जरूर कळवा!
लेखक: Shubham Gundurkar
श्रेणी: इतर