घरबसल्या पापड व्यवसाय कसा सुरू कराल? संपूर्ण मार्गदर्शन आणि शासकीय योजना | How To Start a Papad Business From Home? Complete Guidance and Government Schemes

Papad Business in Marathi – आजच्या डिजिटल युगात देखील काही व्यवसाय असे आहेत जे कमी गुंतवणुकीत, घरबसल्या सुरू करता येतात आणि चांगला, उत्तम नफा देऊ शकतात. त्यातलाच एक लोकप्रिय व्यवसाय म्हणजे पापड तयार करण्याचा व्यवसाय (Papad Business in Marathi). खास करून महिला बचत गट, गृहिणी, निवृत्त व्यक्ती,आणि ग्रामीण भागातील तरुण/तरुणींसाठी हा व्यवसाय एक उत्तम संधी ठरू शकतो.

या लेखात आपण पापड व्यवसाय (Papad Business in Marathi) सुरू करण्याच्या प्रत्येक टप्प्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत — सुरुवातीपासून मार्केटिंग, नफ्यापर्यंत आणि त्यासाठी लागणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देखील आपण या लेखात देणार आहोत. चला, तर अधिक वेळ न दवडता आपल्या लेखाला सुरुवात करूया!

Note: वाचकांनो, आपल्या या पोस्टचा मुख्य उद्देश मुळात घरगुती पापड व्यवसायावर असला तरी काही माहिती आपण आणखी खोलात जाणून बघणार आहोत जेणेकरून, उद्या जेव्हा तुमचा हा व्यवसाय मोठ्या स्तरावर जाईल तेव्हा अजून इतर पोस्ट्स शोधत बसण्याची आपल्यावर वेळ येणार नाही. ही पोस्ट आपल्या पापड व्यवसायासाठी ‘One Stop Solution’ होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

Table of Contents

पापड व्यवसाय का निवडावा? Papad Business in Marathi

Bunch Of Papads

पापड व्यवसाय (Papad Business in Marathi) सुरु करण्याची अनेक कारणे आहेत. हा व्यवसाय विविध गटांतील व्यक्तींसाठी पूरक ठरतो. त्यापैकी काही महत्वाची कारणे खाली दिली आहेत, ती आपण आता पाहूया.

  • कच्चा माल मार्केटमध्ये सहज उपलब्ध
  • घरून व्यवसाय सुरू करता येतो
  • महिलांसाठी योग्य व्यवसाय
  • लोकल मार्केटपासून ऑनलाइन मार्केटपर्यंत मोठी मागणी
  • पारंपरिक स्वादासाठी घरगुती पापडांना विशेष मागणी असते.
  • महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची उत्तम संधी

पापड बनवण्यासाठी लागणारे साहित्य व यंत्रसामग्री: Raw Material and Machinery Required For Papad Business

खाली पापड व्यवसायासाठी (Papad Business in Marathi) लागणाऱ्या कच्च्या माल व यंत्रसामग्रीची सविस्तर माहिती दिली आहे. ही माहिती तुम्ही घरगुती स्तरावर किंवा लघु उद्योग स्तरावर व्यवसाय सुरू करत असाल तरी उपयुक्त ठरेल.

पापड बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल (Raw Material Required For Papad Business):

मुख्य घटक (Base Ingredients):

कच्चा मालउपयोगसरासरी किंमत (₹/किलो)
उडीद डाळीचे पीठपापडासाठी मुख्य बेस₹90 – ₹120
मुग डाळीचे पीठपर्यायी बेस₹80 – ₹110
तांदळाचे पीठपापडांना कुरकुरीतपणा येण्यासाठी₹35 – ₹50
मैदा (रिफाईन पीठ)बांधणी व मऊपणा₹30 – ₹45

पूरक घटक व मसाले (Supplementary Ingredients and Spices):

साहित्यउपयोग
मीठचव वाढवण्यासाठी
तिखट, मिरी पूड, हिंगचव व सुगंधासाठी
जिरेपचनास मदत व चव येण्यासाठी
खायचा सोडा (Sodium Bicarbonate)फुगवण्यासाठी व मऊपणासाठी

संरक्षक द्रव्ये (Preservatives) – ऐच्छिक:

लांब शेल्फ लाईफसाठी म्हणजेच प्रोडक्ट लवकर खराब न होण्यासाठी साइट्रिक अ‍ॅसिड (Citric Acid) वापरले जाऊ शकते.

पाणी (Water):

आपल्या प्रोडक्टचा दर्जा चांगला राहण्यासाठी शुध्द आणि पिण्यायोग्य पाणी वापरणे अत्यावश्यक आहे.

पॅकिंग साहित्य (Packing Materials):

साहित्यउपयोग
फूड ग्रेड प्लास्टिक पिशव्या (Food Grade Plastic Bags)प्राथमिक पॅकिंगसाठी
लेबेल्स व ब्रँड स्टीकर (Labels and Brand Stickers)ब्रँड ओळख व नियमपालनासाठी
कोरुगेटेड बॉक्सघाऊक पॅकिंगसाठी

पापड बनवण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री (Machinery Required For Papad Business):

तुम्ही सध्या घरगुती स्तरावर पापड व्यवसाय सुरु करणार असाल की, उद्या चालून मोठ्या स्तरावर – तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या स्तरानुसार यंत्रांची निवड करता येते – मॅन्युअल (Manual), अर्धस्वयंचलित (Semi-Automatic) किंवा पूर्ण स्वयंचलित (Fully Automatic). आपल्या व्यवसायाच्या स्तरानुसार मशिन्सची निवड केल्याने अधिक पैसे खर्च करण्याचा भार आपल्यावर येत नाही.

उपकरण (Machine)उपयोग (Use)प्रकार (Types)किंमत (Price)
मिक्सिंग मशीन (Flour Mixer)पीठ आणि मसाले पाण्यासोबत नीट मिक्स करण्यासाठी.क्षमता: 10 ते 25 किलो प्रति बॅच₹25,000 ते ₹80,000
पापड प्रेसिंग मशीन (Papad Making Machine)गोळ्यांवर दाब दिला असता, पीठाच्या गोळ्यांना पातळ पापडात बदलते.मॅन्युअल प्रेस (Manual Press Machine)

अर्धस्वयंचलित मशीन (Semi-Automatic Machine)

पूर्ण स्वयंचलित लाईन (Fully Automatic Machine)
₹40,000 (मॅन्युअल) ते ₹5 लाख (फुल्ली ऑटोमेटिक)
पीठ मळण्याची मशीन (Dough Kneader)मोठ्या प्रमाणावर पीठ मळण्यासाठी उपयुक्त.टिल्टिंग टाईप मशीन (Tilting Type Kneader)

फिक्स्ड टाईप डो मशीन (Fixed Type Dough Mixer)
₹20,000 ते ₹60,000
ड्रायर मशीन (Papad Dryer/ Oven)पापड कोरडे करण्यासाठी ड्रायर मशीन लागते.सोलर ड्रायर (सौर) Solar Dryer

हॉट एअर ओव्हन (इलेक्ट्रिक) Hot Air Oven (Electric)
₹50,000 ते ₹2 लाख
पापड कटर (ऐच्छिक)विविध आकाराचे पापड कापण्यासाठी.हस्तचलित कटर (Manual Cutter)

रोटरी कटर (Rotary Cutter)
₹1,000-₹3,000

₹5,000-₹10,000
वजन मोजण्याचे यंत्रपॅकिंगसाठी अचूक वजनडिजिटल टेबल टॉप काटा (1-30 किलो)

प्लॅटफॉर्म काटा (लघु उद्योगासाठी) (50-100 किलो)
₹2,000-₹5,000

₹5,000-₹10,000
पिशवी सीलिंग मशीनपॅक केलेल्या पिशव्या सुरक्षित बंद करण्यासाठी.हँड सीलर (Hand Sealer)

फूट सीलर (Foot Sealer)
₹3,000 ते ₹10,000
पॅकिंग टेबल व स्टेनलेस ट्रेसुकवण्यासाठी व व्यवस्थित पॅकिंगसाठी.NA₹2,000 ते ₹12,000

यंत्रसामग्री आपल्याला कुठे मिळेल? Where To Purchase Machinery?

खालील ठिकाणांहून आपण यंत्रसामग्री ऑर्डर करू शकता.

  • IndiaMART – www.indiamart.com
  • TradeIndia – www.tradeindia.com
  • MSME सप्लायर (NSIC नोंदणीकृत विक्रेते)
  • स्थानिक उद्योगपुरवठादार – पुणे, मुंबई, अहमदाबाद, कोइम्बतूर, नागपूर इ. ठिकाणी उपलब्ध

ऐच्छिक साहित्य (Optional Material):

खाली दिलेल्या गोष्टी जर आपल्याला आवश्यक वाटल्या तर आपण खरेदी करू शकता.

  • स्टेनलेस स्टील भांडी
  • पीठ कापण्यासाठी सुरी
  • लाटणं आणि पोळपाट (मॅन्युअल प्रक्रियेसाठी)
  • साठवण भांडी (Storage bins)

नोट: सुरुवातीला सगळं काम हाताने करता येते. जेव्हा तुमचा व्यवसाय वाढेल तेव्हा तुम्ही छोट्या मशीन्समध्ये गुंतवणूक करू शकता.

व्यवसायाचे स्तर व आवश्यक गोष्टी: Papad Business in Marathi

स्तरलागणारे क्षेत्रकामगारउत्पादन क्षमता
घरगुती100-150 चौरस फूट1-210-20 किलो/दिवस
लघु उद्योग300-500 चौरस फूट3-540-100 किलो/दिवस
मध्यम उद्योग800-1200 चौरस फूट5-10150-500 किलो/दिवस

व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रक्रिया: Papad Business in Marathi

प्रयोग करा (Trial Batch):

  • घरच्या घरी 2 ते 5 किलो डाळ वापरून लहान प्रमाणावर पापड तयार करा.
  • चव, पोत आणि टिकाव तपासा.

उत्पादन प्रक्रिया:

डाळ भिजवणे → वाटणे → पीठ बनवणे → मसाला टाकणे → लाटणे → सुकवणे → पॅक करणे

वरील प्रक्रिया फॉलो करा.

ब्रँडिंग करा:

  • आपल्या पापडांना चांगले नाव द्या. उदाहरण: “घरचा स्वाद पापड”, “सजनी पापड”, “सुगंधी पापड” इत्यादी. ब्रॅंडच्या नावावरुनही आपल्या मालाची विक्री वाढत असते. त्यामुळे आपल्या पापडांना योग्य नाव द्या.
  • आकर्षक पॅकिंग करा. [पारदर्शक प्लास्टिक पिशवी (सरकारमान्य मायक्रोन्सची) + स्टिकर]
  • स्वतःचा लोगो तयार करा आणि आपल्या दर्जावर (Quality) भर द्या.

पापड विक्री व मार्केटिंग (Sales and Marketing):

स्थानिक विक्री:

Indian Boy Selling Papads in Local Market

  • किराणा दुकाने, मंडईतील दुकाने, स्वयंपाकगृह उत्पादने, तसेच विक्री करणारे स्टॉल इत्यादी ठिकाणी आपला तयार माल विकण्याचा प्रयत्न करा.
  • शाळा, हाउसिंग सोसायट्या, सहकारी संघ यामध्ये चाचणी विक्री (Sample Selling) करा. सॅम्पल सेलिंग मधून ऑर्डर्स तयार होतात.

महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था:

Indian Village Group Meeting

  • सहकारिता किंवा गट (बचट गट/स्वयंसहाय्यता गट) तयार करून सामूहिक विक्री करता येते. शासनाकडूनही बचत गटांना आपला माल विक्री करण्यासाठी मदत मिळत असते.
  • गावांमध्ये सेल्फ-हेल्प ग्रुपच्या (Self Help Groups) माध्यमातून विक्री वाढवता येते.

WhatsApp /Facebook /Instagram:

Use of Social Networks For Marketing

  • फेसबुक मार्केटप्लेस व ग्रुप्समध्ये तसेच व्हाटसॲप स्थानिक ग्रुपमध्ये फोटो टाकून ऑर्डर घ्या. आपले प्रॉडक्ट्स व्हाट्सअँप वर स्टेट्स ला ठेवत चला
  • COD (Cash on Delivery) पेमेंट ऑप्शन ठेवा.
  • Instagram वर “Homemade Papad” हा हॅशटॅग वापरा. रील्स बनवा आणि स्टोरी ठेवत चला. बिझनेस अकाउंट सुरु केल्यास अधिक उत्तम.

B2B (Business To Business – व्यवसाय ते व्यवसाय):

  • मोठ्या हॉटेलसाठी किंवा भोजनालय, किरकोळ विक्रेत्यांना (Retail Sellers) घाऊक (Wholesale) दराने पापड द्या.
  • मासिक ऑर्डर साठी संपर्क ठेवा. आपले बिझनेस कार्ड्स डिस्ट्रिब्युट करा.

ऑनलाईन मार्केटप्लेस (Online Marketplace):

Amazon, Flipkart, JioMart वर विक्रीची नोंदणी करा. या प्लॅटफॉर्म्सवरती आपले सेलर अकाउंट तयार करा आणि आपल्या व्यवसायाची माहिती अपडेट करा (GST आणि FSSAI परवाना यासाठी आवश्यक असेल).

टीप: दररोज फक्त 4-5 तास काम करून सुरुवात करता येते. विक्री वाढल्यावर वेळ व मजुरी वाढवा.

व्यवसायासाठी लागणारा खर्च (अंदाजे गुंतवणूक): Papad Business in Marathi

खाली आपण घरगुती आणि लघुउद्योग या दोन्ही स्तरावर येणाऱ्या अंदाजित खर्चाची माहिती दिली आहे.

घरगुती स्तरावर व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक (₹): Papad Business in Marathi

  • कच्चा माल (1 महिना) – 10,000 रुपये
  • लाटण्याचे साहित्य – 2,000 रुपये
  • प्लास्टिक शीट्स – 1,000 रुपये
  • पॅकिंग साहित्य – 2,000 रुपये
  • ब्रँडिंग (स्टिकर) – 1,000 रुपये
  • किरकोळ यंत्रसामग्री – 3,000 रुपये

घरगुती स्तरावर व्यवसाय सुरु करण्यासाठी एकूण प्राथमिक गुंतवणूक – ₹19,000 – ₹25,000

लघुउद्योग स्तरावर व्यवसायासाठी लागणारी गुंतवणूक (₹):

  • कच्चा माल (१ महिन्याचा साठा) – ₹30,000 – ₹80,000
  • यंत्रसामग्री (अर्धस्वयंचलित) – ₹1.5 – ₹3 लाख
  • पॅकिंग साहित्य – ₹20,000
  • परवाने (FSSAI, Udyam इ.) – ₹5,000 – ₹10,000
  • अन्य खर्च – ₹20,000

लघुउद्योग स्तरावर व्यवसाय सुरु करण्यासाठी एकूण प्राथमिक गुंतवणूक – ₹2 – ₹4 लाख

नफा व संभाव्यता (Profit and Probability):

Indian Man Counting Money

एका किलो डाळीत साधारण: 120 ते 150 पापड तयार होतात.

  • 1 किलो पापडांचा उत्पादन खर्च = ₹80 ते ₹100 रुपये
  • विक्री किंमत = ₹150 ते ₹200 रुपये प्रति किलो
  • नफा: प्रति किलो ₹50 ते ₹100 रुपये

उदाहरण गणित:

  • दररोज 5 किलो उत्पादन → 150 किलो प्रति महिना
  • निव्वळ नफा ₹7,500 ते ₹15,000 रुपये प्रति महिना
  • म्हणजेच, दररोज 5 किलो उत्पादन करून विक्री केली, तर महिन्याला ₹7,000 ते ₹15,000 रुपये इतका निव्वळ नफा मिळू शकतो.

Note: फेस्टिवल सीझनमध्ये मागणी वाढल्याने उत्पन्नही वाढते.

व्यवसाय वाढवण्यासाठी काही स्पेशल टिप्स by Majha Udyogg:

Papads in Plate (Papad Business in Marathi)

  • वेगवेगळ्या प्रकारचे/चवीचे पापड बनवा (मसालेदार, साजूक, लोणच्याचा स्वाद)
  • ऑर्डरप्रमाणे खास पॅकिंग करा (500g, 1kg इत्यादी)
  • ग्राहकांकडून नेहमी फीडबॅक घ्या आणि आपली गुणवत्ता सुधारत राहा.
  • छोट्या रिटेलर्सशी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी टाय-अप करा.
  • YouTube चॅनेल किंवा ब्लॉगद्वारे मार्केटिंग करा.
  • Instagram वर Insta Reels बनवून Advertisement करा.
  • WhatsApp वर स्टेट्स ठेवा. व्यवसायाचा ग्रुप तयार करा
  • फेसबुकवर पेजद्वारे जाहिरात करा. व्यावसायिक ग्रुप्स जॉईन करा आणि तिथे आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करा. फेसबुक मार्केटप्लेस वर जाहिरात द्या.
  • Google Ads गूगल ऍड्सद्वारे आपल्या व्यवसायाचं प्रोमोशन करा.
  • Google My Business वर आपल्या व्यवसायाची प्रोफाईल तयार करा.

शासकीय योजना व कर्ज पर्याय (Government Schemes and Loan Options):

खाली काही योजना दिलेल्या आहेत, त्यांची आपण थोडक्यात वैशिष्ट्ये पाहूया.

PMEGP (Prime Minister’s Employment Generation Programme – प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना):

  • 15% ते 35% पर्यंत सबसिडी मिळते.
  • 5 लाख रुपयांपर्यंतच्या उद्योगासाठी मंजूरी.
  • पात्रता: 18 वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक सदर योजनेचा लाभ घेऊ शकतो.

प्रक्रिया: अर्ज → ट्रेनिंग → बँक कर्ज → व्यवसाय सुरू

तपशीलासाठी वाचा:

PMEGP योजनेविषयी संपूर्ण माहिती वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

मुद्रा लोन योजना:

  • 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज (शिशु, किशोर, तरुण वर्गवारीनुसार) मिळते.
  • EMI सुलभ योजना आहे.
  • कोणत्याही बँकेतून सदर योजनेसाठी अर्ज करता येतो.

महिला बचत गटांसाठी योजना:

  • राज्य शासन व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA) यांच्याकडून गटांना अनुदान/कर्ज.
  • सामूहिक व्यवसायांना अधिक प्राधान्य.

व्यवसाय नोंदणी व कायदेशीर बाबी (आवश्यक परवाने व नोंदणी):

  • आपण सुरुवातीला घरगुती स्तरावर सुरू करू शकता.
  • व्यवसाय वाढल्यावरती UDYAM Registration घ्या. UDYAM MSME नोंदणी सरकारी योजना व लाभांसाठी आवश्यक असते.
  • FSSAI खाद्य परवाना घ्या. खाद्य व्यवसायासाठी हा परवाना आवश्यक असतो. (₹100-₹500 खर्च येतो, ऑनलाईन अर्ज करता येतो.)
  • आपल्या व्यवसायाचे बँक खाते उघडा.
  • ब्रँड ट्रेडमार्क – तुमच्या पापड ब्रँडची ओळख ठेवण्यासाठी. आवश्यक असल्यास ट्रेड लायसन्स किंवा स्थानिक नोंदणी घ्या.
  • GST नोंदणी – २० लाखांपेक्षा जास्त उलाढालीसाठी आवश्यक असते.

निष्कर्ष (Conclusion): Papad Business in Marathi

Single Fried Papad (Papad Business in Marathi)

पापड व्यवसाय हा कमी गुंतवणुकीतून सुरू होणारा, नफा देणारा आणि मोठ्या प्रमाणात वाढवता येणारा उद्योग आहे. सुरुवातीला घरगुती स्तरावर सुरु करून पुढे लघु उद्योग स्तरावर आपण या व्यवसायाला वाढवू शकता. महिलांसाठी, विशेषतः घरबसल्या स्वावलंबी बनण्याचं स्वप्न बघणाऱ्या सर्वांसाठी, मग ते निवृत्त व्यक्ती असोत कि तरुण सुशिक्षित बेरोजगार, या सर्वांसाठी ही एक उत्तम संधी आहे. शासकीय योजनांचा लाभ घेऊन, योग्य नियोजन आणि मेहनतीने आपणही यशस्वी पापड उद्योजक बनू शकता.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

प्र. 1: पापड व्यवसाय सुरू करण्यासाठी किती भांडवल लागते?

उ: घरगुती स्वरूपात पापड व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹20,000 ते ₹50,000 इतके भांडवल पुरेसे असते. व्यावसायिक स्तरावर यासाठी ₹1 लाख ते ₹5 लाखांपर्यंत गुंतवणूक आवश्यक असते, मशीनरी आणि प्रमाणपत्रांनुसार खर्च ठरतो.

प्र. 2: पापड बनवण्यासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते?

उ: उडीद डाळ, साजूक तूप/तेल, खार, मिरे पूड, साखर, मीठ, मसाले, खाद्य रंग, पाणी इत्यादी कच्चा माल लागतो.

प्र. 3: घरूनच पापड व्यवसाय करता येतो का?

उ: होय, सुरुवातीला घरूनच पापड बनवता येतात. कमी जागेत, कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने उत्पादन करता येते.

प्र. 4: पापड व्यवसायासाठी कोणती नोंदणी आवश्यक आहे?

उ: Udyam (MSME) नोंदणी, FSSAI फूड लायसन्स, स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगरपालिका परवाना आणि जर आवश्यक असेल तर GST नोंदणी

प्र. 5: पापड कुठे विक्री करावी?

उ: स्थानिक किराणा दुकाने, आठवडे बाजार, ऑनलाइन मार्केटप्लेस (Amazon, Flipkart, WhatsApp, Instagram), स्व:ताचा ब्रँड तयार करून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवा.

प्र. 6: पापड वाळवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागते?

उ: स्वच्छ, हवेशीर आणि उष्ण जागा आवश्यक असते. पावसाळ्यात सौर ड्रायर किंवा इलेक्ट्रिक ड्रायरचा वापर करावा.

प्र. 7: सरकारकडून कोणत्या योजना उपलब्ध आहेत?

उ: PMEGP (प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना), MUDRA लोन योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM), महिला बचत गट सहाय्य योजना

प्र. 8: पापड शिजवण्याची पद्धत कोणती असते?

उ: पापड फ्राय करून किंवा मायक्रोवेव/ओव्हनमध्ये भाजून खाल्ले जातात. घरी वापरण्यासाठी तेलात तळून खाणे अधिक प्रचलित आहे.

प्र. 9: पापड व्यवसाय फायदेशीर आहे का?

उ: होय, कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवता येणारा व्यवसाय आहे. योग्य मार्केटिंग आणि दर्जा टिकवल्यास सतत उत्पन्न मिळवता येते.

टीप: ही FAQ यादी वाचकांच्या शंका दूर करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. जर तुम्हाला अजून काही शंका असतील, तर खाली कमेंटमध्ये जरूर विचारा किंवा आमच्याशी संपर्क साधा.

मित्रांनो, आपला हा लेख आपण इथेच संपवत आहोत. हा लेख आपल्याला जर उपयोगी वाटला तर कृपया आपल्या सोशल मीडिया ग्रुप्समध्ये शेअर करा.

आणखी वाचा:

घरूनच साडी व्यवसाय सुरू करा


मोबाईल रिपेअरिंग आणि ॲक्सेसरीज विक्री व्यवसाय सुरू करून महिना अंदाजे ₹75,000 पर्यंत उत्पन्न कमवा


अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू करून पैसे कमवा


सुगंधी क्ले मातीची खेळणी सोपा बनवण्याचा व्यवसाय सुरू करा