Pan Aadhar Card Lost Guide – नमस्कार, आपल्या सर्वांचं माझा उद्योग वरती हार्दिक स्वागत आहे. आजच्या डिजिटल युगात पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) ही ओळखपत्रं प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाची झाली आहेत; एव्हाना, यापुढे जाऊन असंही म्हणता येईल की, भारतात या दोन महत्त्वाच्या कार्डसशिवाय कोणतेही महत्वाचे कार्य करता येत नाहीत.
तर मुद्दा असा आहे की, हे कार्ड्स हरवले तर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते – बँकचे व्यवहार, सरकारी सेवा संबंधित कामे, KYC प्रक्रिया, आयकर, इत्यादी सर्व शासकीय आणि आर्थिक संबंधाची कामे थांबतात. बँक व्यवहार, सरकारी योजनांचा लाभ, नोकरीसाठी अर्ज, पासपोर्ट, KYC प्रक्रिया, शिक्षणातील प्रवेश, मोबाईल कनेक्शन, इत्यादी गोष्टींसाठी ही दोन्ही कागदपत्रं फार आवश्यक असतात, हे वेगळं सांगायला नको! हे तर आपल्याला माहितच आहे.
जर ही दोन्ही महत्वाची कागदपत्रं हरवली, चोरी झाली किंवा कुठे विसरली गेली, तर सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात खूप मोठा अडथळा निर्माण होतो. म्हणूनच या लेखात आपण पॅन कार्ड आणि आधार कार्ड हरवल्यास, गहाळ झाल्यास काय करावे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि नवीन किंवा डुप्लिकेट कार्ड मिळवण्याची ऑनलाइन व ऑफलाइन प्रक्रिया कशी आहे हेही पाहणार आहोत. तसेच काही सुरक्षिततेच्या सूचना ही आपल्याला देऊ, ज्याचा फायदा आपल्याला पुढे होईल. चला तर मग सुरू करुया!
दोन भागात आपण ही माहिती पाहूया. पहिल्या भागात पॅन कार्डविषयी आणि दुसऱ्या भागात आधार कार्डविषयी माहिती दिली आहे.
भाग 1: पॅन कार्ड हरवल्यास काय करावे? Pan Aadhar Card Lost Guide

पॅन कार्डचे महत्त्व काय?
PAN (पॅन) म्हणजे Permanent Account Number – जो 10 अंकी अल्फान्यूमेरिक (अक्षरं आणि अंक असलेला) नंबर असतो आणि भारतात आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक असतो. बँक खाते उघडणे, फिक्स डिपॉझिट, शेअर मार्केट संबंधित व्यवहार, आयकर विवरणी, सरकारी योजना – यासाठी पॅन अनिवार्य आहे.
पॅन कार्ड गहाळ झाल्यास सुरुवातीला काय करावे? Pan Aadhar Card Lost Guide
- सर्वप्रथम शांत राहा आणि पहिल्यांदा खात्री करा की पॅन कार्ड खरंच हरवलं आहे की नाही.
- आधी घरात, ऑफिसमध्ये किंवा कपड्यांमध्ये शोधा. अशा जागी खासकरून शोधा, जिथे तुम्ही सहसा महत्वाच्या वस्तू ठेवता.
- जेव्हा पॅन कार्ड कुठेच सापडत नाही, तेव्हा तुम्ही Duplicate PAN Card साठी अर्ज करू शकता. त्यासाठी खाली दिलेली प्रक्रिया फॉलो करा.
FIR दाखल करा (जर तुम्हाला चोरी गेल्याचा संशय असेल तर):
जर तुम्हाला असं ठामपणे वाटत असेल की, तुमचं पॅन कार्ड चोरीला गेलं आहे, तर तुम्ही आपल्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये FIR नोंदवू शकता.
ही FIR बँक, IT विभाग, किंवा इतरत्र तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झाल्यास तुमचं संरक्षण करते.
गैरवापर टाळण्यासाठी, बँकेला, तुमच्या ब्रोकरला व इतर वित्तीय संस्थांना पॅन हरवला आहे हे अगोदरच कळवा.
आवश्यक कागदपत्रं:
- पॅन क्रमांक (म्हणजेच तुमचा जुना पॅन नंबर तुम्हाला माहिती असावा)
- आधार कार्ड (KYC करण्यासाठी आवश्यक आहे)
- मोबाईल नंबर (जो आधारशी लिंक आहे, तो मोबाईल नंबर पाहिजे. कारण याच नंबरवर OTP येईल)
डुप्लिकेट पॅन कार्ड मिळवण्याची ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धती (NSDL/UTIITSL):
ऑनलाईन पद्धत:
स्टेप बाय स्टेप प्रक्रिया (NSDL Portal):
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://tinpan.proteantech.in/
- “Reprint of PAN Card” किंवा “Apply for Duplicate PAN” या पर्यायावर क्लिक करा.
- फॉर्ममध्ये खालील माहिती भरा:
- पॅन नंबर
- तुमचे पूर्ण नाव
- तुमची जन्मतारीख
- मोबाईल नंबर
- आधार क्रमांक (जर लिंक असेल तर)
- OTP द्वारे KYC पडताळणी करा.
- ₹50 ते ₹100 इतकं शुल्क ऑनलाइन भरा. शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.
- अर्ज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला Acknowledgement Number मिळतो.
- त्यानंतर 15–20 दिवसांत तुमचे Duplicate PAN Card पोस्टाने घरपोच येईल.
ऑफलाइन पद्धत:
- जवळच्या TIN-FC केंद्रावर (TIN-Facilitation Center) (NSDL/UTIITSL) येथे जा.
- फॉर्म 49A घ्या आणि “Request for Reprint of PAN” निवडा.
- आवश्यक कागदपत्रे द्या (पासपोर्ट साईज फोटो आणि KYC साठी इतर आवश्यक कागदपत्रे जसे की, आधार इत्यादी)
- शुल्क भरा आणि पावती घ्या.
भाग 2: आधार कार्ड हरवल्यास काय करावे? Pan Aadhar Card Lost Guide

आधार कार्डचे महत्त्व काय? Importance of Aadhar Card
आधार कार्ड हा 12 अंकी बायोमेट्रिक ओळख क्रमांक आहे. UIDAI (Unique Identification Authority of India) द्वारे हा क्रमांक जारी केला जातो. सरकारी योजनांपासून बँक KYC पर्यंत याचा उपयोग होतो. आधार कार्डचे आज प्रत्येक भारतीयांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असले, तरी नागरिकत्वाचा पुरावा म्हणून आधारला ग्राह्य धरले जात नाही. असे असले तरी, आधार क्रमांकचे महत्व कमी लेखता येत नाही.
आधार हरवल्यास किंवा चोरी झाल्यास काय करावे? Pan Aadhar Card Lost Guide
- सर्वप्रथम खात्री करा की कार्ड घरीच सापडते का. व्यवस्थित आठवा की, कार्ड आपण शेवटी कुठे बघितले होते? जवळच्या व्यक्तींजवळ चौकशी करा.
- शेवटी मिळतच नसेल तर UIDAI कडून डुप्लिकेट/ई-आधार मागवता येते.
- UIDAI च्या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करा: 1947
- पोलिस तक्रार करा: जर तुमच्या कार्डचा गैरवापर होईल अशी आपल्याला भीती वाटत असल्यास आपण FIR नोंदवू शकता.
- ई-आधार डाउनलोड करा: तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर ई-आधार लगेच मिळवू शकता.
ऑनलाईन ई-आधार डाऊनलोड कसे कराल? How To Download e-Aadhar?
ई-आधार डाऊनलोड करण्यासाठी पुढील दोन गोष्टी आवश्यक आहेत:
- आधार क्रमांक / एनरोलमेंट आयडी
- मोबाईल नंबर (जो आधारबरोबर लिंक आहे)
Step By Step Process:
- UIDAI ची अधिकृत वेबसाइट उघडा. https://myaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar/en
- “Download Aadhaar” या पर्यायावर क्लिक करा.
- Aadhaar नंबर / Enrolment ID / VID यापैकी एक माहिती भरा.
- यानंतर Captcha कोड भरा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आता एक OTP आलेला असेल.
- हा OTP टाकून ई-आधार PDF डाउनलोड करा.
जी PDF आता डाऊनलोड होईल ती संरक्षित असते, तिला ओपन करण्यासाठी खालील प्रक्रिया फॉलो करा.
PDF उघडण्यासाठी पासवर्ड:
तुमच्या नावातील पहिली 4 Capital अक्षरं + जन्म वर्ष
उदा. जर आपलं कोमल नाव असेल तर KOMA1998 असा पासवर्ड टाकावा लागेल, त्यानंतर PDF अनलॉक होईल.
डुप्लिकेट PVC (Poly Vinyl Chloride) आधार कार्ड मागवण्यासाठी प्रक्रिया:
जर तुम्हाला प्रिंटेड PVC आधार कार्ड हवे असेल, तर खालील प्रक्रिया फॉलो करा:
- सर्वप्रथम या लिंकवरती जा: https://myaadhaar.uidai.gov.in/genricPVC
- आपला आधार क्रमांक टाका.
- OTP येईल तो टाका.
- ₹50 ऑनलाईन शुल्क भरा.
- आपले कार्ड 7–15 दिवसांत पोस्टाने घरी येऊन जाईल.
कार्ड्स आणि कागदपत्रे सुरक्षित करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना: Pan Aadhar Card Lost Guide

खाली काही उपाय दिलेले आहेत ज्यांचा वापर करुन आपण आपले कार्ड्स आणि इतर कागदपत्रे सुरक्षित करु शकता.
डिजिटल कॉपी:
आधार कार्ड किंवा पॅन कार्डची एक PDF (Portable Document Format) कॉपी बनवा आणि तिला Google Drive किंवा Email मध्ये ठेवा.
PDF कॉपी बनवण्यासाठी डाक्युमेंट किंवा कार्डचा मोबाईलमध्ये चांगला, स्पष्ट फोटो काढून घ्या. मग एखाद्या ॲपद्वारे आपण त्या फोटोला PDF मध्ये रुपांतरीत करु शकता. दुसऱ्या पद्धतीने करायचे झाल्यास, सर्वप्रथम त्या फाईलला (फोटोला) ओपन करा. वरती ऑप्शन्सच्या बटणमध्ये आपल्याला ‘प्रिंट’ ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करुन “Save To Pdf” वर क्लिक करा. PDF कॉपी मोबाईलमध्ये सेव्ह होईल.
Google Drive मध्ये तुम्ही ही PDF कॉपी अपलोड करु शकता किंवा ई-मेल मध्ये Draft बनवून ठेवू शकता किंवा घरातील एखाद्या व्यक्तीच्या ई-मेल आयडीवर सेंड करुन ठेवू शकता. नंतर कधीही तुम्ही ती कॉपी डाऊनलोड करु शकता. अशाप्रकारे आपली कागदपत्रे सुरक्षित राहतील.
Digilocker:
भारत सरकारच्या Digilocker App मध्ये आपले सर्व कार्ड्स आणि इतर महत्वाची कागदपत्रे अपलोड करुन ठेवा. या ॲपमध्ये काही ऑप्शन्सद्वारे आपण आपल्याविषयी काही माहिती देऊन कागदपत्रे पुनर्प्राप्त ही करु शकतो. डाऊनलोड करण्यासाठी कृपया खालील लिंक्सवर क्लिक करा.
Google Play Store – येथे क्लिक करा
iOS App Store – येथे क्लिक करा
मूळ प्रतीचा वापर टाळा:
शक्यतो कार्डची छायाप्रती जिला आपण साधारण भाषेत झेरॉक्स कॉपी (Photocopy) म्हणतो, ती वापरत चला. मूळ कार्ड किंवा कागदपत्रं जपून ठेवा. गरज पडल्यासच मूळ प्रतीचा वापर करावा. आपण कार्डस किंवा कागदपत्रांची रंगीत प्रिंट काढून त्याला लॅमिनेशन करुन ही वापरु शकता.
चोरी झाल्यास:
कागदपत्रे किंवा कार्ड्स चोरी झाल्यास त्वरित पोलिस तक्रार करा. त्यांचा गैरवापर होणे टाळा. आपण वर्तमानपत्रांत कागदपत्रे किंवा कार्ड्स हरवल्याची माहिती देऊन लोकांना मदत करण्यासाठी आवाहन ही करु शकता.
इतर वापर:
पॅन कार्ड किंवा आधार कार्ड संपूर्ण विश्वास असलेल्या व्यक्तीकडेच ठेवा किंवा द्या. अनोळखी व्यक्तीला आपले महत्वाचे कार्ड्स देऊ नका, अशा व्यक्ती त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे सावध रहा.
महत्त्वाचे हेल्पलाईन नंबर:
खाली काही महत्वाचे क्रमांक दिले आहेत:
सेवा/ कार्ड प्रकार | हेल्पलाईन क्रमांक | ई-मेल/ वेबसाइट |
आधार कार्ड | 1947 | https://uidai.gov.in |
पॅन कार्ड | 1800 222 990 | https://tinpan.proteantech.in/ |
UTIITSL | 1800 222 180 | https://www.pan.utiitsl.com |
निष्कर्ष: Conclusion

पॅन आणि आधार कार्ड गहाळ होणं ही तशी तर सामान्य पण दुर्लक्ष न करण्यासारखी घटना आहे. पॅन किंवा आधार कार्ड हरवले तरी घाबरू नका. धीराने काम घ्या. घाबरून न जाता वर दिलेली ऑनलाइन प्रक्रिया, डुप्लिकेट अर्ज व इतर सुरक्षेचे उपाय वापरल्यास तुम्ही ही कागदपत्रं पुन्हा सहज मिळवू शकता. योग्य प्रक्रिया फॉलो केल्यास नवीन कार्ड मिळवणे सोपे आणि जलद असते.
तुमच्या माहितीसाठी हा लेख खास तयार केला आहे, जेणेकरून सामान्य मराठी नागरिकांना सरळ आणि खात्रीशीर मार्गदर्शन मिळावे. तुम्ही या लेखाची PDF कॉपी डाउनलोड करूनही ठेऊ शकता किंवा इतरांनाही शेअर करू शकता – कारण ही माहिती प्रत्येक भारतीयासाठी आवश्यक आहे.
सामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्र.1: माझा मोबाईल नंबर आधारसोबत लिंक नाही. मी ई-आधार डाऊनलोड करू शकतो का?
उत्तर: नाही. आधारसोबत लिंक असलेला मोबाईल नंबर OTP साठी आवश्यक आहे.
प्र.2: पॅन कार्ड गहाळ झाल्यावर माझं बँकेशी संबंधित काम थांबेल का?
उत्तर: हो, कारण KYC साठी पॅन आवश्यक असतो. पण डिजिटल कॉपी (PDF/Scan) असल्यास काही बँका स्वीकारतात.
प्र.3: दोन्ही कार्ड गहाळ झाले, तर आधी कोणता अर्ज करावा?
उत्तर: आधार कार्ड आधी मिळवा कारण त्याशिवाय पॅन रजिस्ट्रेशन/OTP होत नाही.
हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला का? तसेच तुम्हाला आणखी कोणत्या सरकारी सेवा किंवा कागदपत्रांबद्दल माहिती हवी आहे? आम्हाला admin@majhaudyogg.com वर ई-मेल करून नक्की कळवा!
तुमच्या प्रतिसादावरून आम्ही पुढील लेख तयार करू. तर पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसोबत!
धन्यवाद!
अस्वीकरण (Disclaimer):
ह्या लेखातील वरील सर्व माहिती अधिकृत वेबसाइट्स व शासकीय स्त्रोतांच्या आधारे दिली आहे. अधिकृत संकेतस्थळांवरून कृती करताना अचूक माहितीची खातरजमा स्वतः करून घेणे उचित ठरेल.
लेखक: शुभम गुंडूरकर (majhaudyogg.com)
श्रेणी: इतर
आणखी वाचा:
GST, UDYAM, FSSAI संपूर्ण नोंदणी प्रक्रिया