Earn Money From Meesho App – नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचा माझा उद्योग वर! आपल्या देशात अपुऱ्या नोकऱ्या आणि त्यामुळे उद्भवणारी वाढती बेरोजगारी, सततची आर्थिक चणचण, महिलांसाठी मर्यादित मोकळीक, महाराष्ट्रातील लहान शहरांमधील कमाईचे मर्यादित पर्याय यामुळे ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या उत्पन्न कमवण्याकडे मराठी जनतेचा कल वाढतो आहे. अशा वेळी, आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे आज महाराष्ट्रातील प्रत्येकजण उद्योजक बनू शकतो. हो, हे अगदीच शक्य आहे.
इंटरनेट आणि स्मार्टफोन यांचा वापर करून घरबसल्या पैसे कमावण्याची संधी ही अनेकांसाठी आज आशेचा किरण ठरते आहे. अशा वेळी, Meesho अॅप हे भारतात प्रचंड लोकप्रिय झालेले एक Reselling platform आहे. हे अॅप आज भारतातील लाखो गृहिणी, युवक-युवती आणि स्वावलंबी उद्योजक वापरत आहेत.
या लेखात आपण जाणून घेऊया की, Meesho ॲप म्हणजे काय आहे, त्याचा वापर कशाप्रकारे करायचा, कोण त्याचा वापर करू शकतो, ह्यात किती नफा मिळतो आणि इतर कोणत्या अशा महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. चला, तर मग अधिक वेळ न दवडता, आपल्या माहितीला सुरूवात करुया!
Meesho ॲप काय आहे? What is Meesho App?

Meesho हे एक Social Commerce Reselling Platform आहे. भारतामध्ये Meesho ची लोकप्रियता प्रचंड आहे. येथे तुम्ही इतर कंपन्यांची उत्पादने जसे की, कपडे, सौंदर्यप्रसाधने, होम डेकोर, फॅशन अॅक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक्स ॲक्सेसरीज, बेबी प्रॉडक्ट्स, इत्यादी. तुमच्या मित्रपरिवारात, नातेवाईक, ओळखीच्या लोकांपर्यंत आणि WhatsApp किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करून विक्री करू शकता. चला तर मग, खालच्या परिच्छेदात सोप्या भाषेत जाणून घेऊया की, आपल्याला ह्या ऑनलाईन रिसेलिंग व्यवसायात काय करायचं असतं.
वरती दिलेली उत्पादने तुम्ही WhatsApp, Facebook, Instagram इ. सोशल मीडिया साईट्सवर शेअर करता → ग्राहक ती वस्तू ऑर्डर करतो → Meesho ती वस्तू थेट ग्राहकाला पाठवतो → आणि तुम्ही तुमचा नफा (margin) ठरवून त्यातून कमाई करता. Easy!
Meesho अॅपची वैशिष्ट्ये: Earn Money From Meesho App
वैशिष्ट्ये | तपशील |
वापर सुलभता | ॲप वापरणे अतिशय सोपे आहे. मराठीसह अनेक भाषांमध्ये तुम्ही ॲपचा वापर करु शकता. |
गुंतवणूक | संपूर्णतः शून्य – एक रूपयाही तुम्हाला इन्व्हेस्ट करावा लागणार नाही. |
विविध प्रोडक्ट्स/उत्पादनांची श्रेणी | कपडे, सौंदर्यप्रसाधने, गृह सजावटीचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स अॅक्सेसरीज, बेबी प्रॉडक्ट्स, फॅशन वेअर, इत्यादी. |
नफा | तुम्ही स्वतः प्रत्येक उत्पादनासाठी स्वतःचा मार्जिन (नफा) ठरवता. इतर ॲपप्रमाणे फिक्स मार्जिनचे बंधन नाही. |
पेमेंट | बँक खात्यात दर आठवड्याला पेमेंट जमा होते. प्रत्येक यशस्वीरीत्या डिलीव्हर झालेल्या ऑर्डरचा नफा आपल्याला 7 दिवसांत दिला जातो. |
जबाबदारी | डिलिव्हरी, पेमेंट, रिटर्न – सर्व काही Meesho ची कस्टमर सपोर्ट टीम सांभाळते. |
अॅप उपलब्धता | Android व iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर Meesho ॲप डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. |
Meesho वर काम कसे सुरू करायचे? How To Start Working On Meesho App

अॅप डाउनलोड करा
Google Play Store किंवा iOS App Store वरती “Meesho” हे ॲप शोधा आणि त्याला इंस्टॉल करा किंवा थेट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.
Google Play Store – येथे क्लिक करा
iOS App Store – येथे क्लिक करा
रजिस्ट्रेशन करा
ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायची असते. रजिस्ट्रेशन करण्याकरीता तुमचा मोबाईल नंबर टाका आणि लॉगिन करा, OTP येईल त्याला वेरिफाय करा, पुढच्या पेजवर आपले नाव, आपला पत्ता व बॅंक तपशील भरा.
बँक डिटेल्स अचूकरीत्या भरणे आवश्यक आहे, तरच पैसे (तुमचा नफा) तुमच्या अकाऊंटला येईल.
प्रॉडक्ट निवडा
अॅपमध्ये हजारो उत्पादने आहेत. तुम्हाला आवडणारे किंवा तुमच्या ग्राहकांकडून जास्त मागणी असलेले उत्पादन शोधा– कपडे, फॅशन, होम डेकोर इत्यादी. वस्तू
त्यातील हिट आणि ट्रेंडिंग उत्पादने निवडा.
सोशल मीडियावर शेअर करा
WhatsApp Status आणि Groups, Instagram Stories, Facebook Pages आणि Marketplace वर तुमचे प्रॉडक्ट्स शेअर करा.
कॅप्शन सोबत तुमचं स्वतःचं ब्रँडिंग वापरा.
ग्राहक ऑर्डर देतो
ग्राहक ऑर्डर देतो → तुम्ही Meesho अॅपवरून ऑर्डर प्लेस करता.
आणि तुम्ही तुमचं “मार्जिन” टाकता म्हणजे तुमचं मार्जिन हे तुम्ही स्वतः ठरवता – हेच तुमचं कमिशन ठरते. Meesho वरती आपल्याला स्वतःच मार्जिन स्वतःच ठरवण्याची संधी मिळते. इतर ॲप्सवर आपल्याला ही मुभा मिळत नाही. तिथे तुमचं एक फिक्स मार्जिन ठरवलं जातं.
Meesho डिलिव्हरी करतो
ग्राहकाला वस्तू थेट Meesho पाठवतो. ग्राहकाच्या पत्त्यावरती पार्सल डिलीव्हर केले जाते. डिलीव्हरीचा तणाव आपल्यावरती येत नाही.
तुमचं मुख्य काम आहे शेअरिंग करणं आणि ग्राहकांशी संवाद साधणं – बाकी सर्व Meesho सांभाळतो.
कमाई बँकेत जमा (Earn Money From Meesho App)
प्रत्येक विक्री यशस्वी झाल्यावर (ग्राहकाला यशस्वीपणे डिलीव्हर झाल्यानंतर) 7 दिवसांत तुमचा नफा तुमच्या बॅंक खात्यात जमा होतो.
Meesho वर कोण कमाई करू शकतो? Earn Money From Meesho App

गृहिणी (Housewives):
घरातील जबाबदाऱ्यांसोबत उत्पन्न मिळवण्यासाठी. महिलांसाठी घरी बसून करता येण्याजोगा हा सर्वोत्तम डिजिटल व्यवसाय आहे.
महिला उद्योजिका (Women Entrepreneurs):
स्वावलंबी होण्यासाठी Meesho च्या माध्यमातून स्वत:चं छोटं ई-कॉमर्स स्टोअर सुरू करु शकता. स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी पॅसिव्ह इन्कम म्हणून ऑनलाईन रिसेलिंग व्यवसायाकडे बघू शकता.
विद्यार्थी (Students):
पार्टटाईम उत्पन्नासाठी. शिक्षण घेत असतानाच आर्थिक कमाई ही व्हावी, या हेतूने विद्यार्थी ऑनलाईन रिसेलिंग व्यवसाय सुरू करु शकतात.
नोकरी करणारे कर्मचारी (Working People):
साइड इनकमसाठी. जॉब करत असतानाच पर्याप्त वेळ मिळत असल्यास साईड इन्कमसाठी आपण ऑनलाईन रिसेलिंग व्यवसायाकडे बघू शकता.
बेरोजगार तरुण (Unemployed Youth):
व्यवसाय शिकण्यासाठी आणि आत्मनिर्भर होण्यासाठी. बेरोजगार तरुणांकडे बराच वेळ उपलब्ध असतो. त्याचा उपयोग ते नवीन आर्थिक पर्याय शोधण्यासाठी आणि आपले स्किल्स वाढवण्यासाठी करु शकतात. ऑनलाईन रिसेलिंग व्यवसाय हा आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे.
Meesho वर आपल्याला नफा कसा मिळेल? Earn Money From Meesho App
प्रत्येक उत्पादनावर तुम्ही ₹30 ते ₹300 पर्यंत नफा मिळवू शकता. उदाहरणार्थ, खालील तक्ता बघा:
उत्पादन/वस्तू | मूळ किंमत | विक्री किंमत | नफा |
साडी | ₹400 | ₹550 | ₹150 |
कुर्ती | ₹300 | ₹420 | ₹120 |
बॅग | ₹250 | ₹390 | ₹140 |
जर तुम्ही दररोज 3–5 ऑर्डर मिळवल्या, तर महिन्याला ₹10,000 – ₹25,000 सहज कमावू शकता.
Meesho वापरताना यश मिळवण्यासाठी काही स्पेशल टिप्स by Majha Udyogg:
- फक्त दर्जेदार वस्तू शेअर करा आणि चांगल्या दर्जाचे फोटो निवडा. फोटोंची क्वालिटी चांगली असेल तर ग्राहकांना निवड करणे सुलभ होईल.
- ग्राहकांशी संवाद साधा, त्यांच्या प्रश्नांना किंवा चौकशीला तत्काळ उत्तर द्या. त्यांना तुम्ही व्यवसायात punctual आहात, हे दाखवून द्या.
- WhatsApp Status आणि Story वर रोज अपडेट ठेवा. 24 तासानंतर स्टोरी किंवा स्टेटस disappear झाल्यानंतर पुन्हा काही नवीन प्रोडक्टस घेऊन स्टोरी आणि स्टेटस ठेवा.
- Repeating customers साठी आकर्षक ऑफर्स द्या. याने तुमचे ग्राहक तुमच्याशी जोडलेले राहतील आणि त्याच्यासोबतच ते इतरांना ही तुमचं नाव suggest करतील.
- विश्वासार्हता राखा – वेळेवर वस्तू डिलीव्हर होईल याकडे लक्ष द्या, ऑर्डर केल्यानंतर Meesho कडून ट्रॅकिंग डिटेल्स द्या. तुमच्या ग्राहकांना अचूक माहिती द्या. लक्षात ठेवा, तुम्हीच तुमचा ब्रॅंड आहात!
- COD वर मर्यादा ठेवा – ग्राहक कधीकधी ऑर्डर अचानक रद्द करतात. त्यामुळे COD (Cash on Delivery) ऑर्डर कमी ठेवणे किंवा खात्रीलायक ग्राहक निवडणे हा त्यावर योग्य उपाय आहे, म्हणजे पुढे जाऊन अशी समस्या उद्भवणार नाही.
Meesho वर रिसेलिंग करणाऱ्या काही उद्योजकांची उदाहरणे: Earn Money From Meesho App
सौ. वैशाली पाटील (कोल्हापूर) – वैशाली या गृहिणी आहेत. त्यांनी 2023 मध्ये Meesho सुरू केलं. फक्त WhatsApp वर 30 लोकांसोबत सुरुवात केली. आज त्यांची दरमहा सरासरी कमाई ₹28,000/- आहे.
त्या म्हणतात: “मी सुरुवातीला घाबरत होते. पण एकदा पहिली ऑर्डर मिळाली, आणि आत्मविश्वास वाढला. मिशोने माझं आयुष्य बदललं.”
प्रिया पाटील (नाशिक) – एका छोट्या गावात राहणाऱ्या प्रियाताईंनी फक्त WhatsApp स्टेटसवरून सुरू केलेला Meesho व्यवसाय आज दरमहा ₹25,000/- उत्पन्न देतो.
त्यांच्या यशाचं सूत्र आहे – “लोकांशी विश्वासाने बोला, आणि वस्तू वेळेवर पोहोचवा!”
काही मर्यादा आणि काळजी घेण्यासारख्या गोष्टी: Earn Money From Meesho App
बाब/येणाऱ्या अडचणी | लक्षात ठेवा |
डिलिव्हरीला विलंब होणे | काही वेळा, काही कारणास्तव डिलीव्हरीला उशीर होऊ शकतो. उदा. Vehicle Breakdown किंवा इतर तत्सम कारणे. अशावेळेस ग्राहकाला वेळेवर ट्रॅकिंग अपडेट द्या. त्यांच्या प्रश्नांची शांतपणे, समाधानकारक उत्तरे देऊन संवाद व्यवस्थित ठेवा. |
रिटर्न/कॅन्सलेशन | अनेकदा ग्राहक वस्तू रिटर्न करण्याची मागणी करतात. ही एक सामान्य अडचण आहे. यासाठी Meesho ॲपच्या नियमांचे पालन करा. ग्राहकांना अगोदरच Meesho च्या रिटर्न आणि कॅन्सलेशन पॉलिसीविषयी माहिती देऊन ठेवा, म्हणजे ऐनप्रसंगी वाद उद्भवणार नाही व ग्राहक नाराज होणार नाही. |
नफ्याचा हिशोब | प्रत्येक ऑर्डरचे मार्जिन अचूक लिहा. Meesho वरती आपल्याला ही खास सुविधा दिली जाते, ज्यामध्ये आपण स्वतःचं मार्जिन स्वतःच ठरवू शकतो. तर आपल्या प्रत्येक ऑर्डरचं मार्जिन व्यवस्थित लिहा. |
मोबदला उशिरा मिळणं | Meesho ची 7 दिवसांची पेमेंट ट्रान्सफर प्रक्रिया समजून घ्या. ग्राहकाला ऑर्डर व्यवस्थित डिलिव्हर झाल्यानंतर सात दिवसांच्या आतमध्ये आपला नफा आपल्या बँकेच्या अकाउंट वरती क्रेडिट केला जातो. |
कर भरावा लागतो का? | तुमचं उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त झाल्यास, कर संबंधित सल्ला घ्या. |
SEO आणि Affiliate कनेक्शन (Pro Users साठी):
जर तुमची स्वतःची वेबसाइट किंवा YouTube चॅनेल असेल, तर ह्या 2 गोष्टी करा:
- Meesho अॅपच्या लिंकला ट्रॅकिंग कोड लावा
- WhatsApp बिझनेस प्रोफाइल वापरा
Meesho Affiliate पद्धत सुरू केल्यास, तुम्हाला Long-Term फायदा होईल.
निष्कर्ष: Earn Money From Meesho App
Meesho हे घरबसल्या उत्पन्न मिळवण्यासाठी एक सुटसुटीत, विश्वासार्ह आणि अजोड असं व्यासपीठ आहे. Meesho हे अॅप लाखो भारतीयांसाठी आणि महाराष्ट्रातील मराठी जनतेसाठी उत्पन्नाचं साधन ठरलं आहे. शून्य गुंतवणूक, अचूक डिलिव्हरी, आणि मार्जिनवर आधारित कमाई हे याचे प्रमुख फायदे आहेत. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक न करता तुम्ही तुमचं स्वतंत्र उद्योजकतेचं स्वप्न प्रत्यक्षात आणू शकता.
जर तुम्हाला आर्थिक स्वावलंबन हवे असेल, तुमच्याकडे फिक्स वेळ नसेल, आणि घरबसल्या काम करायचं असेल – तर Meesho हा आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
तर मग आजच अॅप डाउनलोड करा, पहिली ऑर्डर घेण्याचा आत्मविश्वास मिळवा आणि उद्यापासून कमाई सुरू करा!
FAQ – सामान्य प्रश्नोत्तरे
प्रश्न 1: Meesho वापरण्यास पैसे लागतात का?
उत्तर: Meesho ॲप वापरण्यास पैसे लागत नाहीत. अॅप पूर्णपणे मोफत आहे. कोणतीही गुंतवणूक करायची गरज नाही.
प्रश्न 2: वस्तू परत (Return) आल्यास काय होते?
उत्तर: प्रोडक्ट रिटर्न Meesho सांभाळतो. ग्राहकाचे पैसे त्यांना परत मिळतात. ग्राहकांनी वस्तू रिटर्न केल्यास तुम्हाला त्याचा नफा मिळत नाही.
प्रश्न 3: किती वेळात पैसे मिळतात?
उत्तर: ग्राहकाला वस्तू यशस्वीपणे डिलिव्हर झाल्यावर, ७ दिवसांत तुमच्या बँक खात्यात संबंधित ऑर्डरचा नफा जमा होईल.
प्रश्न 4: GST आवश्यक आहे का?
उत्तर: नाही, सुरुवातीला GST ची आवश्यक नसते. मोठ्या कमाईनंतर आपण GST चा विचार करावा.
प्रश्न 5: कायदेशीर आहे का?
उत्तर: हो. भारत सरकारच्या GST प्रणालीखाली Meesho काम करते.
एक जरुरी सूचना:
“2025 पर्यंत GlowRoad, Shop101 सारखी काही अॅप्स बंद आणि काही इतर कंपन्यांत मर्ज झाल्यामुळे, Meesho हेच सध्या एकमेव प्रभावी आणि कार्यरत Reselling platform आहे.”
कृपया अॅप्सची स्थिती वापरण्याआधी अधिकृत प्लॅटफॉर्मवरून तपास करावा.
लेखक: Shubham Gundurkar (majhaudyogg.com)
श्रेणी: Online Earning Ideas
आणखी वाचा:
युट्यूब चॅनेल सुरु करुन पैसे कसे कमवायचे?
फोटो विकून ऑनलाईन पैसे कमवा
फ्रीलॅन्सिंग करुन घरबसल्या पैसे कमवा
महत्वाची सूचना: majhaudyogg.com वरील लेखांमधील माहिती ही सर्वसामान्य मार्गदर्शनासाठी दिली असून ती विविध विश्वसनीय स्त्रोतांवर आधारित आहे. शासकीय योजना, कर्ज सुविधा किंवा व्यवसाय संबंधित कोणताही निर्णय घेण्याआधी संबंधित अधिकृत वेबसाइट्स, कार्यालये किंवा तज्ज्ञ व्यक्तींशी संपर्क साधावा. येथे दिलेली माहिती वेळोवेळी बदलू शकते, त्यामुळे कृपया शेवटची अद्ययावत माहिती स्वतः पडताळून पाहा. या वेबसाईटवरील माहितीच्या आधारे घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी majhaudyogg.com किंवा लेखक जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
**Image Credits:**
Due to the post is related to info regarding Meesho, so we used its logo for informational and educational purposes only. By clicking the name “Meesho” on the above line, it will take you to the Meesho’s official website.