PMEGP योजना 2025 – नवीन व्यवसायासाठी कर्ज व अनुदान मिळवण्याची संपूर्ण माहिती | PMEGP Scheme 2025 – Complete Information on Getting Loans And Grants For New Businesses

PMEGP Yojana in Marathi – नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझा उद्योग वरती हार्दिक स्वागत आहे. आजच्या काळात मुख्यत्वे बेरोजगारी आणि महागाई या दोन मोठ्या समस्या सामान्य माणसाला त्रस्त करत आहेत. उच्च शिक्षण घेतल्यानंतरही आज अनेक तरुण घरी बेरोजगार बसले आहेत. त्यातच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड होऊन बसले आहे. मात्र, जर तुमच्याकडे एक चांगली कल्पना, थोडेसे कौशल्य आणि मेहनत घेण्याची तयारी असेल, तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. त्यासाठीच केंद्र सरकारने PMEGP (Prime Minister’s Employment Generation Programme – प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम) ही योजना सुरू केली आहे. ही योजना 2025 मध्येही सुरू असून नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. चला तर मग पाहूया या योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि इतर सविस्तर माहिती.

PMEGP योजना म्हणजे काय? What is PMEGP Scheme?

PMEGP Full Form And Official Website's Homepage Title. (PMEGP Yojana in Marathi)

Prime Minister’s Employment Generation Programme (PMEGP) – प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम) ही केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) मार्फत राबवली जाणारी एक योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, म्हणजेच लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा आहे. या योजनेतून लोकांना कर्ज आणि अनुदानाच्या माध्यमातून उद्योग सुरू करण्यासाठी मदत केली जाते.

या योजनेअंतर्गत उत्पादन (Manufacturing) व सेवा (Services) व्यवसायांसाठी सरकारकडून आर्थिक सहाय्य मिळते. ग्रामीण व शहरी भागातील युवकांना या योजनेचा फायदा घेता येतो. यामुळे स्थानिक पातळीवर उद्योग वाढून रोजगारनिर्मिती होते आणि आर्थिक स्थैर्य निर्माण होते.

PMEGP योजनेसाठी पात्रता (Eligibility For PMEGP Scheme):

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील पात्रता अटी आहेत:

वय: PMEGP योजनेसाठी आपलं वय हे किमान 18 वर्षे असायला हवे.

शिक्षण: किमान 8वी उत्तीर्ण (विशेषतः प्रकल्प खर्च 10 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास)

योग्य/पात्र अर्जदार:

  • बेरोजगार युवक/युवती
  • महिला उद्योजिका
  • अनुसूचित जाती व जमातीतील नागरिक
  • दिव्यांग व्यक्ती
  • स्वयं-सहायता गट (SHG)
  • सहकारी संस्था
  • चारशेपेक्षा कमी उत्पन्न असणारे पारंपरिक कारागीर

या योजनेतून पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाते. ज्या व्यक्तीने यापूर्वी कुठल्याही सरकारी योजनेंतर्गत अनुदान घेतलेले नसेल, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो.

कर्ज रक्कम व अनुदान (Loan Amount and Subsidy):

PMEGP योजनेअंतर्गत तुम्हाला बँकेमार्फत कर्ज मिळते आणि त्यावर केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. हे अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होत नाही, तर ते टर्म लोनमधून वजा केले जाते.

शहर व ग्रामीण भागासाठी अनुदान दर (Subsidy Rates For Urban and Rural Areas):

कमाल प्रकल्प खर्च:

उत्पादन क्षेत्रासाठी25 लाख रुपये
सेवा क्षेत्रासाठी10 लाख रुपये

स्वत:ची गुंतवणूक:

सामान्य प्रवर्ग10%
विशेष प्रवर्ग (SC/ST/महिला/इतर)5%

टीप: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला आणि ग्रामीण भागातील लोकांना अधिक अनुदान मिळते.

ऑनलाईन अर्ज कसा करावा? How To Apply Online?

PMEGP योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. या योजनेसाठी आपण ऑफलाईन अर्ज सादर करू शकत नाही. खाली दिलेल्या स्टेप्सनुसार तुम्ही सहजरित्या अर्ज करू शकता:

1. अधिकृत संकेतस्थळावर जा: https://www.kviconline.gov.in/pmegp/

2. “Online Application for Individual” या पर्यायावर क्लिक करा.

3. अर्ज फॉर्ममध्ये पुढील माहिती भरा:

  • आधार क्रमांक
  • नाव आणि पत्ता
  • व्यवसायाचा प्रकार
  • बँक तपशील
  • प्रकल्प अहवाल (Project Report)

4. सर्व आवश्यक कागदपत्रे PDF फॉरमॅटमध्ये अपलोड करा.

5. अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक (Application Number) नोंदवून ठेवा/जतन करा.

6. यानंतर संबंधित KVIC/KVIB/DIC कार्यालय तुमच्या अर्जाची छाननी करते.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents To Apply For PMEGP Scheme)

PMEGP योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे:

  • आधार कार्ड
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • जातीचा दाखला (असल्यास)
  • प्रकल्प अहवाल (Project Report)
  • बँक पासबुक/ बँकेचे स्टेटमेंट
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • स्वयंघोषणा पत्र (Self-Declaration)

प्रकल्प अहवाल म्हणजे काय? What is Project Report?

प्रकल्प अहवाल (Project Report) म्हणजे एखाद्या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती असते. यात आपल्या प्रकल्पाचे संपूर्ण गणित आपल्याला मांडायचे असते. यात प्रामुख्याने आपल्याला खालील गोष्टी दर्शवायच्या असतात:

  • कोणता व्यवसाय सुरू करणार आहात?
  • व्यवसायासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री, जागा, मनुष्यबळाची माहिती
  • एकूण खर्च किती येईल?
  • तुम्ही किती स्वत:ची गुंतवणूक करणार आहात?
  • बँकेकडून किती कर्ज आवश्यक आहे?
  • अपेक्षित उत्पन्न व नफा किती आहे?

उदाहरण:

अगरबत्ती, पापड, पिठाच्या चक्क्या, शिलाई सेंटर इत्यादी.

जर तुम्हाला अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर प्रकल्प अहवालात त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. या व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री (Machinery), कच्चा माल (Raw Materials), श्रमिक (कामगार)(Labour), विक्रीचा अंदाज (Estimated Sales) यांचा सविस्तर उल्लेख आपल्याला करावा लागतो. तरच प्रकल्प अहवाल परिपूर्ण वाटेल.

उदाहरणासाठी वाचा:

जर तुम्हाला अगरबत्तीचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर, अगरबत्ती व्यवसायविषयी माहितीसाठी येथे क्लिक करा

अर्जाची प्रक्रिया व निवड: PMEGP Yojana in Marathi

1. ऑनलाइन अर्ज झाल्यानंतर तो संबंधित जिल्हा उद्योग केंद्र (DIC) व बँकेकडे पाठवला जातो.

2. काही प्रकरणांमध्ये कधी-कधी मुलाखती घेतल्या जातात. या मुलाखतीत तुमच्या व्यवसायाची माहिती विचारली जाऊ शकते.

3. तुमच्या प्रकल्प अहवालाच्या तपासणीनंतर अर्ज मंजूर केला जातो.

4. मंजूरी झाल्यावर बँकेकडून कर्ज मंजूर होते, कर्ज मंजुरीपत्र मिळते आणि त्यावर सबसिडी जोडली जाते.

5. नंतर व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते (EDP Training), जो योजनेचा भाग असतो.

काही महत्त्वाच्या सूचना: PMEGP Yojana in Marathi

  • सर्व कागदपत्रे स्पष्ट, व्यवस्थित आणि वैध तसेच पूर्ण असावीत.
  • प्रकल्प अहवाल व्यावहारिक, वास्तवदर्शी आणि विश्वासार्ह असावा.
  • अर्ज केल्यानंतर वेळोवेळी फॉलो-अप करत राहणे महत्त्वाचे आहे.
  • बँक आणि संबंधित अधिकाऱ्यांशी नम्रतेने, शिस्तबद्धपणे आणि सौम्य संवाद साधा.
  • जर तुम्ही ग्रामीण भागातून अर्ज करत असाल तर स्थानिक पंचायत, जिल्हा उद्योग केंद्राकडून मार्गदर्शन घ्या.

निष्कर्ष/सारांश: PMEGP Yojana in Marathi

PMEGP योजना 2025 ही एक अशी योजना आहे, अशी एक उत्तम संधी आहे, जी बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा देते आणि आवश्यक आर्थिक सहाय्यदेखील पुरवते. अगदी कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करून, सरकारच्या अनुदानाचा लाभ घेऊन, मोठा प्रगतीचा मार्ग खुला करता येतो. जर तुम्हाला स्वतःचे काहीतरी करायचे असेल, नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हायचे असेल, तर PMEGP ही योजना तुमच्यासाठी योग्य आहे.

या योजनेचा नक्की फायदा घ्या, लाभ घ्या, मार्गदर्शन घ्या आणि तुमचे उद्योजकीय स्वप्न साकार करा. आता वेळ आली आहे आत्मनिर्भर होण्याची!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) – PMEGP योजना

1. PMEGP योजना म्हणजे काय?


Ans: PMEGP (Prime Minister’s Employment Generation Programme) ही केंद्र सरकारची एक योजना आहे जी ग्रामीण आणि शहरी भागांतील बेरोजगार युवकांना उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करते.

2. PMEGP अंतर्गत किती रकमेपर्यंत अनुदान मिळते?


Ans: PMEGP योजनेत प्रकल्पाच्या एकूण खर्चावरून 15% ते 35% पर्यंत अनुदान (subsidy) मिळते. हे अनुदान ग्रामीण व शहरी भाग, तसेच सामान्य व विशेष प्रवर्गानुसार वेगवेगळं असतं.

3. PMEGP योजनेसाठी कोण पात्र आहे?

  • वय: किमान 18 वर्षे
  • शिक्षण: किमान 8वी पास (प्रकल्प 10 लाखांपेक्षा जास्त असल्यास)
  • नवीन उद्योग सुरु करायची इच्छा
  • यापूर्वी PMRY, REGP किंवा PMEGP अंतर्गत अनुदान घेतलेलं नसावं.

4. PMEGP अंतर्गत कोणकोणते उद्योग सुरू करता येतात?

  • उत्पादन उद्योग (उदा. अन्न प्रक्रिया, कपडे, मशिनरी)
  • सेवा उद्योग (उदा. मोबाइल रिपेअरिंग, ब्यूटी पार्लर, फोटो स्टुडिओ)
  • कृषी आधारित लघुउद्योग
  • हँडीक्राफ्ट व हँडलूम उद्योग

5. PMEGP योजनेसाठी अर्ज कुठे करावा लागतो?


Ans: https://www.kviconline.gov.in/pmegp/ वर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

6. PMEGP अंतर्गत कर्ज कोण देतं?


Ans: राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका आणि को-ऑपरेटिव्ह बँका या योजनेअंतर्गत कर्ज देतात.

7. कर्जाची रक्कम किती असते?

  • उत्पादन उद्योगासाठी: ₹25 लाखांपर्यंत
  • सेवा उद्योगासाठी: ₹10 लाखांपर्यंत

8. अनुदान थेट खात्यात येते का?

Ans: नाही. अनुदान थेट लाभार्थ्याच्या खात्यात न जाता थेट बँकेला दिले जाते. बँक कर्जाच्या एकूण रकमेवरून अनुदान वजा करून उरलेली रक्कम कर्ज म्हणून देते.

9. PMEGP प्रकल्प अहवाल (Project Report) आवश्यक आहे का?

Ans: होय. प्रकल्प अहवाल म्हणजे व्यवसायाची संपूर्ण माहिती देणारा दस्तऐवज असून तो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

10. PMEGP प्रशिक्षण अनिवार्य आहे का?

Ans: होय. अर्ज मंजूर झाल्यानंतर 10 दिवसांचे EDP (Entrepreneurship Development Programme) प्रशिक्षण आवश्यक आहे.

11. PMEGP योजनेसाठी किती वेळ लागतो?

Ans: सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणतः 2 ते 3 महिने लागतात, परंतु जिल्हानिहाय वेळ कमी-जास्त होऊ शकतो.

12. PMEGP योजनेत अर्ज नाकारला गेला तर पुन्हा अर्ज करता येतो का?

Ans: होय. कारण समजून घेऊन चुका सुधारून पुन्हा अर्ज करता येतो.

13. PMEGP योजना आणि मुद्रा योजनेत काय फरक आहे?

Ans: मुद्रा योजनेत कोणतेही अनुदान नसते, फक्त कर्ज मिळते. PMEGP मध्ये अनुदानसह कर्ज दिलं जातं.

14. PMEGP प्रकल्पासाठी स्वतःची गुंतवणूक किती आवश्यक असते?

  • सामान्य प्रवर्ग: ग्रामीण – 10%, शहरी – 10%
  • विशेष प्रवर्ग (SC/ST/OBC/महिला/अपंग): ग्रामीण – 5%, शहरी – 5%

15. PMEGP अंतर्गत अर्ज केल्यानंतर फॉलोअप कुठे घ्यावा?

Ans: KVIC (खादी व ग्रामोद्योग आयोग), DIC (जिल्हा उद्योग केंद्र) किंवा बँकेत फॉलोअप घेता येतो.

जर तुम्हाला या योजनेत अर्ज करताना अडचणी येत असतील, तर तुम्ही जिल्हा उद्योग केंद्राशी (DIC) थेट संपर्क साधू शकता.

टीप: अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ किंवा जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधा.

लेखक: Shubham Gundurkar (majhaudyogg.com)
श्रेणी: सरकारी योजना

आणखी वाचा:

Stand Up Yojana – SC, ST व महिला उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

पीएम सूर्य घर योजना – घरावर सोलर पॅनल बसवून ₹78,000/- पर्यंत सबसिडी मिळवा

पीएम स्वानिधी योजना – फेरीवाल्यांसाठी बिनतारण कर्ज

लक्ष्मी मुक्ती योजना – शून्य खर्चात स्त्रीचे नाव सातबाऱ्यावर नोंदवा

महत्वाची सूचना: majhaudyogg.com वरील लेखांमधील माहिती ही सर्वसामान्य मार्गदर्शनासाठी दिली असून ती विविध विश्वसनीय स्त्रोतांवर आधारित आहे. शासकीय योजना, कर्ज सुविधा किंवा व्यवसाय संबंधित कोणताही निर्णय घेण्याआधी संबंधित अधिकृत वेबसाइट्स, कार्यालये किंवा तज्ज्ञ व्यक्तींशी संपर्क साधावा. येथे दिलेली माहिती वेळोवेळी बदलू शकते, त्यामुळे कृपया शेवटची अद्ययावत माहिती स्वतः पडताळून पाहा. या वेबसाईटवरील माहितीच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी majhaudyogg.com किंवा लेखक जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

**Image Credits:** 
PMEGP logo and homepage image are sourced from the official PMEGP portal: https://www.kviconline.gov.in/ Used for informational and educational purposes only.