मोबाईल रिपेअरिंग आणि ॲक्सेसरीज विक्री व्यवसाय – कमी गुंतवणुकीत नफा कमावणारा हमखास उद्योग | Mobile Repairing and Accessories Sale Business – Earn Good Profit By Investing Less Amount

Mobile Repairing and Accessories Business – आज मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. गाव असो किंवा शहर, तरुण असो किंवा वृद्ध – प्रत्येकाकडे आज मोबाईल असतो. त्यामुळे मोबाईल रिपेअरिंग आणि मोबाईल ॲक्सेसरीज विक्री यांचा व्यवसाय ही काळाची गरज बनली आहे. हा व्यवसाय कमी भांडवलात सुरू करता येतो आणि सतत मागणी असल्यामुळे यामधून चांगला नफा ही कमावता येतो. चला तर मग या व्यवसायाची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Table of Contents

व्यवसायाची ओळख: Mobile Repairing and Accessories Business

Parts of a Mobile

मोबाईल रिपेअरिंग हा सेवा आधारित व्यवसाय असून त्यात कौशल्य फार महत्त्वाचे असते. ॲक्सेसरीज विक्री (Accessories Sale) ही प्रॉडक्ट-बेस्ड (Product Based) बाब असल्यामुळे यामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करून विक्री करावी लागते. दोन्ही प्रकार एकत्र केल्यास ग्राहकांसाठी सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतात आणि व्यवसाय वाढीस लागतो.

आज भारतात दरवर्षी कोट्यवधी मोबाईल फोन विकले जातात. प्रत्येक मोबाईल वापरकर्ता एक वेळा तरी आपल्या मोबाईलसाठी रिपेअरिंग किंवा ॲक्सेसरीज खरेदी करतो. त्यामुळे हा व्यवसाय संपूर्ण भारतात खूप जलद वेगाने वाढतो आहे. गावातील छोट्या दुकानापासून ते शॉपिंग मॉल्समधील स्टॉलपर्यंत, हा व्यवसाय सर्वत्र दिसतो. त्यामुळे हा व्यवसाय शहरांपुरता मर्यादित न राहता, ग्रामीण भागातही नफा कमावण्याची संधी देतो.

व्यवसाय कसा सुरू करावा? Mobile Repairing and Accessories Business

Mobile Technician repairing a mobile

प्रशिक्षण घ्या:

मोबाईल रिपेअरिंग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सुरुवातीला नीट प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. प्रशिक्षणामध्ये तुम्हाला खालील बाबी शिकवल्या जातात:

  • स्मार्टफोनचे विविध भाग (IC, Motherboard, Battery, Screen इत्यादी.)
  • सोल्डरिंग, डिसोल्डरिंग प्रक्रिया
  • सॉफ्टवेअर समस्या सोडवणे (Formatting, Operating System Update – OS update)
  • डायग्नोस्टिक टूल्स (Diagnostic Tools) वापरणे

प्रशिक्षण घेण्याची ठिकाणं:

  • मोबाईल रिपेअरिंग शिकण्यासाठी तुम्ही सरकारी प्रशिक्षण केंद्रातून ITI कोर्स करू शकता किंवा स्थानिक प्रशिक्षण संस्थांमधून शिकू शकता.
  • खाजगी मोबाईल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (Jetking, Hi-Tech, Prizm Institute इ.)
  • ऑनलाइन कोर्स (Udemy, YouTube, Coursera इत्यादी). यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील मोबाईल रिपेअरिंगचे कोर्स उपलब्ध आहेत.

दुकान निवडा:

दुकान निवडताना स्थान ठरवणं फार महत्त्वाचं आहे. लोकांच्या येण्या-जाण्याच्या ठिकाणी म्हणजेच गर्दीचे ठिकाण, बाजार, शाळा, कॉलेज, बस स्टँड, रेल्वे स्टेशन जवळ असेल तर ग्राहकांची संख्या जास्त असते. अशा जागेवर दुकान घ्या. सुरुवातीला 100 ते 150 चौरस फुटांचे दुकान चालेल. एवढी जागा पुरेशी आहे. दुकानात टेबल, खुर्ची, एक प्रदर्शन स्टँड, फळ्यावर फलक वाजवी किंमतीत असायला हवा.

नोंदणी आणि परवाने:

  • Udyam नोंदणी (MSME): यामुळे तुम्हाला बँकेचे कर्ज, सरकारची योजना मिळवणे सोपे होते.
  • GST नोंदणी: जर तुमचे उत्पन्न ₹20 लाखांपेक्षा जास्त झाले तर आवश्यक
  • शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट लायसन्स: स्थानिक नगरपालिका/ग्रामपंचायतकडून. दुकानासाठी स्थानिक ग्रामपंचायत/नगरपरिषदेची परवानगी आवश्यक असते.

अधिक माहितीसाठी हे वाचा – GST, UDYAM, FSSSAI Registration प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती

लागणारी भांडवली गुंतवणूक: Mobile Repairing and Accessories Business

खर्चाचे प्रकारअंदाजे किंमत (₹)
दुकान भाडे/जमा रक्कम₹5,000 – ₹15,000
रिपेअरिंग टूल्स किट₹8,000 – ₹12,000
ॲक्सेसरीज स्टॉक (प्रारंभी)₹10,000 – ₹25,000
बोर्ड, लाईटिंग, खुर्च्या₹5,000 – ₹10,000
बॅनर, पॅम्पलेट, व्हिजिटिंग कार्ड₹1,000 – ₹2,000
बिलबुक, डेकोरेशन, इतर₹2,000 – ₹5,000
एकूण अंदाजे गुंतवणूक₹30,000 – ₹70,000

टीप: सुरुवातीस कमी स्टॉक घ्या, नंतर मागणीनुसार वाढवा.

कोणकोणत्या ॲक्सेसरीज विकू शकता? Mobile Repairing and Accessories Business

Multi Design Mobile Cases

मोबाईल ॲक्सेसरीजचे प्रकार खूप आहेत. काही वस्तू दररोज विकल्या जातात, तर काहींना हंगामानुसार मागणी असते:

  • मोबाईल कव्हर्स (Back Cover, Flip Cover, Designer Cover, Anime Cover)
  • स्क्रीन गार्ड (Tempered Glass, Privacy Glass)
  • चार्जर (Adapter), डेटा केबल्स, OTG कनेक्टर
  • इयरफोन (Wired, Wireless), ब्लूटूथ स्पीकर
  • स्पीकर, Bluetooth डिव्हाइसेस
  • पॉवर बँक, ट्रॅव्हल चार्जर, कार चार्जर
  • मोबाईल स्टँड, रिंग होल्डर, ट्रायपॉड्स
  • गेमिंग कंट्रोलर, गेमिंग बटन
  • स्मार्ट वॉच स्ट्रॅप्स, फिटनेस बँड
  • मोबाईल क्लिनिंग किट, लेंस क्लीनर

हे सर्व प्रॉडक्ट्स तुमच्या दुकानातून विकले, आणि ग्राहकांना सर्व्हिस चांगली दिली तर ग्राहक तुमच्याकडे पुन्हा-पुन्हा येतील.

पुरवठा कुठून करावा?

  • होलसेल बाजारपेठ (मुंबई – लॅमिंग्टन रोड, दिल्ली – करोल बाग)
  • ऑनलाइन होलसेल पोर्टल (Udaan, IndiaMART, B2B Mart)

अजून वाचा – अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरु करावा?

कमाई किती होऊ शकते? Mobile Repairing and Accessories Business

मोबाईल रिपेअरिंगमध्ये सर्वात मोठा फायदा म्हणजे सेवा शुल्क. सर्वसामान्य लोक मोबाईलसाठी रोज काही ना काही समस्या घेऊन येत असतात. त्यात स्क्रीन बदली, बॅटरी बदल, चार्जिंग इश्यू, सॉफ्टवेअर अपग्रेड यांसारख्या समस्या असतात. तसेच इतर मोबाईल ॲक्सेसरीज घेण्यासाठीही ग्राहक नेहमीच येत असतात.

उत्पन्नाचा अंदाज:

  1. रिपेअरिंग फिक्सिंग/ रिपेअरिंग शुल्क: ₹100 ते ₹2,000 प्रति ग्राहक/प्रति मोबाईल (प्रॉब्लेमनुसार)
  2. ॲक्सेसरीज विक्री: 30% – 100% पर्यंत नफा
  3. दिवसाकाठी 10 ग्राहक असल्यास सरासरी ₹1,000 – ₹2,000 रूपये रोजचे उत्पन्न शक्य
  4. महिन्याचे उत्पन्न: ₹30,000 – ₹75,000 उत्पन्न शक्य (ठिकाण आणि सेवा गुणवत्तेनुसार)
  • लहान शहरात: ₹25,000 – ₹40,000
  • मध्यम शहरात: ₹50,000 – ₹75,000

अनुभवी लोकांनी या व्यवसायात महिन्याला ₹1 लाखापर्यंत कमाई केलेली आहे.

नफा वाढवण्यासाठी काही टिप्स:

खाली काही चांगले पर्याय दिलेले आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही आपला नफा वाढवू शकता.

कस्टमायझ्ड बॅक कव्हर प्रिंटिंग

ग्राहकांच्या मर्जीनुसार मोबाईल बॅक कव्हर प्रिंट करुन द्यायची सुविधा द्या. त्यात ग्राहक  स्वतःचा किंवा आपल्या मित्रमंडळींचा, आवडत्या व्यक्तींचा फोटो आपल्याला बॅक कव्हरवर प्रिंट करण्यासाठी देतील. कस्टमाईज्ड बॅक कव्हर गिफ्ट म्हणून ही देता येतात. अनेकजण स्वतःसाठी ही वापरतात. त्यामुळे ग्राहकांना ही सुविधा देणं आपल्याला फायद्याचं ठरेल.

मोबाईल इन्शुरन्स रजिस्ट्रेशन सेवा

मोबाईलचा आणि मोबाईलशी संबंधित काही ॲक्सेसरीजचा इन्शुरन्स (Secure Plan) ही करता येतो. यामध्ये मोबाईलच्या स्क्रीन संबंधित इश्यू, Manufacturing/Internal Defect, वॉरंटी वाढवून देणे (Extended Warranty) यांसारख्या गोष्टी येतात. थर्ड पार्टी वेबसाईट्स/कंपनींद्वारा मोबाईल इन्शुरन्स करुन मिळतो. यात आपण इन्शुरन्स कंपन्यांकडून कमीशन ही मिळवू शकता.

रिचार्ज/बिल पेमेंट/DTH सेवा

ग्रामीण भागात अनेकांना रिचार्ज किंवा बील पेमेंट करणे माहिती नसते. अशावेळेस तुमच्या दुकानामार्फत तुम्ही ह्या सेवा प्रदान करुन त्यावर शुल्क मिळवू शकता.

मोबाईल एक्सचेंज किंवा रिफर्बिश विक्री

अनेक ग्राहकांना आपला जुना मोबाईल विकून नवीन मोबाईल घ्यावासा वाटतो. तेव्हा तुम्ही अशा ग्राहकांचा सेकंड हॅंड मोबाईल विकत घेऊन व ते योग्य आणि गरजू ग्राहकांना विकून नफा कमावू शकता.

हे सुध्दा वाचा – घरच्या घरी साडी व्यवसाय कसा सुरु कराल?


मार्केटिंग कसे करावे? Mobile Repairing and Accessories Business

ग्राहक मिळवण्यासाठी आणि ब्रँड ओळख निर्माण करण्यासाठी मार्केटिंग अति-आवश्यक आहे:

  • आपल्या दुकानासमोर आकर्षक, लक्षवेधी फलक लावा.
  • शाळा, कॉलेज परिसरात पॅम्फलेट्स वाटा.
  • लोकल बातम्यांमध्ये किंवा छोट्या मॅगझिनमध्ये जाहिरात द्या.
  • सोशल मीडियावर (Facebook Page, Instagram) अकाऊंट्स तयार करुन तुमच्या दुकानाची माहिती शेअर करा.
  • WhatsApp ग्रुप तयार करा – ग्राहकांना नवीन प्रॉडक्ट्सचे अपडेट द्या. ऑफर्स शेअर करा. तुम्ही Whatsapp Business Account ही उघडू शकता. याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • Facebook Page, Instagram वर ऑफर्सचे फोटो शेअर करा.
  • “Buy 2 Get 1 Free” किंवा “Installation Free” सारख्या ऑफर्स ठेवा
  • विश्र्वासू सेवा दिल्यास “मौखिक जाहिरात” (word of mouth) होईल आणि ग्राहकांची संख्या वाढेल.

हे वाचा – WhatsApp Business App विषयी संपूर्ण माहिती आणि सेटअप प्रक्रिया

यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स: Mobile Repairing and Accessories Business

  • वेळेवर आणि पारदर्शक, दर्जेदार सेवा द्या – एकदाचा ग्राहक, कायमचा ग्राहक बनवण्याचा प्रयत्न करा
  • प्रामाणिक व्यवहार ठेवा – खोट्या दोषांचे भानगडीत पडू नका. फालतू चार्ज लावू नका.
  • ग्राहकांची माहिती जतन करा (CRM वापरा) – मोबाईल नंबर, व्हॉट्सअ‍ॅप अपडेटसाठी
  • वेळेवर स्टॉक रिफिल करा. वेळोवेळी नवीन ऍक्सेसरीजचा स्टॉक ठेवा.
  • तांत्रिक ज्ञान अपडेट करत रहा. नवीन मोबाईल टेक्नोलॉजीबद्दल अपडेट राहा (नवीन ब्रँड आणि मॉडेल्स, OS बदल, अपडेट्स)

सरकारी योजना आणि फायदे:

PMEGP योजना:

  • https://www.kviconline.gov.in/pmegp/ वर जाऊन अर्ज करा.
  • प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत नवउद्योजकांसाठी कर्ज व सबसिडी मिळू शकते.
  • सूक्ष्म उद्योजकांना ₹50,000 ते ₹10 लाखांपर्यंत कर्ज
  • 15% – 35% पर्यंत सबसिडी (SC/ST, महिला, ग्रामीण क्षेत्रांसाठी जास्त)

हे वाचा – PMEGP योजनेविषयी संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया

मुद्रा लोन योजना:

  • शिशु (₹50,000 पर्यंत), किशोर (₹5 लाख), तरुण (₹10 लाख पर्यंत)
  • कोणतीही गहाण आवश्यकता नाही.

Skill India/PMKVY:

  • कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत. Skill India योजनेअंतर्गत मोबाईल रिपेअरिंगचे मोफत कोर्सेस उपलब्ध आहेत.
  • यात तुम्हाला प्रमाणपत्र मिळते जे बँकेकडून कर्जासाठी उपयुक्त ठरते.

प्रेरणादायी यशोगाथा:

नंदन पाटील (कोल्हापूर) यांनी वयाच्या २२व्या वर्षी ₹15,000 मध्ये मोबाईल रिपेअरिंग टूल्स विकत घेऊन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला मित्रमंडळींचे मोबाईल रिपेअर करून त्यांनी अनुभव घेतला. नंतर स्टेशनजवळ एक छोटे दुकान घेतले. आज त्यांच्या दुकानातून दररोज 15-20 रिपेअरिंग ऑर्डर्स येतात आणि महिन्याला सरासरी ₹60,000 पेक्षा जास्त कमाई होते.

सोनाली देशमुख, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) यांनी महिलांसाठी मोबाईल कव्हर डिझायनिंग व्यवसाय सुरू केला. त्यांनी घरून ऑनलाइन ऑर्डर्स घेण्यास सुरुवात केली आणि आज त्यांच्या Instagram पेजवर 20,000 फॉलोअर्स आहेत. त्या फक्त महिलांसाठी आकर्षक ऍक्सेसरीज पुरवतात.

आणखी वाचा – घरबसल्या पापड उद्योग सुरू करा

निष्कर्ष:

Internal Parts of a Mobile

मोबाईल रिपेअरिंग आणि ॲक्सेसरीज विक्री व्यवसाय हा कमी भांडवलात सुरू होणारा आणि सातत्याने वाढणारा उद्योग आहे. जर तुमच्यात मेहनत करण्याची तयारी असेल, शिकण्याची तयारी असेल, आणि ग्राहकांना चांगली सेवा देण्याची वृत्ती असेल – तर हा व्यवसाय तुम्हाला आर्थिक स्वावलंबनाकडे घेऊन जाईल.

या व्यवसायात नवीन काहीतरी करून दाखवण्याची संधी आहे – डिजिटल पेमेंट, हाय टेक रिपेअरिंग, ऑनलाइन ॲक्सेसरीज शॉप इत्यादी. त्यामुळे तुम्ही या प्रवासाची सुरुवात आजच करा!

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) – मोबाईल रिपेअरिंग आणि अ‍ॅक्सेसरीज विक्री व्यवसाय

1. मोबाईल रिपेअरिंग व्यवसाय सुरू करायचा असेल तर काय शिकावं लागतं?

A. तुम्ही मोबाइल रिपेअरिंग कोर्स करणे आवश्यक आहे. बेसिक रिपेअरिंग, सोल्डरिंग, स्क्रीन बदलणे, IC रिप्लेसमेंट, सॉफ्टवेअर फ्लॅशिंग यासारख्या गोष्टी शिकाव्या लागतात.

2. हा कोर्स कुठे शिकता येतो?

A. सरकारी ITI, खाजगी इन्स्टिट्यूट्स, तसेच MSME मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्रांमध्ये मोबाईल रिपेअरिंग कोर्स शिकता येतो.

3. मोबाईल रिपेअरिंग दुकान सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक लागते?

A. साधारणतः ₹50,000 ते ₹2 लाखांदरम्यान भांडवल लागते, त्यात दुकान भाडं, टूल्स, स्टॉक, आणि फर्निचरचा समावेश होतो.

4. मोबाईल अ‍ॅक्सेसरीज विक्रीसाठी कोणत्या वस्तू लागतात?

  • चार्जर्स
  • हेडफोन/इअरफोन
  • मोबाईल कव्हर्स
  • स्क्रीन गार्ड
  • Bluetooth स्पीकर्स
  • स्मार्ट वॉचेस
  • OTG, डेटा केबल
  • मोबाईल स्टँड, होल्डर
  • पॉवर बँक

5. हे सामान कुठून खरेदी करता येते?

A. होलसेल मार्केट (मुंबई – लमिंग्टन रोड, दिल्ली – करोल बाग), B2B साइट्स (Indiamart, Udaan, Beldara), किंवा थेट डिस्ट्रीब्युटर्सकडून खरेदी करता येते.

6. मोबाईल रिपेअरिंगसाठी कोणते टूल्स आवश्यक आहेत?

  • स्क्रू ड्रायव्हर सेट
  • हीट गन
  • मल्टीमीटर
  • सोल्डरिंग किट
  • डिस्प्ले ओपनिंग टूल्स
  • ग्लू गन
  • LCD सेपरेटर मशीन
  • सॉफ्टवेअर फ्लॅशिंग डिव्हाइस

7. व्यवसायाची परवाना/नोंदणी आवश्यक आहे का?

A. हो. दुकान व्यवसाय असल्याने Shop Act License (गुमास्ता), Udyam नोंदणी, GST नोंदणी (जर उत्पन्न ₹20 लाखांपेक्षा जास्त असेल तर) आवश्यक आहे.

8. मोबाईल रिपेअरिंग व्यवसाय नफा देणारा आहे का?

A. हो. जर तुम्ही दर्जेदार सेवा, योग्य दर, आणि ग्राहक विश्वास मिळवला तर मोबाईल रिपेअरिंग आणि अ‍ॅक्सेसरीज विक्रीमधून चांगला नफा मिळू शकतो.

9. डिजिटल पेमेंट सुविधा द्यावी का?

A. हो. ग्राहकांसाठी UPI, Google Pay, PhonePe, QR कोडद्वारे पेमेंट घेण्याची सुविधा दिल्यास विक्री वाढते आणि विश्वास निर्माण होतो.

10. मोबाईल रिपेअरिंगसाठी अनुभव नसल्यास काय करावे?

A. तुम्ही पहिल्यांदा कोर्स करून काम शिकावं आणि काही महिन्यांसाठी अनुभवी दुकानात ट्रेनिंग घ्यावं. त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करावा.

11. फक्त अ‍ॅक्सेसरीज विक्री करूनही व्यवसाय करता येतो का?

A. हो. जर तुमच्याकडे स्थानिक बाजारपेठ आहे आणि योग्य किंमतीत दर्जेदार अ‍ॅक्सेसरीज मिळवता येत असतील, तर फक्त विक्री व्यवसायही फायदेशीर ठरतो.

12. ऑनलाईन विक्री करता येते का?

A. हो. तुम्ही Instagram, WhatsApp, Facebook Page किंवा थेट Amazon, Flipkart, Meesho वरून अ‍ॅक्सेसरीज विक्री सुरू करू शकता.

13. स्पेअर पार्ट्स कुठून घ्यावेत?

A. डिस्प्ले, बॅटरी, चार्जिंग जॅक, IC वगैरे स्पेअर पार्ट्स तुम्ही इंडियामार्ट, Udaan, किंवा स्थानिक वितरकांपासून घाऊक दरात घेऊ शकता.

14. व्यवसायात कोणत्या चुका टाळाव्यात?

  • कमी दर्जाचे पार्ट्स वापरणे
  • ग्राहकांची फसवणूक करणे
  • वेळेवर काम न करणे
  • मोबदला ठरवताना स्पष्टता न ठेवणे
  • वारंटी न देणे
  • अडथळे आल्यावर तांत्रिक मदतीचा अभाव ठेवणे

15. मोबाईल व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळू शकते का?

A. हो. PMEGP, Mudra Loan योजनेतून मोबाईल रिपेअरिंग किंवा अ‍ॅक्सेसरीज व्यवसायासाठी कर्ज मिळवता येते.

हा लेख तर आता आपण वाचलेलाच आहे, तर आपल्या मित्रमंडळींसोबत, नातेवाईक किंवा ओळखीतल्या गरजू व्यक्तींबरोबर हा लेख नक्की शेअर करा. आपण स्वतः हा उद्योग सुरू करा किंवा इतरांना त्यासाठी प्रोत्साहित करा!

तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर संपर्क करा – admin@majhaudyogg.com आम्ही नक्की मार्गदर्शन करू.

लेखक: शुभम गुंडूरकर (majhaudyogg.com)
श्रेणी: उद्योग

majhaudyogg.com – तुमच्या उद्योजकीय प्रवासाचा खरा मार्गदर्शक!