Homemade Pickle Supply Business – भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये लोणचं हे एक अविभाज्य घटक आहे. तुम्ही घरात जेवत असो किंवा हॉटेलमध्ये, जेवणात जर घरगुती लोणचं असेल, तर त्याने जेवणाचा स्वाद चविष्ट होतो. भाजी, भाकरी किंवा वरणभाताबरोबर लोणचं असलं की जेवण अधिक स्वादिष्ट होतं. हाच स्वाद वाढवण्यासाठी अनेक हॉटेल्स, डबेवाल्यांचे पार्सल सेंटर्स आणि कॅन्टीनमध्ये घरगुती लोणच्याला मोठी मागणी आहे. सध्या बाहेरून खाण्याचा ट्रेंड वाढलेला आहे आणि त्यासोबतच पार्सल सेवा, टिफिन सेंटर, व हॉटेल उद्योगही वेगाने वाढत आहे.
हे सर्व व्यवसाय ग्राहकाला उत्तम चव देण्यासाठी घरगुती चव असलेले लोणचं वापरण्याचे प्रमाण वाढवत आहेत. त्यामुळे तुम्ही जर स्वयंपाकात पारंगत असाल आणि खास लोणचं तयार करण्यात कुशल असाल, तर हा व्यवसाय तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. घरगुती लोणचं पुरवठा व्यवसाय (Homemade Pickle Supply Business) हा व्यवसाय अल्प गुंतवणुकीतून (Low Investment) सुरू करता येणारा, कमी स्पर्धेचा (Low Competition) आणि सातत्याने नफा (Continue Profit) देणारा आहे.
घरगुती लोणचं पुरवठा व्यवसायाची ओळख: Short Introduction of Homemade Pickle Supply Business
घरगुती लोणचं पुरवठा व्यवसाय म्हणजे विशेषतः हॉटेल्स, टिफिन सर्व्हिस, पार्सल फूड व्यवसाय, व किराणा दुकानदारांसाठी घरच्या घरी बनवलेलं, दर्जेदार, टिकाऊ आणि चविष्ट लोणचं पुरवठा करणे.
या व्यवसायात तुम्ही लोणचं तयार करून ते फूड बिझनेसेसना (वरती सांगितल्याप्रमाणे) सरळ विकता (Direct Selling), जे ते त्यांच्या जेवणात पूरक म्हणून देतात. ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळाला तर व्यवसाय भक्कम व्हायला सुरुवात होते आणि तुम्ही स्वतःचा लोणच्याचा ब्रँड देखील तयार करू शकता.
घरगुती लोणचं पुरवठा व्यवसाय सुरू करण्याचे फायदे: Benefits of Starting a Homemade Pickle Supply Business
अल्प गुंतवणूक:
हॉटेल व पार्सलसाठी घरगुती लोणचं पुरवठा व्यवसायासाठी (Homemade Pickle Supply Business) सुरुवातीला लागणारी गुंतवणूक खूप कमी असते. घरगुती आणि मध्यम स्तरांवर लागणाऱ्या भांडवल रकमेची माहिती खालीलप्रमाणे आहे,
एकूण सुरुवातीची गुंतवणूक: ₹6,000 ते ₹12,000
टीप: जर तुम्ही घरात आधीपासूनच मसाले आणि सामग्री वापरत असाल तर खर्च अजून कमी होऊ शकतो.
एकूण गुंतवणूक (मध्यम स्तरावर): ₹25,000 ते ₹50,000
टीप: सुरुवात लहान प्रमाणात करा. प्रॉफिट मिळू लागल्यावर हळूहळू मशीन, पॅकिंग युनिट, वर्कर घ्या. PMEGP किंवा महाराष्ट्र शासनाच्या योजना वापरून अनुदानही मिळवू शकता.
Note: PMEGP योजनेचा लाभ कसा घ्यावा याविषयी माहितीसाठी येथे क्लिक करा
घरबसल्या सुरू करता येणारा व्यवसाय:
तुम्ही हा व्यवसाय घरून सुरू करू शकता, त्यामुळे जागेचे भाडे, मोठे यंत्रसामान किंवा कामगार यांचा खर्च सुरुवातीला लागत नाही.
कौशल्यावर आधारित व्यवसाय:
घरगुती लोणचं पुरवठा व्यवसाय (Homemade Pickle Supply Business) हा कौशल्यावर आधारित व्यवसाय आहे. या व्यवसायात आपल्याला प्रोडक्टची क्वालिटी (चव) आणि त्याचा टिकाऊपणा या दोन्ही गोष्टीत समतोल साधावा लागतो. हाच या व्यवसायातील यशस्वी होण्याचा मुख्य घटक आहे.
सतत मागणी असलेलं उत्पादन:
घरगुती लोणच्याबद्दल फार काही सांगायची गरज नाही. आपल्याला जेवणात लोणचं हवंच असतं. तोंडाला चव आणणारा पदार्थ असल्याने मार्केटमध्ये मागणी मोठ्या प्रमाणात असते.
महिलांसाठी अत्यंत उपयुक्त गृहउद्योग:
महिलांसाठी घरगुती लोणचं पुरवठा व्यवसाय (Homemade Pickle Supply Business) हा उत्तम व्यवसाय आहे. कारण हा व्यवसाय घरबसल्या करता येतो आणि भांडवलही फार काही लागत नाही.
घरगुती लोणचं पुरवठा व्यवसायाची गरज का वाढते आहे? Demand For Homemade Pickle Supply Business
वाढत्या टिफिन सेवा आणि पार्सल हॉटेल्स:
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विशेषतः शहरात टिफीन सेवेला आणि पार्सल हॉटेल्सला फार महत्व आहे. अनेक विद्यार्थी आणि नोकरदार व्यक्तींना शहरात आपल्या रोजच्या जेवणाची सोय करावी लागते. वरील दोन व्यवसाय ही गरज भागवतात. टिफीन आणि पार्सल सेवेत अनेक पदार्थ दिले जातात ज्यामध्ये लोणच्याचा समावेश तर हमखास असतो.
ग्राहकांना घरगुती चव आवडते:
ग्राहकांना कंपनीत बनलेल्या फुड प्रोडक्टपेक्षा घरी तयार करण्यात आलेल्या पदार्थाची चव जास्त आवडते. घरगुती चव आपण जपली तर ग्राहकांच्या मनात आपला ब्रँड जागा तयार करतो.
रेडीमेड लोणचं अनेकांना नको असते:
रेडीमेड लोणच्यात प्रिझर्व्हेटिव्ह असतात. प्रत्येक ग्राहकाला हे आवडेलच असे नाही.
हॉटेल्सना वेळ वाचवण्यासाठी रेडी-मेड घरगुती लोणचं हवं असतं:
वरील कारणांमुळे घरगुती लोणच्याला जास्त महत्त्व प्राप्त होतं आणि हॉटेल्स आणि टिफीन सेवा ही घरगुती लोणच्याला प्राधान्य देतात.
कोणत्या प्रकारचे लोणचं सर्वाधिक मागणीमध्ये आहे?

हॉटेलमध्ये खालील प्रकारच्या लोणच्यांना अधिक प्रमाणात मागणी असते:
लोणच्याचे प्रकार | लोणच्याची वैशिष्ट्ये |
कैरीचे लोणचं | गोड, खारट किंवा तिखट |
लिंबाचं लोणचं | क्लासिक चव, हिवाळ्यासाठी उत्तम |
मिरची लसूण | पार्सल फूडसाठी अतिशय लोकप्रिय |
पाचफड | जिभेला लज्जतदार चव |
मिक्स व्हेज | विविध भाज्यांचं लोणचं, विशेषतः टिफिनमध्ये |
आंबा डाळ | उन्हाळ्यातील खासियत |
पातळ/तेलबाज लोणचं | हॉटेल्समध्ये चमच्याने सर्व्ह करता येतं |
घरगुती लोणचं पुरवठा व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी आवश्यक तयारी: Preparation For Homemade Pickle Supply Business

आवश्यक कौशल्य:
- चविष्ट व टिकाऊ लोणचं तयार करण्याचं कौशल्य असणं फार गरजेचे आहे.
- स्वच्छता, अन्न साठवण आणि तेल-मसाल्यांचं योग्य ज्ञान पाहिजे.
- थोडं मार्केटिंग आणि कम्युनिकेशन कौशल्य गरजेचे आहे ज्यामुळे विक्री अधिक होईल आणि त्याचा फायदा व्यवसाय वाढण्यासाठी होईल.
साहित्य व साधनं मिळवा:
खालील साहित्य आपल्याला लोणचं व्यवसाय सुरू करण्यासाठी लागेल,
- स्वच्छ काचेच्या / स्टीलच्या बरण्या
- मोठी कढई / पातेलं
- मोठे चमचे / झारे
- गरम पाणी, लोणचं मसाले
- फूड ग्रेड तेल (सरसो/संधान तेल)
- मिक्सर / मसाला तयार करणारे उपकरण
- फूड ग्रेड प्लास्टिक पॅकिंग पाउचेस किंवा डबे
कच्चा माल:
वरील साधनांव्यतिरिक्त आपल्याला खालील कच्चा माल आवश्यक आहे.
- कैऱ्या, लिंबं, मिरच्या
- मीठ, हळद, हिंग, तेल
- मोहरी, मेथी, सौंफ
- पॅकिंग साहित्य (स्टिकर्स, डबे, पॅकेट्स)
पॅकिंग आणि लेबलिंग:
- 50gm, 100gm, 250gm आणि 1kg च्या पॅकिंगमध्ये लोणचं द्या.
- स्वतःचं ब्रँड नेम आणि मोबाईल नंबर लेबलवर प्रिंट करा
- ग्राहक आकर्षित करण्यासाठी “Home Made”, “Preservative Free” यांसारखी माहिती लिहा.
पुरवठा साखळी (Supply Chain):
- तयारी – घरी किंवा युनिटमध्ये लोणचं तयार करा.
- साठवणूक – 5kg, 10kg किंवा मोठ्या बरण्यांमध्ये.
- पॅकिंग – ग्राहकाच्या गरजेनुसार (25g, 100g, 500g, 1kg).
- डिलिव्हरी – दररोज किंवा आठवड्यातून 2 वेळा ठरलेल्या वेळेत.
तुमचे ग्राहक कोण असतील? Who Will Be Your Customers?
- स्थानिक हॉटेल्स (थाळी, पार्सल हॉटेल्स) – 25gm ते 100gm पाउचमध्ये स्थानिक हॉटेल्सना विक्री करू शकता.
- पार्सल टिफिन सेवा केंद्रे – रोज एका वेळेच्या जेवणात एक चमचा याप्रमाणे पार्सल टिफीन सेवा केंद्रे लोणच्याची सर्व्हिस त्यांच्या ग्राहकांना देतील.
- किराणा दुकाने – छोट्या डब्यांमध्ये किराणा दुकानांना तुम्ही विक्री करु शकता.
- रेल्वे/बस स्टॉल्स – लोणचं भाकरी/पोळी सोबत तेथील स्टॉल्स देऊ शकतात.
- ऑनलाइन विक्री – WhatsApp, Instagram, Facebook Groups वरती आपण आपल्या लोणच्याची ऑनलाईन विक्री करू शकता.
संभाव्य खर्च आणि नफा:
तपशील | अंदाजे खर्च |
साहित्य (कैरी, मसाले, तेल) – 5kg | ₹1000 |
बरण्या, डबे, झारे (एकवेळचा खर्च) | ₹800 |
पॅकिंग मटेरियल | ₹500 |
मजुरी (स्वतः करत असल्यास शून्य) | ₹0 |
एकूण | ₹2300 |
5 किलो लोणच्यापासून कमीत कमी ₹4000 – ₹5000 विक्री शक्य आहे. याचा अर्थ ₹1500 – ₹2500 नफा तुम्हाला सहज मिळतो.
किंमत आणि नफा: Selling Prices and Profit For Homemade Pickle Supply Business
पॅकिंग | विक्री दर (₹) | अंदाजे नफा |
100g | ₹30 – ₹50 | ₹15 – ₹25 |
250g | ₹60 – ₹100 | ₹40 – ₹50 |
1kg (हॉटेल/टिफिन) | ₹250 – ₹350 | ₹150 – ₹200 |
उदाहरण: जर तुम्ही दररोज 10kg लोणचं विकलं, तर दरमहा अंदाजे ₹30,000 – ₹50,000 नफा मिळू शकतो.
व्यवसायासाठी परवाने कोणकोणते लागतील? Registrations Required For Homemade Pickle Supply Business
लहान स्तरावर:
सुरुवातीला परवान्यांची फार काही आवश्यकता लागत नाही, परंतु स्वच्छता नियम पाळणे आवश्यक आहे.
मोठ्या प्रमाणावर:
व्यवसाय थोडा मोठा झाल्यानंतर खालील व्यावसायिक नोंदणी तुम्हाला कराव्या लागतात.
- FSSAI रजिस्ट्रेशन (₹100 – ₹1500/प्रति वर्ष)
- Udyam Aadhar
- GST नंबर (जर वार्षिक उलाढाल ₹20 लाखांपेक्षा जास्त झाली तर GST ची नोंदणी करावी लागेल)
टीप: FSSAI, UDYAM, GST या तिन्ही नोंदणीविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
व्यवसाय सुरू करण्याची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया: Step By Step Process To Start a Homemade Pickle Supply Business
सर्वप्रथम नमुना तयार करा:
तुमच्या घरगुती लोणच्याचे 2 – 3 नमुना प्रकार तयार करून हॉटेल मालक किंवा टिफिनवाल्यांना टेस्ट करण्यासाठी द्या. यानंतर डील सुरू करा.
किंमत ठरवा:
- हॉटेलसाठी: ₹30 – ₹50 प्रति 100gm
- किराणा विक्री: ₹60 – ₹100 प्रति 100gm
- होलसेल: ₹250 – ₹350 प्रति किलो
पुरवठा सुरुवात करा:
- आठवड्यातून 2 – 3 वेळा फ्रेश पुरवठा करा.
- जुने लोणचं वापरणं टाळा, त्यामुळे चव बिघडते.
- रेग्युलर डिलिव्हरी सुरू करा.
- तुमच्या व्यावसायिक ग्राहकांच्या वेळापत्रकानुसार (उदा. सकाळी 9 वाजता) लोणचं द्या.
ब्रँडिंग आणि पॅकिंग तयार करा:
- स्टिकरवर ब्रँड नाव, मोबाईल, वजन, बॅच नंबर द्या
- पारदर्शक पॅकिंग ठेवा – ग्राहक प्रोडक्टचा अगोदर रंग व नंतर चव पाहतो.
FSSAI नोंदणी (आवश्यक असल्यास):
वरती माहिती दिल्याप्रमाणे प्रारंभी छोटा व्यवसाय असल्यास गरज नाही, पण वाढीनंतर ही नोंदणी घेतलेली बरी.
अभिप्राय (Feedback) घ्या:
हॉटेलमालक, ग्राहकांकडून अभिप्राय घ्या आणि चव सुधारत राहा.
ब्रँडिंग आणि मार्केटिंग टिप्स: Branding and Marketing Tips For Homemade Pickle Supply Business
विक्री वाढवण्यासाठी आपल्याला खाली काही उपाय दिले आहेत, जे तुमचा लोणच्याचा ब्रॅंड वाढवण्यासाठी मदत करतील. हे उपाय खालीलप्रमाणे,
- Instagram Page तसेच Facebook Page तयार करुन स्वत:ची ब्रॅंडिंग करा. आपल्या ब्रॅंडचं नाव आपल्या व्यवसायासाठी सुट होईल असं नाव ठेवा. उदा. “Chavdar Loncha”, “Aaji’s Pickle” किंवा “”मावशींचं लोणचं”, “सौ. Joshi लोणचं”, “घरगुती चव” अशाप्रकारची नावे ठेवा.
- WhatsApp स्टेटस मार्केटिंग – दररोज फोटो/ऑर्डर अपडेटला ठेवा. आपल्या व्यवसायाचा WhatsApp Group तयार करा. या ग्रुपमध्ये नवीन ऑफर्स, प्रोडक्ट्सचे फोटो, ग्राहकांचे अभिप्राय आणि इतर महत्वाची माहिती शेअर करा. रोज Whatsapp Status ठेवत चला.
- स्पेशल टीप: WhatsApp Business App चा वापर करणं आपल्या व्यवसायासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतं. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
- “Free Sample” ऑफर करा – सुरुवातीला व्यवसायाचा जम बसवण्यासाठी फ्री सॅम्पलची ऑफर साहाय्य करते. एकदा चव आवडली, की पुन्हा मागणी येते.
- “Order Now” स्टीकर – मोबाईल नंबर व QR कोडसह इतर आवश्यक माहिती नमूद करा.
- स्थानिक हॉटेलशी थेट संपर्क करा. हॉटेल्सना अशाप्रकारे ऑफर द्या – उदा. “10kg वर 1kg फ्री”.
- प्रत्येक लोणच्याचा रिव्ह्यू व्हिडिओ टाका. इंटरनेटमध्ये मार्केटिंगची प्रचंड ताकद आहे.
- YouTube Shorts / Reels – “लोणचं कसं बनवलं जातं” दाखवा. यासाठी युट्यूब चॅनेल तयार करा. नियमितपणे युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करून आपण तेथूनही पैसे कमावू शकता. याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
- फूड फेस्टिवलमध्ये स्टॉल लावा – फूड फेस्टिवल, फूड एक्झिबिशन यांसारख्या ठिकाणी आपला स्टॉल लावा. याचा व्यवसाय वाढीसाठी ग्राऊंड लेव्हलवर भरपूर फायदा होतो.
- स्वतःचा Google My Business अकाउंट तयार करा. अकाउंट तयार करण्यासाठी कृपया येथे क्लिक करा. Google My Business प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला अनेक सुविधा मिळतील, ज्याने तुमचा ऑनलाईन प्रेजेन्स तयार होईल.
- “लोणचं विक्रेत्या महिला गट” तयार करा – सहकार्याने विस्तार करू शकता.
- फेस्टिव्हल बंपर ऑर्डर मिळवा – श्रावण, गणपती, दिवाळीत विशेष लोणचं तयार करा आणि फेस्टिवलसाठी आकर्षक ऑफर द्या.
उदाहरण (Case Study):
“सौ. माने – सातारा”
सौ. माने यांनी कोविड दरम्यान 3kg लिंबाचं लोणचं करून 2 टिफिनवाल्यांना दिलं. एक वर्षात त्यांनी 25 हॉटेल्सना पुरवठा सुरू केला. आज त्यांचं दरमहा लोणच्याचा उत्पादन 150kg आहे आणि त्या दरमहा ₹60,000 पेक्षा अधिक उत्पन्न मिळवत आहेत.
घरगुती लोणचं पुरवठा व्यवसायात शक्य असलेल्या अडचणी: Possible Difficulties of a Homemade Pickle Supply Business
अडचण | उपाय |
लोणचं खराब होणं | स्वच्छता ठेवणं आणि योग्य प्रमाणात तेल व मीठ यांचा वापर करणे. |
ग्राहक वेळेवर पैसे न देणं | आगाऊ रक्कम (Advance Payment) घ्या किंवा वीकली पेमेंटची बोलणी करून घ्या. |
चव सतत जुळवणं | एक रेसिपी मोजमापानुसार कायम ठेवा. एक ठराविक लोणच्याचा प्रकार बनवण्यासाठी त्याला किती प्रमाणात साहित्य लागतं आणि कोणती पद्धत वापरायची असते याची कुठेतरी नोंद करून ठेवा. |
वितरण व्यवस्था नसणे | स्थानिक डिलिव्हरी बॉय ठेवा / स्वयं वितरण करा. |
सामान्य चुका टाळा: What Mistakes You Should Avoid While Running a Homemade Pickle Supply Business?
खाली काही सामान्य चुका दिलेल्या आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत.
- एकच लोणचं पुन्हा पुन्हा गरम करू नका.
- जुनी लोणची पुन्हा पॅक करू नका.
- ओलसर भांडी / हात वापरू नका.
- अतिजास्त तेल घालून चव दडपू नका.
- चुकीची तारीख, वजन लेबलवर टाकू नका.
- नोंद नसलेली ऑर्डर घेवू नका.
- दररोज चव चाचणी करूनच पुरवठा करा.
- हॉटेलच्या वेळापत्रकाप्रमाणे डिलिव्हरी द्या.
- ग्राहकांचा फीडबॅक दुर्लक्षित करू नका.
व्यवसाय वाढवण्याचे पर्याय: How Will You Expand Your Homemade Pickle Supply Business?
- नवीन लोणच्याचे प्रकार ट्राय करा
- कुटुंबातील महिलांचा सहभाग घ्या
- लोणच्याचे गिफ्ट पॅक तयार करा
- वाढदिवस/लग्नात पार्सल लोणचं पुरवठा
- वाणसामान दुकानदारांशी संपर्क करा
- लोणचं, पापड, मसाले यांचा कॉम्बो विक्री
- महिला बचत गटांशी भागीदारी
- मोठ्या कॅफे किंवा पार्सल चेनशी बोलणी करा
- Amazon, Flipkart वर विक्री
- तसेच इतरप्रकारे ऑनलाईन ऑर्डर सिस्टिम सुरू करा (WhatsApp / Google Form / Shopify)
निष्कर्ष:
घरगुती लोणचं हा एक परंपरागत पण आजच्या काळातही टिकणारा आणि नफा देणारा व्यवसाय आहे, तसेच लोणचं पुरवठा व्यवसाय हा छोट्या गावातही यशस्वी होणारा उद्योग आहे. विशेषतः हॉटेल व पार्सल क्षेत्रात अशी उत्पादने नेहमी मागणीमध्ये असतात. हॉटेल आणि पार्सल सेवेसाठी लोणचं पुरवणं हा कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत बनू शकतो. तुम्ही जर स्वयंपाकात कौशल्यवान असाल, सातत्य ठेवू शकत असाल आणि जर तुमच्याकडे थोडा आत्मविश्वास असेल तर घरातून हा व्यवसाय सुरू करून काही महिन्यांतच दर्जेदार उत्पन्न मिळवता येऊ शकतं.
मग तयार आहात का तुमचं घरगुती लोणचं एका ब्रँडमध्ये रूपांतर करण्यासाठी? आजच 2 हॉटेल किंवा पार्सल सेंटरशी संपर्क करा आणि नमुना द्या! लक्षात ठेवा, व्यवसायाची सुरुवात लहान असली तरी, त्याचा परिणाम मोठा असतो!
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQs): Homemade Pickle Supply Business
Q1. मी घरी एकटी असून व्यवसाय सुरू करू शकते का?
उ. होय, हा व्यवसाय घरीच एकट्या व्यक्तीनेही करता येतो.
Q2: काय मी फक्त एक प्रकारचं लोणचं देऊन व्यवसाय सुरू करू शकतो का?
उ. हो, सुरुवात एका प्रकारापासून करा आणि मागणीप्रमाणे इतर प्रकार जोडा.
Q3: FSSAI नोंदणी किती आवश्यक आहे?
उ. छोट्या स्तरावर नाही, पण व्यवसाय वाढल्यावर FSSAI नंबर आवश्यक आहे. मोठ्या हॉटेल्स किंवा ऑनलाइन विक्रीसाठी तर FSSAI नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे.
Q4: लोणचं किती दिवस टिकेल?
उ. योग्य पद्धतीने बनवल्यास 3 – 6 महिने टिकू शकतं.
Q5. लोणचं खराब होण्यापासून कसं वाचवावं?
उ. स्वच्छतेची काळजी घ्या, कोरड्या भांड्यांचा वापर करा आणि योग्य प्रमाणात तेल/मीठ वापरा.
Q6. हॉटेलवाले वेळेवर पैसे देतील का?
उ. प्रारंभी रोख व्यवहार करा. नंतर विश्वासानुसार उधारी सुरू करता येईल.
Q7. हॉटेलमध्ये किती दराने विक्री करावी?
उ. ₹30 – ₹50 प्रति 100gm हा सामान्य दर आहे. मात्र चवीनुसार तो वाढू शकतो.
Q8: वितरणासाठी वाहन आवश्यक आहे का?
उ. प्रारंभी स्वतः किंवा डिलिव्हरी बॉय द्वारे करता येते. नंतर दुचाकी किंवा टेम्पो वापरता येईल.
Q9: पार्सल किंवा डब्यांचं पॅकिंग कुठून मिळेल?
उ. Amazon, Udaan, Jumbotail किंवा स्थानिक मार्केटमधून सहज मिळू शकतात.
तर आता वेळ आहे तुमचं घरगुती लोणचं एका यशस्वी उद्योगात रूपांतरित करण्याची! हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटला का? आपल्या वेबसाइट majhaudyogg.com वरील इतर लेखसुद्धा वाचा आणि शेअर करा.
लेखक: शुभम गुंडूरकर
श्रेणी: उद्योग
आणखी वाचा:
घरबसल्या साडी व्यवसाय कसा सुरु करावा?
घरगुती पापड व्यवसाय कसा सुरु कराल?