Scented Clay Toys Business Guide – भारतात खेळण्यांचे संस्कृतीशास्त्र खूप जुने आहे. भारताच्या ग्रामीण आणि सांस्कृतिक वारशामध्ये लाकूड, कपडा, आणि विशेषतः मातीपासून बनवलेली खेळणी फार महत्त्वाची होती. अशी खेळणी मुलांच्या रोजच्या खेळाचा भाग होती. या खेळण्यांचा वापर मुलांच्या खेळासाठी, देवपूजेसाठी आणि सण-समारंभासाठी होत असे. आजही काही भागांमध्ये या खेळण्यांचा वापर होतो, परंतु आजच्या प्लास्टिकच्या युगात, प्लास्टिकच्या खेळण्यांमुळे पारंपरिक खेळण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
सुगंधी मातीची खेळणी ही त्याच परंपरेचा एक भाग असून ती पर्यावरणपूरक, आकर्षक आणि व्यवसायदृष्ट्या फायदेशीर आहेत. सुगंधी मातीचे खेळणे हे एक असे पारंपरिक उत्पादन आहे, जे आजही लोकांच्या मनात एक Nostalgic मूल्य जपून आहे. जर याला आधुनिक बाजारपेठ आणि ब्रँडिंग मिळालं, तर हे एक कमाईचं साधन होऊ शकतं. तर हा एक कमी भांडवलात सुरु होणारा घरगुती व्यवसाय आहे. सुरुवातीला फक्त अंदाजे ₹10,000 गुंतवणूक करून आपण हा व्यवसाय सुरू करु शकता. चला, तर या व्यवसायाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
व्यवसायाची संकल्पना काय आहे?

या लघुउद्योगात मातीपासून लहान आकारांची खेळणी (जसे की घोडा, बैल, झाडं, देवतांचे पुतळे इत्यादी. आणि आता तर मॉडर्न फिग्युरीन जसे ॲनिमे कॅरेक्टर्स (Anime Characters), डायनोसोर, बार्बी डॉल्स, इतर ॲक्शन कॅरेक्टर्स अशा खेळणी (Figurine) तयार केल्या जातात.), तसेच विविध मूर्ती, सजावटीच्या वस्तू इत्यादी बनवून त्यात नैसर्गिक सुगंध (चंदन, केशर, मोगरा इत्यादी सुगंध) मिसळले जातात.
या वस्तूंचा वापर मुलांना खेळण्यासाठी, घरातील सजावटीसाठी, पूजेसाठी आणि भेटवस्तू म्हणून होतो. बाजारात अशा वस्तूंना ‘Eco-friendly’ व ‘Handcrafted’ Clay Toys म्हणून चांगली मागणी आहे. या व्यवसायात रुळल्यानंतर पुढे आपण आपल्या खेळण्यांची परदेशी निर्यात ही करु शकता.
व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी: Scented Clay Toys Business Guide
व्यवसायासाठी जागा:
व्यवसाय म्हटलं की, जागा हा एक प्रत्येकालाच चिंता वाटणारा विषय असतो, परंतु या व्यवसायासाठी फार मोठ्या जागेची आवश्यकता नाही. अगदी 10×10 फूट जागेतही हा व्यवसाय आपण सुरू करु शकता आणि घरगुती स्वरूपात करता येण्यासारखा हा व्यवसाय आहे. त्यामुळे जागेची चिंता या व्यवसायात तरी नाही.
लागणारे साहित्य आणि भांडवली खर्च (₹ अंदाजे):
आता आपण या व्यवसायासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंची आणि त्यासाठी येणाऱ्या अंदाजे खर्चाची माहिती बघूया.
साहित्य | खर्च (₹ अंदाजे) |
चांगल्या प्रतीची माती (चिकण माती किंवा नदीकाठची माती) | ₹500 |
नैसर्गिक सुगंधी तेल (चंदन, मोगरा, केशर इत्यादी.) | ₹1,000 |
साचे किंवा हँडमोल्ड टूल्स | ₹1,500 |
रंग, ब्रश व इतर सजावटी साहित्य | ₹1,000 |
भट्टी (माती/इलेक्ट्रिक) | ₹2,500 |
इतर (पॅकिंग, वीज, पाणी) | ₹1,000 |
एकूण प्रारंभिक भांडवली खर्च (अंदाजे) | ₹7,000 – ₹10,000 |
हे सर्व साहित्य कुठून खरेदी कराल? Where To Buy The Required Material?
सुगंधी मातीची खेळणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपल्या आजूबाजूलाच सहज उपलब्ध असते. खाली दिलेले पर्याय वापरून आपण योग्य ठिकाणी खरेदी करू शकता.
चांगल्या प्रतीची चिकणमाती:

- चांगल्या प्रतीची चिकणमाती तुम्हाला स्थानिक कुंभारांकडून, नदीकाठी, किंवा शेतात मिळू शकते.
- तसेच IndiaMART किंवा Amazon यांसारख्या ई-कॉमर्स वेबसाइट्सवर ‘clay for sculpting’ असे सर्च केल्यास सुगंधी मातीसारखी नैसर्गिक माती सहज मिळून जाईल.
सुगंधी तेल (चंदन, मोगरा, केशर):
- स्थानिक आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा औषधी दुकानांमध्ये मिळते.
- ऑनलाइन खरेदीसाठी Amazon, Purplle आणि Khadi Essentials सारख्या वेबसाइट्सवर 100% शुद्ध सुगंधी तेल उपलब्ध असते.
- जर तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर खेळणी बनवायचा विचार करत असाल, तर IndiaMART वर सुगंधी तेलांचा ठोक पुरवठा करणारे व्यापारी सहज सापडतात.
खेळण्यांचे साचे (Moulds):
- तुम्ही लोकल हँडीक्राफ्ट दुकानदारांकडून हे साचे घेऊ शकता. सध्या Amazon आणि Flipkart वर silicone moulds ची विविध डिझाइन्स उपलब्ध आहेत.
- सजावटीचे रंग, ब्रश, पॅकिंग साहित्य हे सर्व स्टेशनरी किंवा आर्ट मटेरिअल दुकानांमध्ये मिळते.
- त्याचबरोबर ItsyBitsy.in सारख्या आर्ट-क्लासिक साइट्सवरही आकर्षक सजावटीचे साहित्य उपलब्ध आहे.
खेळणी भाजण्यासाठी भट्टी:
स्थानिक कुंभार भाड्याने भट्टी देतात. जर स्वतःची भट्टी बसवायची असेल, तर IndiaMART वर इलेक्ट्रिक भट्टी (kiln) ₹3,000–₹10,000 दरम्यान मिळते.
पॅकिंग मटेरिअल:
सजवलेली खेळणी आकर्षकपणे पॅक करण्यासाठी Kraft Paper, Decorative Boxes व Branding Stickers देखील सहज ऑनलाइन मिळतात.
स्पेशल टीप: तुम्ही IndiaMART वर “clay toy making material supplier” असं सर्च केलं तर संपूर्ण kit किंवा bulk मध्ये आवश्यक वस्तू विकणारे लघुउद्योगक/व्यापारी सापडतील.
सुगंधी मातीची खेळणी बनवण्याची प्रक्रिया: Scented Clay Toys Business Guide

कृती 1: मातीची निवड
- काळी चिकण माती किंवा तळ्याच्या तळातील माती उपयुक्त असते. अशा मातीची निवड करतात.
- ही चिकण माती छान गाळून घेतली जाते जेणेकरून ती एकसंध होईल.
- त्यानंतर ही माती योग्य प्रमाणात पाणी घालून मळली जाते.
Action 2: सुगंधी तेल मिश्रण
- माती भिजवल्यानंतर त्यात नैसर्गिक सुगंधी तेल मिसळले जाते (चंदन, मोगरा, वासंती, केशर इत्यादी.)
- यामुळे तयार खेळणींना नैसर्गिक सुगंध येतो. हा सुगंध व्यवस्थित मिक्स झाल्यास अंदाजे जवळपास तीन महिन्यांपर्यंत टिकतो.
कृती 3: साचे किंवा हस्तशिल्प
- तयार माती साच्यात घालून किंवा हाताने आकार दिला जातो. साचे वापरून खेळणींचे स्वरूप तयार केले जाते.
- हस्तकलेच्या माध्यमातूनही विविध आकृती घडवल्या जातात. मूळ स्वरूपानुसार शिल्प तयार केले जाते.
Action 4: वाळवणे व भाजणे
- तयार खेळणी 2 – 3 दिवस सावलीत वाळवली जातात.
- नंतर ती भट्टीत किंवा मातीच्या अवनमध्ये भाजली जातात.
कृती 5: रंगकाम व पॅकिंग
- नैसर्गिक रंग वापरून या खेळणींना रंगवले जाते.
- नंतर खेळण्यांची आकर्षक पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी सज्ज केले जाते.
व्यवसायाची खास वैशिष्ट्ये: Scented Clay Toys Business Guide
कमी भांडवल – अधिक नफा:
मातीची सुगंधी खेळणी बनवण्याचा हा व्यवसाय कमी भांडवलात सुरू करता येतो आणि अधिक नफा मिळवून देतो. फक्त ₹10,000 – ₹15,000 गुंतवणूक करुन आपण हा व्यवसाय सुरू करु शकता. केलेली गुंतवणूक एका महिन्यातच चांगल्या नफ्यातून वसूल होते.
घरबसल्या करता येण्यासारखा उद्योग:
हा व्यवसाय घरबसल्या करता येत असल्याने महिलांसाठी, निवृत्त व्यक्तींसाठी आणि बेरोजगार तरुणांसाठी उत्तम पर्याय आहे.
स्थानिक संस्कृती जपणारा व्यवसाय:
पर्यावरणपूरक आणि परंपराश्रित व्यवसाय आहे. कोणतेही आर्टिफिशियल काम करण्याची गरज नाही किंवा फार काही मेहनत घ्यायची गरज नाही. या व्यवसायातून स्थानिक संस्कृती जपली जाते.
महिना अंदाजे ₹25,000 पर्यंत उत्पन्न:
या व्यवसायातून दरमहा ₹10,000 ते ₹25,000 एवढे उत्पन्न कमावणे शक्य आहे. ऑनलाईन सेलिंग प्लॅटफॉर्मवरुन सेलर अकाऊंट तयार करून आणि सोशल मिडीयावर मार्केटिंग करुन आपण हे आरामात साध्य करु शकता.
ग्रामविकासासाठी उपयुक्त:
हा व्यवसाय ग्रामविकासासाठीही हातभार लावतो. या व्यवसायातला मूलभूत कच्चा घटक, चिकण माती आपल्याला सहसा मिळत नसल्यास ग्रामीण स्थानिक शेतकऱ्यांसोबत किंवा कुंभारांसोबत टाय-अप करु शकता. इतर वस्तू ही आपल्याला मिळतील. महिलांना रोजगार देण्याची संधीही हा व्यवसाय प्रदान करतो.
परदेशी निर्यात:
सुगंधित मातीची खेळणी आपण परदेशातही निर्यात करु शकता. लोकल मार्केट बरोबरच परदेशातही या खेळण्यांना भरपूर मागणी आहे. त्यामुळे “आऊट ऑफ द बॉऊंड्रीज” व्यवसाय वाढविण्यासाठी सुद्धा हा उत्तम पर्याय आहे.
विक्री आणि मार्केटिंग: Scented Clay Toys Business Guide
ऑफलाईन विक्री: Scented Clay Toys Business Guide
स्थानिक पातळीवर विक्री:
शाळांमध्ये खेळण्यांचं एकदिवसीय प्रदर्शन भरवू शकता आणि विद्यार्थी-शिक्षकांना पर्यावरणपूरक खेळणी वापरण्यासाठी आवाहन करू शकता. ग्रामीण बाजार, जत्रा, पूजावस्तू स्टॉल इत्यादी व्यवसायविषयक टाय-अप करू शकता किंवा आपला स्वतःचा स्टॉल लावून विक्री करू शकता. हातगाडी लावून भाजी मार्केटमध्ये ही विक्री करता येते.
स्थानिक दुकानदारांसोबत टाय-अप:
स्थानिक दुकानदार किंवा हँडीक्राफ्ट विक्रेत्यांशी संपर्क करून टाय-अप करा. मोठ्या स्केलवर हा बिझनेस करायचा असल्यास मार्जिन ठरवा आणि मोक्याच्या व्यावसायिक ठिकाणी, आपल्या ब्रँडचा प्रोमोटर नेमू शकता.
ऑनलाईन विक्री: Scented Clay Toys Business Guide
सोशल मीडिया विक्री धोरण (Social Media Sales Strategy):
Facebook, Instagram, WhatsApp वरून ऑर्डर घेता येतात. या सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सवर विक्री कशी करावी त्याची माहिती खाली दिली आहे.
Facebook:
फेसबुक मार्केटप्लेसवर जाहिरात करू शकता. फेसबुक ओपन केल्यावर वरती हेडरजवळ आपल्याला 5 – 6 आयकॉन दिसतात. नोटिफिकेशन आयकॉनच्या शेजारी आपल्या मार्केटप्लेसचं आयकॉन दिसेल. फेसबुकवर ग्रुप किंवा आपल्या ब्रँडचं पेज बनवूनही तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करु शकता.
Instagram:
Instagram वर Business Account तयार करा. आपले प्रोडक्ट्स स्टोरीला ठेवू शकता. Insta Reels बनवूनही अपलोड करु शकता. आपल्या मार्केटिंगचा Response बघण्यासाठी बिझनेस अकाऊंटवर आपल्याला Professional Dashboard दिलं जातं.
WhatsApp:
व्हाट्सअप बिझनेस अँप (WhatsApp Business App) इन्स्टॉल करून प्रोफेशनल अकाऊंट तयार करा. कॅटलॉग (Catalogue) बनवा. व्हाट्सअप वर आपण स्टेट्स ठेवून विक्री करु शकता. व्यावसायिक व्हाट्सअप ग्रुप्स बनवून त्यात प्रोडक्टचे फोटो टाकू शकता तसेच ब्रॉडकास्ट मॅसेजद्वारे एकदाच अनेक लोकांना प्रोडक्टविषयी माहिती देऊ शकता.
WhatsApp Business App विषयी संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा.
Seller Account तयार करा:
OLX, IndiaMART, Etsy, Amazon, Flipkart वर हँडीक्राफ्ट स्टोअर्स सुरू करणे हा उत्कृष्ट पर्याय आहे. आपण या ऑनलाईन व्यवसाय प्लॅटफॉर्म्सवर विक्रेता अकाऊंट (Seller Account) तयार करु शकता. सेलर अकाऊंट तयार केल्याने आपल्याला आपला बिझनेस ट्रॅक करण्यासाठी अनेक फिचर्स मिळतात. त्याचा उपयोग आपण आपल्या वस्तूंची विक्री वाढवण्यासाठी करु शकता.
Google My Business वर प्रोफाइल तयार करणे:
गूगल माय बिझनेस वर आपली विक्रेता प्रोफाईल तयार करा. प्रोफाईल तयार करण्यासाठी येथे क्लिक करा. Google My Business आपल्या व्यवसायासाठी अनेक सुविधा प्रदान करते. आपल्या प्रोफाईलवर आपला संपर्क क्रमांक, कामाचे तास, वेबसाईट असेल तर त्याची लिंक, आपल्या प्रोडक्ट्सचे फोटो इत्यादी. महत्वाच्या गोष्टींची नोंद करा.
ब्रँडिंग करण्यासाठी स्पेशल टिप्स by Majha Udyogg:
Product Description साठी काही खास शब्द:
Eco-friendly, Handcrafted, Traditional, Natural Scented अशा शब्दांचा वापर करा. हे शब्द कॅची वाटतात आणि आपल्याला खेळण्यांना महत्व प्राप्त करून देतात.
ब्रँडचं नाव आणि टॅगलाईन:
आपल्या ब्रॅंडची अशी एखादी टॅगलाईन ठरवा, की ती ग्राहकाचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली पाहिजे. जसे की, “मातीचा सुवास, आपल्या संस्कृतीचा अभिमान” अशी टॅगलाइन किंवा “सुगंधी खेळणी – आपल्या बालपणाचा सुवास” अशाप्रकारे टॅगलाईन वापरा. तसेच आपल्या ब्रॅंडचं नाव असं ठेवा, ज्यातून संस्कृती आणि कलात्मकता या गोष्टी दिसल्या पाहिजेत. आपल्या व्यवसायाशी समर्पक असे नाव ठरवा.
नफा आणि दर अंदाज: Scented Clay Toys Business Guide
उत्पादन प्रकार | उत्पादन खर्च (₹) | विक्री किंमत (₹) | नफा (₹) |
खेळणे (प्रति नग) | ₹5 – ₹7 | ₹25 – ₹50 | ₹20 – ₹45 |
मूर्ती / शोपीस सेट | ₹30 – 40 | ₹150 – ₹300 | ₹120 – ₹270 |
नफा मार्जिन: वरील अंदाजानुसार, 70% पेक्षा जास्त नफ्याचा मार्जिन निघतो.
दैनंदिन उत्पन्न: आपण जर दररोज 15–20 खेळणी विकण्याचा प्रयत्न केला, तर महिन्याला ₹15,000 ते ₹25,000 उत्पन्न कमावणे सहज शक्य आहे.
शासकीय योजना व साहाय्य:
शासकीय योजनेचे नाव | फायदे |
PMEGP (प्रधानमंत्री रोजगार योजना) | भांडवली खर्चावर 25% – 35% अनुदान. PMEGP योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. |
मुद्रा कर्ज योजना (Mudra Loan) | ₹50,000 ते ₹10 लाख कर्ज |
KVIC प्रशिक्षण योजना | मोफत प्रशिक्षण व प्रमाणपत्र, व इतर सवलती. ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा उद्योग केंद्रात अर्ज करा. |
व्यवसायातील एक उदाहरण:
कोल्हापूरच्या सौ. सुमती पाटील यांनी लॉकडाऊनच्या काळात हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला फक्त 10 खेळणी बनवून WhatsApp वर स्टेटसला ठेवली. त्यानंतर त्यांना काही ऑर्डर्स मिळाल्या. आता त्या ह्या व्यवसायात नियमित झाल्या आहेत आणि आपल्या व्यवसायातून दरमहा 20 ते 25 हजार रुपये कमावतात.
यशासाठी महत्त्वाचे उपाय: Scented Clay Toys Business Guide

- आपल्या खेळण्यांसाठी दर्जेदार सुगंध आणि माती वापरा.
- नैसर्गिक रंगांवर भर द्या. कृत्रिम रंगांचा वापर मोजका ठेवा.
- Instagram Reels किंवा YouTube Shorts ने मार्केटिंग करा.
- स्थानिक मेळाव्यांमध्ये (जसे की, हस्तकला मेळावा, सांस्कृतिक वस्तू मेळावा) भाग घ्या.
निष्कर्ष: Scented Clay Toys Business Guide

मातीपासून सुगंधी मातीची खेळणी बनवणे हा एक पारंपरिक, पर्यावरणपूरक आणि सांस्कृतिक मूल्य असलेला आणि महत्वाचं म्हणजे नफा मिळवून देणारा लघुउद्योग आहे. आधुनिक बाजारपेठेत अशा हस्तकलेला मोठ्या प्रमाणावर मागणी पण आहे. पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि सांस्कृतिक मूल्य यामुळे हा व्यवसाय नवउद्योजकांसाठी आदर्श आहे.
कमी गुंतवणुकीतून, चांगला नफा मिळवण्यासाठी आणि आपल्या गावातील इतर महिलांनाही रोजगार देण्यासाठी ही संधी सर्वोत्तम आहे. जर तुम्हाला काहीतरी वेगळं आणि मूल्यवर्धक असं काही सुरू करायचं असेल, तर हा व्यवसाय उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे हा व्यवसाय नक्की सुरु करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Q1: सुगंधी खेळण्यांसाठी कोणती माती चांगली असते आणि ही माती कुठून मिळवावी?
उत्तर: काळी चिकण माती किंवा नदी/तळ्याच्या काठची चिकण माती सर्वोत्तम असते. अशी चिकण माती आपल्याला गावाकडील विहिरी, नदीकाठी किंवा शेतीतून ही मिळू शकते.
Q2: मातीला सुगंध कसा मिसळायचा?
उत्तर: माती भिजवल्यानंतर नैसर्गिक तेल, जसे चंदन, मोगरा इत्यादी सुगंधित तेलाचे 5-10 थेंब मिसळावे.
Q3: सुगंध किती दिवस टिकतो?
उत्तर: नैसर्गिक सुगंध तेल वापरल्यास 1-3 महिने सुवास टिकतो.
Q4: भट्टी लागेल का?
उत्तर: होय, भाजण्यासाठी साधी मातीची किंवा इलेक्ट्रिक भट्टी आवश्यक आहे.
Q5: सुगंधी तेल कुठे मिळते?
उत्तर: आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा ऑनलाइन साइट्सवर मिळते.
Q6: मला साचा कुठे मिळेल?
उत्तर: Amazon, IndiaMART किंवा लोकल मार्केटमध्ये मातीच्या वस्तूंचे साचे मिळतात.
Q7: ही खेळणी परदेशात पाठवता येतील का? निर्यात करता येईल का?
उत्तर: होय. खास करून “Handcrafted Eco Toys” म्हणून परदेशात मागणी आहे. Etsy, Amazon Global इत्यादी. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्समार्फत निर्यात करता येते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला admin@majhaudyogg.com या ई-मेलवर नक्की कळवा.
लेखक: शुभम गुंडूरकर (majhaudyogg.com)
श्रेणी: उद्योग
आणखी वाचा:
घरबसल्या साडी व्यवसाय सुरू करा
मोबाईल रिपेअरिंग आणि ॲक्सेसरीज विक्री व्यवसाय सुरू करा