Bank Code Information Marathi – आजच्या डिजिटल युगात बँकिंग व्यवहार अतिशय सोप्या, जलद, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने होऊ लागले आहेत. NEFT, RTGS, IMPS, ऑनलाइन पेमेंट, आंतरराष्ट्रीय व्यवहार, हे सगळं आपण अगदी सहज रोजच करत असतो. पण या व्यवहारांच्या मूळ पायाभूत गोष्टींपैकी तीन अत्यंत महत्त्वाचे कोड म्हणजे – IFSC, MICR आणि SWIFT कोड.
हे कोड ऐकायला जरा तांत्रिक वाटू शकतात, पण प्रत्येक उद्योजकाला, व्यापाऱ्याला आणि सामान्य ग्राहकालाही यांचं महत्त्व समजणं आवश्यक आहे.
हे कोड काय आहेत, ते कसे ओळखायचे, कोणत्या वेळी त्यांचा उपयोग होतो आणि उद्योजकासाठी हे का गरजेचे आहेत, हे आपण या लेखात सविस्तर पाहणार आहोत. चला, तर मग सुरू करुया!
IFSC कोड म्हणजे काय? Bank Code Information Marathi

Indian Financial System Code (IFSC) हा एक 11 अंकी अल्फा-न्यूमेरिक (Alpha-Numeric) कोड असतो जो भारतातील प्रत्येक बँकेच्या शाखेला एक विशिष्ट ओळख देतो. हा कोड RBI (भारतीय रिझर्व्ह बँक) द्वारे दिला जातो.
IFSC कोडची रचना:
IFSC कोडची रचना समजून घेण्यासाठी खालील एक उदाहरण बघू.
उदाहरण: SBIN0000456
- पहिले 4 अक्षरे (SBIN): यातील पहिली 4 अक्षरे ही बँकेचे नाव असतात, जसे की वरील उदाहरणात (State Bank of India)
- पाचवा अंक (0): पाचवा अंक हा सदैव ‘0’ असतो (Future Use साठी राखीव ठेवण्यात आलेला असतो)
- शेवटचे 6 अंक (000456): शेवटचे 6 अंक हे एका विशिष्ट बॅंक शाखेचे कोड असतात.
IFSC कोडचा उपयोग:
- NEFT, RTGS, IMPS अशा डिजिटल फंड ट्रान्सफर प्रक्रियेमध्ये IFSC कोडचा उपयोग होतो.
- दुसऱ्याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करताना या कोडचा उपयोग होतो.
- व्यापारी व्यवहारांमध्ये पेमेंट पाठवताना
- तसेच ऑनलाइन बँकिंग करताना IFSC कोडचा वापर होतो.
IFSC कोडची गरज का?
जर तुम्ही कोणालाही ऑनलाइन पैसे पाठवत असाल, तर तुम्हाला त्यांच्या खात्याचा IFSC कोड माहीत असणे आवश्यक आहे. यामुळे पैसे योग्य खात्यावर सुरक्षित पोहोचतात. त्यामुळे IFSC कोड महत्वाचा आहे.
MICR कोड म्हणजे काय? Bank Code Information Marathi

Magnetic Ink Character Recognition (MICR) हा एक 9 अंकी कोड असतो जो चेक क्लिअरन्स प्रक्रिया सुलभ करण्यासाठी वापरला जातो.
MICR कोडची रचना:
MICR कोड हा 9 अंकी संख्यात्मक (Numerical) कोड असतो.
उदाहरण: 400002018
- पहिले 3 अंक (400): यातील पहिले 3 अंक हे शहराचा कोड आहेत (उदा. मुंबई)
- मधले 3 अंक (002): नंतरचे मधले 3 अंक हे बँकेचा कोड असतात.
- शेवटचे 3 अंक (018): शाखेचा कोड हे शेवटचे 3 अंक असतात.
MICR कोडचा उपयोग:
- चेक क्लिअरन्स प्रक्रियेत MICR कोडचा उपयोग होतो.
- बँक शाखा ओळखण्यासाठी वापर होतो.
- चेकवरील माहितीची यांत्रिक ओळख (स्कॅनिंग) सुलभ करण्यासाठी उपयोगी पडते.
- चेक ट्रांजॅक्शनमध्ये फसवणूक रोखण्यासाठी कामी येते.
MICR चा फायदा:
- चुकीच्या चेक क्लिअरन्सचा धोका कमी होतो.
- व्यवहार जलद आणि अचूक होतात.
- बँकिंग प्रणालीतील त्रुटी टाळता येतात.
SWIFT कोड म्हणजे काय? Bank Code Information Marathi

Society for Worldwide Interbank Financial Telecommunication (SWIFT) हा एक जागतिक स्तरावरील बँकिंग कोड आहे, जो आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी वापरला जातो.
स्विफ्ट कोडला BIC (Bank Identifier Code) असेही म्हणतात. हा कोड आपल्याला आपल्या बँकेच्या शाखेतून मिळतो.
SWIFT कोडची रचना:
SWIFT कोड हा 8 किंवा 11 अक्षरी अल्फा-न्यूमेरिक (Alpha-Numeric) कोड असतो.
उदाहरण: SBININBBXXX
- पहिली 4 अक्षरे: पहिली 4 अक्षरं ही बँकेचे नाव असतात. जसे की, वरील उदाहरणात State Bank of India (SBIN = SBI)
- पुढची 2 अक्षरे: देश (IN = India) दर्शवतात.
- पुढची 2 अक्षरे: BB – शहर/लोकेशन कोड, ही पुढची 2 अक्षरे असतात.
- शेवटची 3 अक्षरे: XXX – शाखेचा कोड (कधी कधी नसतो)
SWIFT कोडचा उपयोग:
- विदेशातून पैसे पाठवताना (Wire Transfer) वापर होतो.
- आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी पैसे मिळवताना वापर होतो.
- PayPal, TransferWise, Western Union सारख्या प्लॅटफॉर्मशी व्यवहार करताना या कोडचा उपयोग होतो.
- निर्यात आणि आयात व्यवहारांमध्ये SWIFT कोडचा उपयोग होतो.
उद्योजकाला हे कोड कधी आणि कसे उपयोगी पडतात? Bank Code Information Marathi
उद्योजकाला विविध आर्थिक व्यवहार करताना या कोड्सची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
चालू खाते (Current Account) उघडताना:
बँकेत चालू खाते (Current Account) उघडताना IFSC आणि MICR कोड बँकेकडून दिला जातो. या कोड्सच्या आधारे खात्यातून व्यवहार करता येतात.
ऑनलाइन व्यवहार करताना:
ग्राहकांना किंवा पुरवठादारांना पैसे ट्रान्सफर करताना IFSC कोड आवश्यक असतो. खास करून NEFT किंवा RTGS सारख्या पद्धतीत तो फारच महत्त्वाचा असतो.
चेकद्वारे व्यवहार करताना: Bank Code Information Marathi
MICR कोड वापरून बँक चेक्स स्कॅन करून प्रक्रिया पूर्ण करते. मोठ्या रकमेच्या व्यवहारांमध्ये हे विशेष उपयुक्त ठरते. MICR कोड वापरून चेक क्लिअरन्स सुलभ होते.
विदेशात व्यवहार करताना:
SWIFT कोडच्या मदतीने उद्योजक परदेशातून पेमेंट्स स्वीकारू शकतो. आपण जण युट्यूबर, ब्लॉगर किंवा सोशल मिडीया इंन्फ्लूएंसर असाल तर तेव्हाही विदेशातून पैसा मिळवण्यासाठी आपल्याला SWIFT कोड आवश्यक ठरतो. निर्यात करणाऱ्या उद्योजकांसाठी हा कोड अत्यावश्यक आहे. हा कोड तुम्हाला तुमची बँक मागणी केल्यावर प्रदान करते.
पेमेंट गेटवे सेटअप करताना:
काही डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्यवहार करताना बँकेचे कोड्स विचारले जातात – उदा. Razorpay, Instamojo, PayPal इत्यादी.
IFSC, MICR, SWIFT कोड कुठे आणि कसे मिळतात? Bank Code Information Marathi
बँकेच्या चेकबुकवर:
IFSC आणि MICR हे दोन्ही कोड चेकवर प्रिंट केलेले असतात.
बँक पासबुकवर:
IFSC कोड सहसा पासबुकच्या पहिल्या पानावर प्रिंट केलेला असतो.
बँक स्टेटमेंटवर:
डिजिटल स्टेटमेंट्समध्ये कोड दिलेला असतो.
बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा नेटबँकिंगवर:
विशिष्ट बँक शाखेचा कोड शोधता येतो.
RBI च्या अधिकृत पोर्टलवर:
https://rbi.org.in/scripts/IFSCMICRDetails.aspx
IFSC/MICR कोड शोधणारी संकेतस्थळे:
उदाहरणार्थ, https://www.ifscswiftcodes.com
IFSC, MICR, SWIFT कोड – फरक आणि उपयोग एकत्रित सारांश: Bank Code Information Marathi
कोड | संपूर्ण नाव | रचना | उपयोग |
IFSC | Indian Financial System Code | 11-अंकी | भारतात ऑनलाईन व्यवहार |
MICR | Magnetic Ink Character Recognition | 9-अंकी | चेक क्लिअरन्स |
SWIFT | Society for Worldwide Interbank Financial Telecommunication | 8/11-अंकी | आंतरराष्ट्रीय व्यवहार |
IFSC/MICR/SWIFT कोड वापरताना काळजी घेण्याजोग्या गोष्टी: Bank Code Information Marathi
- कोड नेहमी बँकेच्या अधिकृत स्रोतावरून घ्या. अनाधिकृत वेबसाईट्सवर आपली फसवणूक होऊ शकते.
- कोड चुकीचा टाकल्यास व्यवहार फसतो. त्यामुळे कोड टाकल्यानंतर नेहमी परत एकदा चेक करावा.
- जुना IFSC वापरू नका – बँक शाखा बदलल्यास कोडही बदलू शकतो.
- SWIFT कोड नसलेल्यांनी बँकेच्या मुख्य शाखेचा कोड वापरावा.
निष्कर्ष: Bank Code Information Marathi
IFSC, MICR आणि SWIFT हे तिन्ही कोड आपल्या दैनंदिन बँक व्यवहारांमध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात. व्यवसाय करताना आर्थिक व्यवहारांची अचूकता आणि वेग ही दोन महत्त्वाची तत्त्वे आहेत. IFSC, MICR आणि SWIFT कोड्स या गोष्टी सुनिश्चित करतात. प्रत्येक सामान्य भारतीय नागरिकाने विशेषतः उद्योजकाने या कोड्सचा वापर, त्यांचा अर्थ आणि उपयोग समजून घेतला पाहिजे.
या कोड्सची माहिती फक्त व्यवहार सोपं करायला मदत करते असं नाही, तर फसवणूक, चुकीचे व्यवहार, रक्कम अडकणे यासारख्या अडचणींपासून ही वाचवते आणि व्यवहारात पारदर्शकता, गती आणि विश्वासार्हता निर्माण होते.
FAQ – IFSC, MICR, SWIFT कोड संदर्भात सामान्य प्रश्न
1. IFSC कोड आणि MICR कोड या दोन्ही कोडमध्ये काय फरक आहे?
उ. IFSC कोडचा वापर ऑनलाइन व्यवहारासाठी होतो, तर MICR कोड चेक क्लिअरन्स प्रक्रियेसाठी असतो.
2. SWIFT कोड भारतात लागतो का?
उ. हो, SWIFT कोड विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी लागतो. जर तुम्हाला विदेशातून पैसे घ्यायचे असतील किंवा परदेशात पाठवायचे असतील, तर SWIFT कोड लागतो. समजा, तुमचं युट्यूब चॅनेल मॉनेटाईज झालं आहे किंवा तुमचं इन्स्टाग्राम रील्स अकाऊंट मॉनेटाईज झालं आहे, तर अशावेळेस विदेशातून तुमच्या अकाऊंटमध्ये येणाऱ्या पैशांसाठी आपल्याला SWIFT कोड लागेल.
3. IFSC कोड कुठे मिळतो?
उ. बँकेच्या चेकबुकवर, पासबुकवर, स्टेटमेंटमध्ये किंवा RBI च्या वेबसाईटवर.
4. माझ्या बँकेचा SWIFT कोड नाही. मग मी विदेशातून पैसे कसे घेऊ?
उ. अशा वेळी बँकेच्या मुख्य शाखेचा SWIFT कोड वापरावा लागतो.
5. चुकून चुकीचा IFSC कोड टाकल्यास काय होतं?
उ. पैसे दुसऱ्या खात्यात जाण्याचा धोका निर्माण होतो किंवा व्यवहार फेल होतो.
6. बँक शाखा बदलली तर IFSC आणि MICR कोड बदलतो का?
उ. हो. नवीन शाखेचा कोड वेगळा असू शकतो. खातं ट्रान्सफर करताना कोड अपडेट करणे गरजेचे.
7. SWIFT कोड प्रत्येक खात्याला असतो का?
उ. नाही. तो शाखा-आधारित असतो.
8. व्यवसायासाठी कोणता कोड सर्वाधिक लागतो?
उ. IFSC – हा कोड सर्वात महत्वाचा आहे कारण सर्व डिजिटल व्यवहार ह्यावरच आधारित असतात.
9. MICR कोड नसलेल्या चेकवर व्यवहार करता येतो का?
उ. काही जुन्या चेकवर MICR कोड नसतो, पण आता तो अनिवार्य आहे.
10. IFSC/MICR/SWIFT कोड जनरेट करता येतो का?
उ. नाही. हे कोड बँक शाखांद्वारे अधिकृतपणे दिले जातात. याची माहिती फक्त अधिकृत स्त्रोतांवरून घ्यावी.
11. माझ्या खात्याचा IFSC बदलला असेल तर काय करावं?
उ. जर बँकेने शाखा एकत्र केली (विलीनीकरण) तर IFSC बदलू शकतो. याबाबत बँकेतून माहिती घ्या व अपडेट करा.
12. MICR कोड प्रत्येक खात्यावर असतो का?
उ. होय, MICR कोड प्रत्येक चेकवर असतो, पण Savings Account पेक्षा Current Accounts मध्ये त्याचा जास्त उपयोग होतो.
13. SWIFT कोड आणि IFSC कोड एकसारखे असतात का?
उ. नाही. IFSC भारतासाठी आहे; SWIFT जागतिक व्यवहारांसाठी वापरला जातो.
14. कोड बदलल्याची माहिती बँक देते का?
उ. कधी कधी SMS किंवा ईमेलद्वारे बँक माहिती देते, पण खातेदारांनी स्वतः सतर्क राहणे योग्य.
तर मित्रांनो हा होता आपला आजचा बँक कोड्ससंबंधित लेख. तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटला का? वाटला असेल तर कृपया तुमच्या सोशल मीडिया हॅंडल्सवर शेअर करा. तसेच admin@majhaudyogg.com वर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा!
लेखक: शुभम गुंडूरकर (majhaudyogg.com)
श्रेणी: इतर
आणखी वाचा:
WhatsApp Business App कसे वापरावे?