अगरबत्ती व्यवसाय कसा सुरु करायचा? – PMEGP योजनेअंतर्गत संपूर्ण मार्गदर्शन (2025) | How To Start Incense Stick Making Business – Complete Guidance Under PMEGP Scheme (2025)

Agarbatti Business in Marathi – नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, Majha Udyogg या आमच्या वेबसाईटवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अगरबत्ती (Incense Stick), जिला आपण “उदबत्ती” असेही म्हणतो, ही एक संपूर्ण भारतात रोजच वापरली जाणारी एक वस्तू आहे. देवापुढे अगरबत्ती लावल्याशिवाय आपण भारतीय लोक आपला दिवस सुरु करत नाही. प्रत्येक घरगुती आणि सार्वजनिक धार्मिक प्रसंगात आपल्याला अगरबत्तीची आवश्यकता असते, एव्हाना यापुढे जाऊन आपण असेही म्हणू शकतो की, अगरबत्ती शिवाय कोणताही धार्मिक किंवा शुभ प्रसंग भारतामध्ये होणे शक्यच नाही. तर अशा या अगरबत्तीच्या उद्योगाचं ही तेवढंच महत्व आहे, कारण सर्वसामान्य भारतीयांच्या आयुष्यातली ती एक रोजच लागणारी महत्वाची गोष्ट आहे. अगरबत्ती बनवणे (येथून पुढे आपण अगरबत्ती असाच उल्लेख करू) हा भारतातील एक पारंपारिक उद्योग आहे. मंदिरे, घरे, दुकानं, व्रतवैकल्यांमध्ये तिचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. कमी भांडवलात घरी बसून सुद्धा सुरू करता येणारा आणि रोजच मागणी असलेला व्यवसाय म्हणजे अगरबत्ती उद्योग. चला तर अगरबत्ती व्यवसायाविषयी संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया!

Table of Contents

भारतातील अगरबत्ती व्यवसायाची थोडक्यात माहिती:

अगरबत्ती व्यवसायाचे वार्षिक उत्पादन सुमारे ७५०० कोटी रुपये इतके आहे आणि त्यात सुमारे ५ लाख लोक सहभागी आहेत आणि सुमारे ७५० कोटी रुपयांची अगरबत्ती परदेशात निर्यात होते. यावरून भारतात अगरबत्ती व्यवसाय हा किती मोठा व्यवसाय आहे याची आपल्याला पुसटशी का होईना, पण कल्पना आली असेल!

भारत हा अगरबत्ती (उदबत्ती) उत्पादक देशांपैकी एक आघाडीचा देश आहे, ज्याने देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठ काबीज केली आहे. अगरबत्ती उत्पादनात आपला देश, भारताचे आघाडीचे स्थान आहे आणि जगातील अर्ध्याहून अधिक देशांच्या अगरबत्त्यांच्या गरजा आपण पूर्ण करतो. यावरून भारताचं अगरबत्ती व्यवसायातील ग्लोबल मार्केट किती भक्कम आहे याची कल्पना आपल्याला आली असेल. मग जो व्यवसाय, जागतिक मार्केट मध्ये भारताचं एवढं तगडं प्रतिनिधीत्व करतो, त्या व्यवसायात उतरणं एक उद्योजक म्हणून आपल्यासाठी क्रमप्राप्त ठरतं.

अगरबत्ती उद्योगाचे फायदे: Agarbatti Business in Marathi

आता आपण थोडक्यात अगरबत्ती व्यवसायाच्या काही फायद्यांविषयी माहिती घेऊया, जेणेकरून आपल्याला या व्यवसायाविषयी थोडा-फार अंदाज येईल.

कमी गुंतवणूक आणि जास्त परतावा:


अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय सुरु करण्यासाठी फार मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही. थोड्या गुंतवणुकीतही हा व्यवसाय सुरू करता येतो. सुरुवातीला ₹1.5 ते ₹2 लाख रुपयांत व्यवसायाची उभारणी करता येते, आणि नियमित मागणी असल्याने नफा सतत मिळत राहतो व गुंतवलेलं भांडवल अल्प कालावधीतच भरून निघतं.

घरी बसून सुरू करता येणारा व्यवसाय:


महिलांसाठी (गृहिणी), निवृत्त व्यक्तींसाठी (Retired Person) किंवा ज्या व्यक्ती पूर्णवेळ (Full Time) नोकरी करू शकत नाहीत, किंवा बेरोजगार तरुण ज्यांना व्यवसायात उतरण्याची इच्छा आहे, अशा व्यक्तींना घरातून हा व्यवसाय चालवता येतो. त्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत व्यवसाय करणे शक्य होते.

सतत मागणी:


अगरबत्ती ही धार्मिक, आध्यात्मिक, सुगंधी आणि प्रसन्न वातावरण तयार करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे तिची मागणी वर्षभर स्थिर असते आणि वरती सांगितल्याप्रमाणे भारत हा अगरबत्ती व्यवसायात आघाडीवर असल्याने मागणी सतत असते, त्यामुळे तोटा व्हायचा प्रश्नच निर्माण होत नाही. हा व्यवसाय नेहमी जोम धरून राहतो.

Use of Incense Sticks in Religious Moments

स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मार्केट:


भारतासह इतर अनेक देशांतही भारतीय अगरबत्तीला मोठी मागणी आहे. तसेच वरती सांगितल्याप्रमाणे, आपला देश भारताचं अगरबत्ती व्यवसायामध्ये जगात आघाडीचं स्थान आहे आणि जगातील अर्ध्याहून अधिक देशांना आपण अगरबत्ती सप्लाय करतो त्यामुळे देशांतर्गत पुरवठा करून परत निर्यातीद्वारे अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधी यामुळे आपल्याला निर्माण होते.

अगरबत्ती व्यवसायासाठी आवश्यक गोष्टी: Agarbatti Business in Marathi

अग्नबत्ती (अगरबत्ती) व्यवसायासाठी लागणाऱ्या मशिनरीची सविस्तर यादी खाली दिली आहे. ही यादी लघु स्तरावर (Small Scale) ते मध्यम स्तरावर (Medium Scale) उत्पादन करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे:

अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री (Machinery List for Agarbatti Making):

मशिनकार्यप्रकारकिंमत ( अंदाजे)
अगरबत्ती मेकिंग मशीन (Agarbatti Making Machine)
ही मुख्य उपकरण आहे, जे बांबू स्टिकवर मिश्रण लावून अगरबत्ती तयार करते.
मॅन्युअल मशीन (हस्तचालित) (Manual Machine)

सेमी-ऑटोमॅटिक मशीन (Semi-Automatic Machine)

फुली ऑटोमॅटिक मशीन (Fully-Automatic Machine)
₹25,000 ते ₹1,50,000 (मॉडेलनुसार)
मिक्सिंग मशीन / पावडर मिक्सर (Raw Material Mixing Machine)कोळसा, जिगट (Jigat), आणि इतर पावडरचे मिश्रण तयार करण्यासाठी वापरले जाते.ब्लेड मिक्सर (Blade Mixer)

पॅडल मिक्सर (Paddle Mixer)
₹15,000 ते ₹60,000
ड्रायर / सुकवण्याची व्यवस्था (Drying System)अगरबत्तीला ओलावा असतो, त्यामुळे ती नीट सुकवणे गरजेचे होऊन बसते.साधे छप्पर व वाळवण्याचे स्टँड (Natural Sun Drying with Rack)

इलेक्ट्रिक ड्रायर (पावसाळ्यासाठी) (Electric Dryer – For Rainy Season)
वाळवण्याचे स्टँड – ₹3,000 ते ₹10,000

इलेक्ट्रिक ड्रायर – ₹20,000 ते ₹70,000
कटर मशीन (Agarbatti Cutter Machine)तयार झालेल्या अगरबत्तीच्या शेवटी असलेले अतिरिक्त साहित्य (Remaining Material) कापण्यासाठी वापरले जाते.NA₹5,000 ते ₹15,000
पावडर फिल्टर मशीन (Powder Sieving / Filtering Machine)मिश्रणातील मोठे तुकडे, धूळ वेगळी करण्यासाठी वापरले जाते.NA₹7,000 ते ₹25,000
सुगंध मिसळण्याची यंत्रणा (Fragrance Mixing Machine)अगरबत्तीला सुगंध देणारे तेल किंवा द्रव्य पावडरमध्ये मिसळण्यासाठी.NA₹10,000 ते ₹35,000
पॅकिंग मशीन (Agarbatti Packing Machine)तयार झालेल्या अगरबत्त्या पॅक करण्यासाठी.मॅन्युअल पॅकिंग मशीन (Manual Packing Machine)

सेमी-ऑटोमॅटिक पॅकिंग मशीन (Semi-Automatic Packing Machine)
₹15,000 ते ₹1,00,000+
एअर (हवा) कंप्रेसर (Air Compressor) – जर फुल्ली ऑटोमॅटिक मशीन असेल तरमशीनमध्ये हवेचा दाब देण्यासाठी वापरले जाते.NA₹10,000 ते ₹25,000
डस्ट कलेक्टर (Dust Collector Machine) – वैकल्पिकमशीनमधून उडणारी धूळ गोळा करण्यासाठी वापरले जाते.NA₹20,000 ते ₹50,000 (आवश्यकतेनुसार)

इतर उपयुक्त उपकरणे आणि साहित्य:

उपकरण/साहित्यउपयोगअंदाजे किंमत
स्टील ट्रे आणि ट्रॉली (Steel Tray and Trolley)अगरबत्ती सुकवण्यासाठी याचा वापर होतो.₹1,000 – ₹5,000
डिजिटल वेइंग मशीन (Digital Weighing Machine)साहित्याचे अचूक वजन मोजण्यासाठी वापर करतात.₹1,000 – ₹3,000
सिलर मशीन (Sealing Machine)पॅकिंग बॅग सील करण्यासाठी हवी असते.₹2,000 – ₹10,000
बॅग आणि डब्बे (Plastic Bags, Boxes)तयार माल साठवण्यासाठी हवे असतात₹1,000 – ₹5,000
ग्लोव्हज, मास्क, एप्रन (Gloves, Mask, Apron)स्वच्छतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी₹500 – ₹1,500
टेबल, खुर्च्या (Table and Chairs)काम करण्यासाठी₹2,000 – ₹5,000

यंत्रे खरेदी करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:

  • PMEGP / MSME योजनेतून सबसिडी मिळू शकते.
  • ISI किंवा CE प्रमाणित यंत्र विकत घ्या.
  • वॉरंटी आणि सर्व्हिसिंग उपलब्ध आहे का ते तपासा.
  • सेकंड हँड यंत्र घेत असल्यास पूर्णपणे तपासून घ्या.

अगरबत्ती व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल: Agarbatti Business in Marathi

अगरबत्ती व्यवसायासाठी कच्चा माल अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण याच्या गुणवत्तेवरच तयार उत्पादनाची गुणवत्ता, सुगंध, जळण्याची वेळ आणि किंमत अवलंबून असते. खाली अगरबत्ती व्यवसायासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची सविस्तर माहिती दिली आहे:

बांबू स्टिक (Bamboo Sticks)

  • भूमिका: अगरबत्ती बनवण्यासाठी मुख्य आधार (core) म्हणून वापरली जाते.
  • माप: 8″ ते 12″ (प्रचलित)
  • प्रकार: गोल, चौरस किंवा कापलेली
  • गुणवत्ता: सरळ, सुकलेल्या आणि मजबूत स्टिक वापरणे योग्य
  • किंमत (अंदाजे): ₹100 – ₹150 प्रति किलो / 4000 ते 5000 स्टिक्स प्रति किलो

अगरबत्ती पावडर मिश्रण (Agarbatti Powder Mixture)

ह्या मिश्रणात खालील घटक वापरले जातात:

चारकोल पावडर (Charcoal Powder)
  • भूमिका: अगरबत्तीला जळणासाठी आवश्यक असणारा घटक.
  • किंमत: ₹12 – ₹25 प्रति किलो

जिगट पावडर (Jigat Powder) / जेसालिन पावडर (Joss Powder)
  • भूमिका: पावडरमध्ये बाइंडर (binding agent) म्हणून वापरले जाते.
  • किंमत: ₹30 – ₹70 प्रति किलो (जिगट), ₹80 – ₹150 प्रति किलो (जेसालिन)

वूड पावडर (Wood Powder / Saw Dust)
  • भूमिका: मिश्रणात घनता आणि ज्वलनशीलता वाढवते.
  • किंमत: ₹5 – ₹15 प्रति किलो

परफ्यूम / सुगंध तेल (Fragrance / Scent / Agarbatti Perfume)
  • भूमिका: अगरबत्तीचा सुगंध ठरवणारा मुख्य घटक.
  • प्रकार:
    1. चंदन (Sandalwood)
    2. मोगरा (Jasmine)
    3. गुलाब (Rose)
    4. लवेंडर (Lavender)
    5. विशेष ब्रँडेड परफ्यूम (High Grade Synthetic)
  • किंमत: ₹500 – ₹3000 प्रति लिटर (गुणवत्तेनुसार)

सोल्व्हेंट / डिपिंग ऑईल (Solvent / Dipping Oil)
  • भूमिका: सुगंध पावडर किंवा अगरबत्तीवर सम प्रमाणात लावण्यासाठी.
  • प्रकार: DEP (Diethyl Phthalate), व्हाइट मिनरल ऑईल, इ.
  • किंमत: ₹100 – ₹250 प्रति लिटर

रंग (Color Powder – Optional)
  • भूमिका: आकर्षक दिसण्यासाठी काही अगरबत्त्यांना रंग दिला जातो.
  • किंमत: ₹50 – ₹150 प्रति किलो

पॅकिंग साहित्य (Packaging Material)
प्लास्टिक पिशव्या / झिप लॉक बॅग्स (Plastic Bags)
  • युनिट पॅकिंगसाठी
  • किंमत: ₹100 – ₹200 प्रति 100 बॅग्स
छपाई केलेले बॉक्सेस (Printed Boxes / Cartons)
  • ब्रँडेड पॅकिंगसाठी
  • किंमत: ₹2 – ₹5 प्रति बॉक्स
स्टिकर / लेबल (Brand Labels)
  • ब्रँड ओळखीसाठी
  • किंमत: ₹1 – ₹3 प्रति लेबल

थर्मल सीलिंग फिल्म / बायोप्लास्टिक

  • मॉडर्न पॅकिंगसाठी
  • किंमत: ₹200 – ₹500 प्रति किलो

कच्चा माल खरेदी करताना टिप्स:

  • थेट होलसेल पुरवठादारांकडून घ्या – किंमत कमी मिळते.
  • PMEGP किंवा MSME नोंदणी असल्यास GST सवलतीचा फायदा होतो.
  • प्रमाणित सुगंध (ISO certified perfume) वापरल्यास बाजारात चांगली प्रतिमा तयार होते.
  • कच्चा माल साठवताना कोरड्या जागेत ठेवा.
  • ऑनलाइन विक्रेते (IndiaMART, TradeIndia, Udaan) कडून किंमती तुलना करा.

अगरबत्ती व्यवसायासाठी लागणारी अंदाजित जागा: Agarbatti Business in Marathi


अगरबत्ती व्यवसायासाठी फार जागा लागत नाही. छोट्या जागेतही आपण अगरबत्ती व्यवसाय सुरु करू शकता. किमान 100–150 चौरस फुट (Square Foot) जागा पुरेशी आहे.

एकूण भांडवल (2025): Agarbatti Business in Marathi


वरती दिल्याप्रमाणे, अगरबत्ती व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री, कच्चा माल, तसेच इतर महत्त्वाची उपकरणे मिळून जवळपास ₹1,50,000 – ₹2,00,000 एवढा खर्च येऊ शकतो.

अगरबत्ती बनवताना लक्षात घेण्यासारख्या गोष्टी: Agarbatti Business in Marathi

गुणवत्ता:


बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी उत्पादित अगरबत्तीची गुणवत्ता अतिशय महत्त्वाची ठरू शकते. खराब सुगंध, योग्य मिश्रण न वापरणे, चुकीची पॅकिंग यामुळे ग्राहक नाराज होऊ शकतात व त्याचा फटका आपल्या व्यवसायास बसू शकतो. त्यामुळे गुणवत्तेची काळजी घेणे हा फार महत्वाचा मुद्दा ठरतो.

सुगंधी प्रकारांचा प्रयोग:


विविध सुगंध जसे की, – चंदन (Sandalwood), गुलाब (Rose), जास्वंद, मोगरा (Jasmine), लॅव्हेंडर (Lavender), विशेष ब्रँडेड परफ्यूम (High Grade Synthetic) – या प्रकारांत अगरबत्त्या तयार करून ग्राहकांना निवडीचे पर्याय देता येतात.

Different Scents/Flavours Of Incense Sticks

ब्रँडिंग आणि मार्केटिंग:


व्यवसायाची ओळख निर्माण करायची असल्यास एक वेगळं नाव, लोगो, आणि आकर्षक पॅकेजिंग करणं गरजेचं आहे. स्थानिक प्रदर्शनात, ऑनलाईन मार्केटप्लेसवर (जसे की Amazon, Flipkart, Indiamart) किंवा सोशल मीडियावर (Facebook, Instagram etc.) प्रचार करून विक्री वाढवता येऊ शकते.

प्रशिक्षण आणि अनुभव:


जर तुम्ही या क्षेत्रात नवखे/नवीन असाल, तर स्थानिक उद्योग केंद्राच्या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी व्हा. तिथे मशीन ऑपरेशन, साहित्य मिश्रण, सुगंध निवड, पॅकिंग व इतर बाबतीत परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं. ज्याचा उपयोग आपल्याला व्यवसायात मजबुतीने उतरण्यासाठी होईल.

PMEGP योजना काय आहे? What is Prime Minister’s Employment Generation Programme?

प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) ही केंद्र सरकारची योजना आहे, ज्या अंतर्गत उद्योजकांना भांडवलावर 15% ते 35% पर्यंत अनुदान दिलं जातं. केंद्र शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना या दोन योजना एकत्रित करुन पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) 15 ऑगस्ट 2008 पासून जाहीर केली आहे. सदर योजनेचा मुख्य उद्देश हा स्वयंरोजगार उभारणीस प्रोत्साहन देण्यासाठी सुलभ तत्वावर भांडवल उभारणी करुन देणे हा आहे.

राज्यात राष्ट्रीयकृत बँकांमार्फत सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग, खादी ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्र या तीन यंत्रणेमार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येते.

राज्य खादी ग्रामोद्योग आयोग, मुंबई ही सदर योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करते.

योजनेअंतर्गत सुविधा

उत्पादित उद्योग घटकांना कमाल ₹25 लाखापर्यंत तसेच व्यवसाय-सेवा उद्योग घटकांना कमाल ₹10 लाखापर्यंतचे अर्थसहाय्य बँकामार्फत केले जाते. उद्योग घटकास 5 ते 10 टक्के रक्कम स्वगुंतवणूक करावी लागते. बँकेचा कर्ज समभाग 90 ते 95 पर्यंत असतो.

Prime Minister’s Employment Generation Programme (PMEGP) योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

PMEGP अंतर्गत अर्ज कसा कराल?

  1. kviconline.gov.in/pmegpeportal येथे लॉगिन करा.
  2. “New Applicant Registration” वर क्लिक करा.
  3. तुमचे वैयक्तिक व व्यवसायाचे तपशील भरा.
  4. Project Report अपलोड करा.
  5. तुमच्या KVIC/DIC कार्यालयाकडून मुलाखत घेतली जाईल.

PMEGP योजनेत अर्ज करताना काही महत्त्वाचे मुद्दे:

Project Report नीट तयार करा:


तुमचा व्यवसाय कसा चालेल, खर्च काय असेल, नफा किती मिळेल, मशीनरी, कामगार, कच्चा माल याचा तपशील असलेली व्यावसायिक प्रकल्प अहवाल (Project Report) तयार करणं खूप आवश्यक आहे.

उद्योग आधार आणि पॅन कार्ड असणे आवश्यक:


PMEGP योजनेसाठी अर्ज करताना उद्योग आधार (Udyam Registration), पॅन कार्ड, बँक पासबुक, फोटो, जात प्रमाणपत्र (जर लागल्यास) ही कागदपत्रं तयार ठेवा.

फॉलोअप:


एकदा अर्ज केल्यानंतर संबंधित KVIC/DIC कार्यालयात नियमित फॉलोअप घ्या. कधी-कधी अधिकाऱ्यांची भेट, मुलाखत यांसाठी आपल्याला बोलावलं जातं.

अनुदान किती मिळेल? Agarbatti Business in Marathi

क्षेत्रअनुदान
ग्रामीण25-35% (SC/ST/OBC/महिला यांच्यासाठी अधिक)
शहरी15-25%

नफा किती होतो? Agarbatti Business in Marathi


अगरबत्ती व्यवसायात सुरुवातीला महिन्याला 10,000 ते 25,000 पर्यंत नफा शक्य आहे. नंतर मागणी प्रमाणे उत्पादन आपल्याला वाढवता येते.

उपयुक्त सल्ला:

यूट्यूबवरून “agarbatti making at home” सर्च करा आणि या व्यवसायाशी संबंधित व्हिडिओ पाहा. पुढे ऑर्डर मिळण्यासाठी स्थानिक बाजारपेठ, किराणा दुकानं, होलसेल व्यापाऱ्यांशी संपर्क ठेवा. मजबूत डिस्ट्रिब्युशन नेटवर्क तयार करा तसेच आपल्या प्रोडक्टची आकर्षक पॅकेजिंग करा.

अगरबत्ती व्यवसायाचा भविष्यकाळ: Agarbatti Business in Marathi

केंद्र सरकारने “मेक इन इंडिया” अभियानांतर्गत स्थानिक उत्पादनास चालना दिली आहे. यामुळे लघु उद्योगांना मोठा फायदा होत आहे. 2020 पासून अगरबत्तीवरील काही आयात निर्बंध लागू करून देशांतर्गत उत्पादकांना मदत करण्यात आली आहे. परिणामी स्थानिक उद्योजकांना संधी अधिक प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे याचा फायदा नक्की घ्या.

त्याचबरोबर नैसर्गिक व सुगंधी उत्पादने, आयुर्वेदिक अगरबत्ती यांची मागणीही आज बाजारात जोर धरत आहे. पर्यावरणपूरक उत्पादने तयार करून आणि नवनवीन संकल्पनांचा वापर करून तुम्ही स्वतःचा ब्रँड निर्माण करू शकता आणि त्याला वाढवू शकता.

Different Colours of Incense Sticks

निष्कर्ष/सारांश: Agarbatti Business in Marathi

अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय हा लहान शहरे-नगरांमध्ये, गावांमध्ये आणि घरगुती पातळीवर सहजरित्या करता येतो. PMEGP योजनेमुळे तर तो आता आणखी सुलभ झाला आहे. कष्टाची तयारी, गुणवत्ता आणि कल्पकतेच्या आधारे तुम्ही स्वतःचा छोटासा पण यशस्वी व्यवसाय उभा करू शकता. जर तुमचं स्वप्न ‘स्वतःचा उद्योग/व्यवसाय’ सुरू करण्याचं असेल, आणि जर तुमच्याकडे कमी भांडवल, थोडी जागा आणि व्यवसायाची इच्छा असेल, तर अगरबत्ती व्यवसाय हा 2025 मध्ये तुमच्यासाठी उत्तम असा पर्याय ठरू शकतो. त्यामुळे या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या व्यवसायाला नवीन भरारी द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) – अगरबत्ती व्यवसाय

1. अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक लागते?

उत्तर: लघु पातळीवर अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹20,000 ते ₹50,000 इतकी गुंतवणूक लागते. मोठ्या प्रमाणावर मशीन आणि कच्चा माल खरेदीसाठी ₹1 लाख किंवा अधिक गुंतवणूक लागू शकते.

2. अगरबत्ती बनवण्यासाठी कोणते कच्चा माल लागतो?

उत्तर: अगरबत्ती बनवण्यासाठी कोळशाचे पावडर, गंधद्रव्य (परफ्यूम), बाइंडिंग गम, बंबू स्टिक, डायल वॉटर आणि रंगद्रव्य यांचा उपयोग केला जातो.

3. अगरबत्ती मशीन कोणती घ्यावी आणि ती कितीची येते?

उत्तर: हाताने चालणारी, सेमी-ऑटोमॅटिक आणि फुली ऑटोमॅटिक मशीन उपलब्ध आहेत. हातचलित मशीन ₹10,000 पासून तर ऑटोमॅटिक मशीन ₹60,000 ते ₹1,50,000 पर्यंत असते.

4. अगरबत्ती बनवून विक्री कुठे करता येते?

उत्तर: तुम्ही स्थानिक किराणा दुकाने, पूजावस्तू दुकाने, भाजी मंडई, तसेच WhatsApp, Facebook आणि Instagram सारख्या सोशल मीडियावर विक्री करू शकता. मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी B2B मार्केटप्लेस जसे IndiaMART, TradeIndia आणि Amazon/Flipkart वर सुद्धा विक्री करता येते.

5. अगरबत्ती व्यवसायासाठी कोणती शासकीय मदत मिळू शकते?

उत्तर: तुम्ही PMEGP (प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना), मुद्रा योजना किंवा जिल्हा उद्योग केंद्राकडून कर्ज आणि अनुदान मिळवू शकता. या योजनांमधून व्यवसायासाठी 25% ते 35% अनुदान मिळू शकते.

6. अगरबत्ती तयार केल्यावर पॅकिंग कसे करावे?

उत्तर: सुगंध टिकावा म्हणून अगरबत्ती प्लास्टिक किंवा अ‍ॅल्युमिनियम कोटेड पेपरमध्ये पॅक करावी. नंतर रंगीत बॉक्समध्ये ब्रँडिंगसह पॅक करावी. सुरुवातीला सामान्य पॅकिंग करून विक्री केली जाऊ शकते.

7. अगरबत्ती बनवण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागते का?

उत्तर: हो, जर तुम्ही नवशिके असाल तर प्रशिक्षण घेणे उपयुक्त ठरते. MSME किंवा KVIC कडून अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले जाऊ शकते.

8. अगरबत्ती व्यवसाय नोंदणी आवश्यक आहे का?

उत्तर: हो, व्यवसाय वाढवायचा असेल तर GST नोंदणी, Udyam नोंदणी आणि स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगरपालिका परवाना घेणे आवश्यक आहे.

9. अगरबत्तीला सुगंध कसा दिला जातो?

उत्तर: अगरबत्ती तयार झाल्यावर ती विशेष परफ्यूममधून मॅरिनेट केली जाते किंवा तयार मिश्रणात गंध घालून बनवली जाते.

10. अगरबत्ती व्यवसाय नफा देतो का?

उत्तर: हो, योग्य मार्केटिंग आणि गुणवत्ता राखल्यास अगरबत्ती व्यवसाय अत्यंत फायदेशीर ठरतो. कमी गुंतवणुकीत जास्त परतावा मिळवण्याचा उत्तम पर्याय आहे.

तर मित्रांनो, अगरबत्ती व्यवसायावरही हा लेख तुम्हाला कसा वाटला? आम्ही दिलेली माहिती आवडल्यास admin@majhaudyogg.com या आमच्या ईमेलवर नक्की आपला अभिप्राय द्या.

चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन पोस्टसोबत! धन्यवाद!

लेखक: शुभम गुंडूरकर (majhaudyogg.com)
श्रेणी: उद्योग

आणखी वाचा:

घरबसल्या पापड व्यवसाय कसा सुरू कराल?

मोबाईल रिपेअरिंग आणि ॲक्सेसरीज विक्री व्यवसाय सुरु करा

घरबसल्या साडी व्यवसाय सुरू करा

सुगंधी क्ले मातीची खेळणी बनवण्याचा व्यवसाय करून पैसे कमवा