GST, UDYAM, FSSAI – व्यवसायासाठी आवश्यक महत्वाच्या नोंदणी प्रक्रिया (मराठीत संपूर्ण मार्गदर्शन) | GST, UDYAM, FSSAI Registration Info in Marathi

खालील बटणांद्वारे Share करा:

GST UDYAM FSSSAI Registration – कोणताही नवीन व्यवसाय सुरू करताना केवळ वस्तू उत्पादन किंवा सेवा तयार करून विकणे पुरेसे नसते. त्या व्यवसायाची कायदेशीर ओळख म्हणजेच व्यवसाय अधिकृतपणे नोंदणीकृत असणे फार महत्त्वाचे असते. सरकार दरबारी वैध व्यवसाय मान्यता मिळवण्यासाठी आणि सरकारच्या विविध योजनांचा तसेच कर्ज, सबसिडी आणि कायदेशीर संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी काही नोंदणी प्रक्रिया अनिवार्य असतात.

आपण आज खालील तीन महत्त्वाच्या नोंदणी प्रक्रियेवर संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत:

  1. UDYAM नोंदणी (MSME)
  2. GST नोंदणी (Goods and Services Tax)
  3. FSSAI नोंदणी (Food Business Operators साठी)

तसेच पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्याला या पोस्टमध्ये मिळतील:

  • UDYAM Registration: काय आहे, नोंदणी कशी करायची, नोंदणी केल्यास मिळणारे फायदे इत्यादी.
  • GST Registration: कोणासाठी आवश्यक आहे, नोंदणी प्रक्रिया, नोंदणी केल्यानंतर मिळणारे फायदे.
  • FSSAI Registration: अन्न व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती.
  • वरील सर्व नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे
  • सल्ला: सुरुवातीला कोणती नोंदणी करावी?

Table of Contents

1. UDYAM नोंदणी (MSME/Udyog Aadhaar)

Indian Ministry of MSME (Micro, Small & Medium Enterprises) Icon

UDYAM म्हणजे काय?

Micro, Small & Medium Enterprises (MSME) साठीची UDYAM ही अधिकृत नोंदणी प्रक्रिया आहे. ही नोंदणी भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाकडून (MSME) दिली जाते. पूर्वी याला Udyog Aadhaar Registration म्हणत, आता ही नोंदणी फक्त https://udyamregistration.gov.in वरच होते.

कोणाला नोंदणी करावी लागते?

  • घरगुती लघु व्यवसाय करणारे (लोणचं, मसाले, बेकरी इत्यादी.)
  • सर्व्हिस प्रोव्हायडर (सेवा उद्योग) – डिजिटल सर्व्हिसेस, टायपिंग सेंटर, फ्रीलान्सर, शिलाई इत्यादी.
  • सूक्ष्म व मध्यम उत्पादन उद्योग

UDYAM नोंदणी कशी करावी? (Step-by-Step Process):

1. अधिकृत वेबसाइट उघडा: https://udyamregistration.gov.in

2. “New Udyam Registration” वर क्लिक करा.

3. आपला आधार नंबर टाका आणि OTP द्वारे व्हेरिफाय करा.

4. व्यवसायाचे नाव, पत्ता, उत्पन्न, गुंतवणूक इत्यादी माहिती भरा.

5. PAN नंबर आणि बँक तपशील भरा.

6. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र मिळते.

7. कोणतीही फी लागत नाही.

UDYAM नोंदणीचे फायदे:

  • बँक कर्जांवर व्याज सवलत. बँकेकडून कमी व्याजदराने कर्ज मिळते.
  • व्यवसायासाठी सरकारी योजना आणि सबसिडी (PMEGP आणि इतर योजनांचा लाभ)
  • MSME टेंडर्समध्ये प्राधान्य, टेंडरमध्ये आरक्षण.
  • वीज दर, रजिस्ट्रेशन फी यामध्ये सूट मिळते.
  • MSME सबसिडी, ट्रेनिंग प्रोग्राम्सचा लाभ

उदाहरण:

सपना नावाची गृहिणी मसाल्यांचे उत्पादन करते. ती UDYAM नोंदणी करून PMEGP योजनेतून ₹2 लाख कर्ज घेते. आता तिच्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळते आणि ती सरकारी ग्राहकांनाही सेवा देऊ शकते.

2. GST नोंदणी (Goods and Services Tax)

Goods and Service Tax Information Design

Goods and Service Tax (GST) म्हणजे काय?

Goods and Service Tax (GST) ही एक एकत्रित अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे, जी केंद्र व राज्य सरकारकडून आकारली जाते. व्यवसाय करताना तुम्ही वस्तू किंवा सेवा विकता तेव्हा GST लागू होतो. ग्राहक कोणतीही सेवा किंवा वस्तू विकत घेतात तेव्हा ते अप्रत्यक्षरित्या GST कर भरत असतात.

कोणासाठी आवश्यक?

  • ₹40 लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या वस्तू विक्रेत्यांना आवश्यक आहे.
  • ₹20 लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या सेवाकारांना आवश्यक आहे.
  • ई-कॉमर्सवर विक्री करणाऱ्या सेलर्सना आवश्यक आहे.
  • इंटरस्टेट व्यापार करणाऱ्या व्यावसायिकांना आवश्यक आहे.
  • बिले देण्यासाठी GST नंबर आवश्यक असल्यास.

GST नोंदणी प्रक्रिया कशी करावी? (Step-by-Step Process):

1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://www.gst.gov.in

2. “New Registration” वर क्लिक करा

3. PAN, मोबाइल नंबर, ईमेल आयडी टाका

4. व्यवसाय पत्ता, बँक डिटेल्स, बिझनेस प्रकार निवडा.

5. आधार OTP द्वारे ई-व्हेरिफिकेशन आवश्यक

6. प्रोपरायटर, पार्टनर किंवा कंपनीनुसार वेगळ्या कागदपत्रांची गरज असते.

7. प्रमाणपत्र मिळाल्यावर GSTIN (GST नंबर) दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे:

  • व्यवसायाचा पत्ता पुरावा (बिल/भाडे करार)
  • PAN कार्ड
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • फोटो

GST नोंदणी केल्यानंतर मिळणारे फायदे:

  • अधिकृत बिले तयार करता येतात. ज्यामुळे तुम्ही अधिकृत GST बिल देऊ शकता.
  • इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळतो (जेणेकरून टॅक्स कमी होतो).
  • व्यवसायाची विश्वासार्हता वाढते. ग्राहक व कंपन्यांमध्ये विश्वास निर्माण होतो.
  • सरकारी टेंडर व मोठ्या कंपनींसोबत व्यवहार करणे शक्य होते.

उदाहरण:

राज जाधव कपड्यांचा ऑनलाईन सेलर आहे आणि तो ई-कॉमर्स व्यवसाय करतो. त्याने GST नोंदणी केल्यामुळे तो Amazon आणि Flipkart वर व्यवसाय करू शकतो.

घरबसल्या साडी व्यवसाय कसा सुरू कराल? – येथे वाचा

PMEGP योजना 2025 संपूर्ण माहिती – येथे वाचा

3. FSSAI नोंदणी (Food Safety and Standards Authority of India)

FSSAI Logo

FSSAI म्हणजे काय?

Food Safety and Standards Authority of India (FSSAI) हे भारत सरकारचे अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण आहे. सर्व अन्न उत्पादन, प्रक्रिया, वितरण, विक्री व्यवसाय करणाऱ्यांना ही नोंदणी करणे अनिवार्य आहे. आपल्या उत्पादनावरील FSSAI मानांकन ग्राहकांच्या मनात विश्वासाहर्ता वाढवण्यात मदत करते.

कोणासाठी आवश्यक?

  • घरगुती अन्न व्यवसाय (जसे की लोणचं, बेकरी, मसाले इत्यादी.)
  • किराणा दुकान, हॉटेल, ढाबा, कॅन्टीन इत्यादी.
  • ऑनलाईन फूड डिलिव्हरी सर्व्हिसेस/पार्टनर्स (जसे की Swiggy, Zomato etc)
  • डेअरी, दूध विक्रेते, मांस विक्रेते

FSSAI नोंदणी प्रक्रिया कशी करावी? (Step-by-Step Process):

1. अधिकृत वेबसाइट ओपन करा: https://foscos.fssai.gov.in

2. “Apply for Registration/License” वर क्लिक करा.

3. व्यवसायाचा प्रकार, राज्य निवडा.

4. अर्ज भरा – व्यवसायाचे स्वरूप, मालकाचे तपशील, उत्पन्न, पत्ता इत्यादी माहिती भरा.

5. आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.

6. ऑनलाईन फी भरा आणि सबमिट करा.

7. 7–15 दिवसांत सर्टिफिकेट मिळते.

3 प्रकार (Basic, State, Central Registration):

Basic Registration: ₹12 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असणाऱ्यांसाठी

State License: ₹12 लाख ते ₹20 कोटी पर्यंत व्यावसायिक उलाढाल असणाऱ्यांसाठी

Central License: ₹20 कोटी पेक्षा जास्त किंवा इंटरस्टेट व्यापार करणाऱ्यांसाठी

FSSAI नोंदणीचे फायदे: GST UDYAM FSSSAI Registration

  • ग्राहकांमध्ये तुमच्या व्यवसायाबद्दल विश्वास वाढतो.
  • कायदेशीर सुरक्षा – कायदेशीर व्यवसाय मान्यता मिळते.
  • परदेशात निर्यात (Export) करण्यासाठी FSSAI लायसन्स अनिवार्य आहे.
  • सरकारी योजनांसाठी पात्रता – इतर सरकारी योजनांसाठी आवश्यक.

उदाहरण:

शिल्पा ताई घरी लोणचं बनवून विकतात. तिने FSSAI Basic Registration केल्यावर तिचा ब्रँड स्थानिक बाजारात लोकप्रिय होतो. आता ती किराणा दुकानांमध्ये उत्पादन पुरवते.

आवश्यक कागदपत्रे (सर्व नोंदणी साठी): GST UDYAM FSSSAI Registration

  • आधार कार्ड
  • PAN कार्ड
  • बँक पासबुक / खाते क्रमांक
  • व्यवसाय पत्त्याचा पुरावा (बिल, भाडे करार, इ.)
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • ईमेल आयडी व मोबाईल नंबर

सुरुवातीला कोणती नोंदणी करावी? GST UDYAM FSSSAI Registration

व्यवसायाचा प्रकारसुरुवातीस आवश्यक नोंदणी
फूड प्रोडक्ट विक्रीFSSAI + UDYAM
सर्व्हिस बेस्ड (डिजिटल/सेवा)UDYAM (GST जर मोठी उलाढाल असेल तर)
विक्री व ई-कॉमर्सGST + UDYAM
लघु उद्योग / फॅक्टरीUDYAM + GST + FSSAI (जर अन्न उत्पादन असेल तर)

तीन नोंदणींची तुलना: GST UDYAM FSSSAI Registration

निकषUDYAMGSTFSSAI
उद्देशउद्योगांची ओळखकर प्रणालीअन्न सुरक्षा
कोणासाठीसर्व लघु उद्योगसेवा व वस्तू विक्रेतेअन्न व्यवसाय
फीनाहीनाही (पण रिटर्न्स आवश्यक)₹100–₹7500 रुपये
फायदेसरकारी योजना, सबसिडीटॅक्स क्रेडिट, व्यापारी लाभअन्न मान्यता, कायदेशीर सुरक्षा

उपयुक्त सल्ला: GST UDYAM FSSSAI Registration

  • सुरुवातीस UDYAM नोंदणी करून शासकीय योजनांचा फायदा घ्या.
  • तुमचा व्यवसाय अन्नाशी संबंधित असेल तर लवकरात लवकर FSSAI नोंदणी घ्या.
  • GST नोंदणी फक्त गरज असेल तेव्हाच करा – कारण त्यानंतर दरमहा रिटर्न भरावे लागतात.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) GST UDYAM FSSSAI Registration

प्र. 1: मी घरीच मसाले बनवतो. मला तीन नोंदणी कराव्या लागतील का?
उ: सुरुवातीला FSSAI Basic आणि UDYAM नोंदणी पुरेशी आहे. GST फक्त जर तुमची उलाढाल जास्त असेल तरच आवश्यक.

प्र. 2: UDYAM नोंदणीशिवाय PMEGP योजना मिळते का?
उ: नाही. UDYAM नोंदणी आवश्यक आहे.

प्र. 3: GST नोंदणी केल्यावर रिटर्न्स भरावे लागतात का?
उ: हो. दरमहा/त्रैमासिक रिटर्न आवश्यक असतात.

निष्कर्ष: GST UDYAM FSSSAI Registration

योग्य नोंदणी = यशस्वी व्यवसाय

नोंदणी केल्याने:

  • तुमचा व्यवसाय सरकारकडे अधिकृतपणे नोंदलेला असतो.
  • योजनांचा लाभ घेता येतो.
  • ग्राहकांचा विश्वास वाढतो.
  • कायदेशीर अडचणींपासून संरक्षण मिळते.

नोंदणी प्रक्रिया जरी कागदोपत्री वाटत असली, तरी ही तुमच्या व्यवसायाची अधिकारिक ओळख आहे. आजच्या डिजिटल युगात, नोंदणी असलेले व्यवसायच जास्त विश्वासार्ह मानले जातात. त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य प्रकारची नोंदणी करून तुम्ही आपल्या व्यवसायाला अधिक स्थिरता व कायदेशीरता देऊ शकता. जरी व्यवसाय छोटा असला तरी योग्य नोंदणी करून त्याला एक प्रोफेशनल ओळख द्या. आजच ही प्रक्रिया पूर्ण करा आणि उद्याच्या मोठ्या यशासाठी पहिले पाऊल टाका.

तुम्हाला अजूनही काही नोंदणीबाबत शंका असल्यास, खाली कमेंट करा – आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोत!

लेखक:
MajhaUdyogg.com टीम
(स्वरोजगार, योजना आणि व्यवसाय मार्गदर्शनासाठी तुमचा विश्वासू साथी)

Image Credits: 
MSME, FSSAI logo are sourced from the official government portals. Used for informational and educational purposes only.

खालील बटणांद्वारे Share करा: