Saree Business in Marathi – भारतामध्ये साडीचा वापर पारंपरिक पोशाख म्हणून अनेक वर्षांपासून, अगदी प्राचीन काळापासून केला जातो. साडी ही केवळ एक वस्त्रप्रकार नसून ती भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन काळापासून ते आज आधुनिक काळापर्यंत साडीचे प्रकार, क्वालिटी, त्यांच्या निर्मिती स्थानांनुसार त्यांना असलेलं महत्त्व यात फार मोठ्या प्रमाणात उत्कर्ष झालेला आपल्याला आज बघावयास मिळतो. त्यामुळेच भारतात तसेच महाराष्ट्रात साडी व्यवसाय हा नेहमीच मागणी असलेला, टिकाऊ आणि नफा देणारा उद्योग मानला जातो.
या लेखात आपण 2025 या वर्षामध्ये साडी व्यवसाय कसा सुरू करायचा, या व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक म्हणजेच भांडवल, प्रोडक्ट्सची मार्केटिंग, विक्रीचे (सेल्स) मार्ग, फायदे, काही प्रमाणात येणाऱ्या अडचणी इत्यादी मुद्द्यांवरती संपूर्ण मार्गदर्शन पाहणार आहोत.
साडी व्यवसाय का सुरू करावा? Saree Business in Marathi

- सर्वात प्रमुख कारण म्हणजे भारतात साड्यांची वर्षभर कायम मागणी असते.
- सण-उत्सव, लग्नसराई, इतर समारंभ, धार्मिक कार्यक्रम, इतर सामाजिक कार्यक्रम यामध्ये साड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते.
- ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे (IndiaMART, Flipkart, Amazon etc.) घरबसल्या साडी व्यवसाय करणे मोठ्या प्रमाणात शक्य झाले आहे.
- साडी व्यवसाय हा कमी गुंतवणुकीतून सुरू करता येण्यासारखा व्यवसाय आहे.
- मोठ्या ब्रँड्सशिवायही स्थानिक दर्जेदार साड्यांना ग्राहक आरामात मिळतात.
साडी व्यवसाय सुरू करण्याचे प्रकार:
1. रिटेल साडी शोरूम
- भाड्याच्या जागेत ही आपल्याला रिटेल साडी शोरुम (दुकान) सुरू करता येते.
- ग्राहक स्वतःहून आपल्या दुकानात येतात आणि प्रत्यक्ष साड्या पाहून खरेदी करतात.
- या सर्वात महत्वाचा मुद्दा हा ठिकाण निवडण्याबाबतचा आहे. बेस्ट ठिकाण निवडणे अधिक महत्त्वाचे (बाजारपेठ, महिलांची वर्दळ असलेली ठिकाणे). जागा चांगली मिळाल्यास व्यवसाय मोठा करणे आणि जास्त नफा कमावणे शक्य होते. व्यवसायात चांगला जम बसतो.
2. घरून साडी विक्री Saree Business in Marathi
- भाड्याने जागा घेऊन दुकान टाकणे सद्ध्या शक्य नसल्यास आपण थेट घरी बसून सुद्धा साड्यांची विक्री करु शकता.
- सुरुवातीला कमी साठा (स्टॉक) घेऊन मित्र-नातेवाईकांतून आपल्याला विक्री सुरू करता येते.
- वर्ड ऑफ माउथ (Mouth Publicity), व्हॉट्सअॅप, फेसबुक यांचा वापर करून ग्राहक वाढवता येतात.
3. ऑनलाइन साडी व्यवसाय
स्वतःची वेबसाइट / ब्लॉगवरून विक्री
आपण स्वतःची वेबसाईट सुरू करुन, त्यावरुन आपल्या साड्यांची विक्री करु शकता. वेबसाईट बनवण्यासाठी आपल्याला डोमेन नेम आणि होस्टिंगची खरेदी करावी लागेल. त्यासाठी जवळपास अंदाजे ₹5,000 रुपये एवढा वार्षिक खर्च आपणांस येईल.
एवढा खर्च आपण करु शकत नसल्यास आपण ब्लॉगर प्लॅटफॉर्म वरुन सुद्धा वेबसाईट बनवू शकता. यात होस्टिंग आपणांस मोफत मिळेल व फक्त डोमेन नेमचा खर्च आपल्याला करावा लागेल. डोमेन नेम विकत घेण्यासाठी अंदाजे ₹500 रुपये पर्यंत खर्च येईल. तसेच आपण जर ₹3000 ते ₹5000 रुपये खर्च करू शकत असाल तर आपण वर्डप्रेस वरती सुद्धा आपली वेबसाईट तयार करू शकता. आपल्या आवडत्या एखाद्या नामांकित होस्टिंग प्लॅटफॉर्म वर प्लॅन सिलेक्ट करून तुम्ही थेट वर्डप्रेस वेबसाईट सेट करू शकता.
ब्लॉगर प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
सोशल मीडियावरून विक्री (Instagram, Facebook, YouTube Shorts)
सोशल मिडीयावरती आपल्या साडी व्यवसायाचे अकाऊंट (बिझनेस अकाऊंट) आपण बनवू शकता. हे प्लॅटफॉर्म बिझनेस अकाऊंट्ससाठी काही स्पेशल फिचर्स (Special Features) देत असतात. आपण आपल्या साडी ऑनलाइन मार्केटिंग करण्यासाठी Ad Campaign सुद्धा चालवू शकता. Ad Campaign चालवण्यासाठी करावयाच्या खर्चाचे आपण एक बजेट ही ठरवू शकता.
उदा. आपल्याला जर पाच दिवस आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करायची असेल तर आपण जवळपास 500 रुपये पर्यंत आपलं बजेट फिक्स करू शकता आणि त्यानुसार मग आपलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पुढचे पाच दिवस आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करेल.
ई-कॉमर्स वेबसाइट्सवर विक्री (Amazon, Flipkart, Meesho, GlowRoad)
आपण Amazon, Flipkart, Meesho, GlowRoad, IndiaMART यांसारख्या प्लॅटफॉर्म वरती विक्रेता अकाउंट Seller Account) तयार करू शकता. याद्वारे आपण Inventory Management, Reports, Catalogue Making यांसारख्या गोष्टी सुलभतेने करु शकाल. ज्याचा फायदा आपल्याला उत्तमरीत्या व्यवसाय करण्यासाठी होईल.
साडी प्रकार – कोणत्या प्रकारच्या साड्यांमध्ये व्यवसाय कराल?
साडी प्रकार | वैशिष्ट्ये | बाजारपेठ |
कॉटन साडी | दररोजच्या वापरासाठी | सर्व वयोगट |
सिल्क साडी | लग्न, समारंभासाठी | प्रीमियम ग्राहक |
लिनन साडी | मॉडर्न वर्किंग महिलांसाठी | शहरी भाग |
ब्लॉकेप्रिंट/हॅंडलूम साडी | पारंपरिक व ग्रामीण ग्राहक | ग्रामीण/निमशहरी |
पार्टीवेअर साडी | झगमगती डिझाइन्स | तरुण वर्ग |
सल्ला: सुरुवातीला 1-2 प्रकारांवरती लक्ष केंद्रित करा. नंतर मागणीनुसार प्रकार वाढवा.
सुरुवातीची गुंतवणूक किती लागते?
खर्चाचे प्रकार | अंदाजे खर्च (₹) |
साड्यांचा साठा | ₹10,000 – ₹50,000 |
पॅकिंग मटेरियल | ₹2,000 – ₹5,000 |
Instagram/Facebook जाहिरात | ₹2,000 – ₹5,000 |
मोबाईल फोटो शूट/बॅनर | ₹1,000 – ₹3,000 |
वेबसाइट (ऑप्शनल) | ₹3,000 – ₹6,000 |
एकूण सुरुवात: | ₹15,000 – ₹60,000 च्या दरम्यान |
साड्या कुठून खरेदी कराव्यात? Saree Business in Marathi

साडी व्यवसाय सुरू करण्यासाठी होलसेल रेट मध्ये साड्या कुठून खरेदी कराव्या? या साधारणपणे नेहमीच विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे सर्वात पहिलं उत्तर येतं, सुरत! हो, सुरतमध्ये आपल्याला चांगल्या होलसेल रेट मध्ये साड्या मिळतात, परंतु सुरत वगळता भारतामध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा इतरही अनेक अशी ठिकाणे आहेत जेथून आपण चांगल्या होलसेल रेट मध्ये साड्या खरेदी करू शकता. ती ठिकाणे खालीलप्रमाणे,
होलसेल मार्केट्स Saree Business in Marathi
- इचलकरंजी (महाराष्ट्र)
- सूरत (गुजरात)
- वाराणसी (उत्तर प्रदेश)
- कांचीपुरम (तामिळनाडू)
- कोलकाता (बंगाल)
ऑनलाइन होलसेल वेबसाइट्स
आजच्या डिजिटल युगामध्ये अशा अनेक ऑनलाईन होलसेल वेबसाईट्स आपल्याला बघावयास मिळतात, जेथून आपण चांगल्या होलसेल रेटमध्ये साड्या खरेदी करू शकतो. यातील काही वेबसाईट्स खालीलप्रमाणे,
- Textile Export
- TradeIndia
- Indiamart
- Suratfabric.com
स्थानिक उत्पादन करणारे महिला बचतगट/हॅंडलूम युनिट्स
आपल्याला यांच्याकडून थेट खरेदी करून कमी दरात चांगल्या साड्या मिळवता येतात.
अगरबत्ती व्यवसाय कसा सुरु करायचा? – येथे वाचा
पापड व्यवसाय कसा सुरू कराल? – येथे वाचा
साडीचे मार्केटिंग कसे करावे? Saree Business in Marathi
1. Instagram/Facebook पेज तयार करा:
- प्रत्येक साडीचा फोटो/रील्स आपल्या सोशल मीडिया बिझनेस अकाऊंट आणि पर्सनल अकाऊंटवर पोस्ट करा.
- साड्यांवर सवलत, कोड, मर्यादित ऑफर ठेवा. ह्यामुळे ग्राहक आपल्याकडे खेचला जातो.
- रील्समधून ड्रेपिंग स्टाईल्स, फॅशन टिप्स शेअर करा. यामुळे Brand Trust वाढतो.
2. WhatsApp ग्रुप मार्केटिंग:
- व्हाट्सअप ग्रुप्स तयार करुन सर्वप्रथम आपल्या ओळखीच्या लोकांपासून सुरुवात करा.
- आपले जुने ग्राहक, आपल्याला नवीन ग्राहक आणून देण्यासाठी मदत करतील.
3. Influencer Marketing (स्थानिक महिला/सुतारिका):
कमी फॉलोअर्स असलेले लोकल इन्फ्लुएन्सर साड्या प्रमोट करू शकतात. यासाठी ते ठराविक रक्कम त्यांची फीस म्हणून घेतात.
4. Online Marketplace मध्ये नोंदणी करा:
या लेखात वर सांगितल्याप्रमाणे, Meesho, GlowRoad, Amazon, Flipkart वर सेलर अकाउंट उघडा.
साडीची पॅकिंग व डिलिव्हरी Saree Business in Marathi
पॅकिंग सिंगल साडी:
पारदर्शक प्लास्टिक पिशवी (सरकारमान्य मायक्रोन्सची पात्रता असलेली) + तुमचं ब्रँड लेबल + कार्डबोर्ड पॅकिंग.
कुरिअर सेवा:
- Delhivery, Shiprocket, Xpressbees यांच्याशी आपलं प्रोडक्ट डिलीव्हर करण्यासाठी भागीदारी करा.
- COD (Cash on Delivery) ची सोय ठेवा.
ब्रँड बिल्डिंग कशी कराल? Saree Business in Marathi
- आपल्या साडी व्यवसायाचे नाव निवडा: “SareeStudio”, “Nari Vastra”, “Sanskriti Sarees” यांसारखी नावे.
- Instagram/Facebook/YouTube वर एकसंध ब्रँडिंग ठेवा.
- प्रत्येक पॅकिंगमध्ये धन्यवाद कार्ड ठेवा. धन्यवाद कार्डसोबत आपण आपल्या ग्राहकांना तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि गुगलवर रेटिंग देण्यासाठी नम्र आवाहन करु शकता. मजबूत रेटिंगचा फायदा आपल्याला अधिक प्रमाणात ग्राहक आकर्षित करण्यासाठी होईल.
- ग्राहकांकडून फोटो रिव्ह्यूज मागवा आणि सोशल मीडियावर पोस्ट करा.
नफा व वाढीची शक्यता:
प्रत्येक साडीवर नफा: ₹150 ते ₹500+ याप्रमाणे.
महिन्याला 100 साड्या विकल्या, तर:
अंदाजे कमाई = ₹20,000 ते ₹50,000+ (व्यवसाय मोठा झाल्यावर आपण यापेक्षा जास्त कमाई ही करु शकता.)
ग्राहक वाढल्यावर:
नवीन प्रकार, डिझाइन, स्टिचिंग/फॉल पिको/ब्लाउज स्टिचिंग यांसारख्या सेवा आपण देऊ शकता.
शक्य तितक्या चुका टाळा! Saree Business in Marathi
- साड्या वेळेवर पाठवणे टाळू नका. ग्राहकांना वस्तू वेळेवर मिळाल्यास त्यांचा आपल्या ब्रॅण्डवरती विश्वास वाढेल.
- फोटो आणि रिअल प्रॉडक्ट यामध्ये फरक ठेवू नका.
- चांगली रिटर्न पॉलिसी व स्पष्ट नियम द्या.
- ग्राहकांची तक्रार वेळेत सोडवा.
महिलांसाठी उत्तम घरबसल्या व्यवसाय:
साडी व्यवसाय विशेषतः महिलांसाठी घरबसल्या सुरू करता येणारा, स्वतःच्या वेळेनुसार सांभाळता येणारा, आणि कुटुंबाचा आधार बनू शकणारा व्यवसाय आहे. आजच्या डिजिटल युगात Instagram, YouTube आणि Meesho सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्समुळे आज प्रत्येकाला स्वतःचा ब्रँड तयार करण्याची संधी उपलब्ध आहे.
निष्कर्ष:
जर तुमच्यात थोडा फॅशन सेन्स, संवादकौशल्य, आणि मार्केटिंगची तयारी असेल, तर साडी व्यवसाय तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवू शकतो. 2025 हे तुमच्या साडी व्यवसायासाठी योग्य वर्ष ठरू शकतं — तर मग आजच सुरुवात करा!
आपल्याला साडी व्यवसाय सुरू करताना आणखी कोणतीही माहिती हवी असेल, तर कृपया कमेंटमध्ये विचारा किंवा आम्हाला संपर्क करा.